Smoking Effects on Mental and Physical Health : दरवर्षी मार्च महिन्यातील दुसरा बुधवार धूम्रपान निषेध दिवस (No Smoking Day) म्हणून साजरा केला जातो. धूम्रपानापासून होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि लोकांना धूम्रपान सोडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. धूम्रपानामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो हे आपल्याला माहीत आहे, तरीसुद्धा अनेक जण डोक्यावरील टेन्शनची मात्रा कमी करण्यासाठी किंवा तणाव कमी करण्यासाठी धूम्रपान करतात; पण खरंच धूम्रपान केल्याने तणाव कमी होतो का?

संशोधन काय सांगते?

याविषयी एनआयएच (National Library of Medicine) नी एक संशोधन केले होते. या संशोधनामध्ये १८ ते २२ तरुण वयोगटातील ३० पुरुष आणि महिलांवर अभ्यास करण्यात आला होता. त्यापैकी २० पुरुष होते तर १० महिला होत्या. या अभ्यासात असे दिसून आले की एकूण पुरुषांपैकी 75 टक्के पुरुष धूम्रपान करणारे होते तर एकूण महिलांपेकी ५० टक्के महिला धुम्रपान करणाऱ्या होत्या.

Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
is alcohol good for health
दारू प्यावी का? आयुर्वेद काय सांगतं?
Should You Cook Everything In Ghee? Pros And Cons You Need To Know
जेवणात तेल वापरावे की तूप? हा प्रश्न पडलाय; महिलांनो जाणून घ्या उत्तर
Why Drinking Cold Water May Not Be Good For Your Digestive System, As Per Experts
थंड पाणी सोडून रोज कोमट पाणी प्यायलं तर शरिरावर काय परिणाम होतील? तज्ज्ञांनी सांगितले आश्चर्यकारक फायदे
bmc commissioner bhushan gagrani express view about bmc fd
मुदतठेवींबाबत चिंता नाही! नियोजन न केल्यास मात्र आर्थिक चणचण, मुंबई पालिका आयुक्तांचा इशारा
Why radish leaves or mulyachi pane deserve a place in your winter diet
हिवाळ्यात तुमच्या आहारात मुळ्याच्या पानांचा समावेश का असावा? तज्ज्ञांनी सांगितले कारण…
Smoking Effects on Mental Health
एनआयएच (National Library of Medicine) नी केलेेले संशोधन

याशिवाय या संशोधनात लोक धूम्रपान का करतात, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली होती. अभ्यासात असे सांगितले होते की, तीन कारणांमुळे तरुण मुले धूम्रपान करतात. ती कारणे खालीप्रमाणे
१. प्रभावित होऊन धूम्रपान करणे
२. उत्सुकता म्हणून धूम्रपान करणे
३. तणाव कमी करण्यासाठी धूम्रपान करणे

या संशोधनात धूम्रपान करणाऱ्या काही तरुण मुला-मुलींवर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात असे दिसून आले की परीक्षा, कौटुंबिक समस्यांचा ताण आल्यामुळे डोकेदुखी, निद्रानाश, नैराश्य इत्यादी प्रकारची लक्षणे दिसून येतात, जी धूम्रपानामुळे कमी झाली आहे. अनेक तरुणांनी तणाव, नैराश्य आणि वैयक्तिक जीवनातील ताण धूम्रपानामुळे कमी झाल्याचे या अभ्यासात सांगितले आहे.

खरंच धूम्रपानामुळे तणाव कमी होतो का?

खरंच धूम्रपानामुळे तणाव कमी होतो का? या संदर्भात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रश्मी जोशी यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना सविस्तर माहिती दिली. त्या सांगतात, “आपल्या घराजवळ तुम्ही अनेकदा लहान मोठ्या टपरी बघितल्या असतील, जिथे सहजपणे तंबाखू, सिगारेट उपलब्ध असतं आणि त्याची किंमत परवडणारी असते. त्यामुळे तरुण मुले ते सहज खरेदी करू शकतात, त्यामुळे तरुण मुलांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.”

त्या सांगतात, “आमच्याकडे अनेक रुग्ण येतात, जे त्यांनी धूम्रपान कसे सुरू केले याविषयी वेगवेगळे अनुभव सांगतात. ‘एकदा धूम्रपान केल्यानंतर आम्हाला छान वाटलं’, असे अनेक जण सांगतात; पण छान का वाटतं हे समजून घेणे गरजेचे आहे. जेव्हा आपण धूम्रपान करतो तेव्हा त्यातून एक निकोटीन नावाचं रसायन स्रवतं. हे निकोटीन आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन सोडण्यास उत्तेजित करते, ज्यामुळे आपल्याला छान वाटते. पण, हे छान वाटणे तात्पुरत्या स्वरुपात असते. छान वाटत असल्यामुळे तुम्ही दिवसातून एक सिगारेट, मग दोन सिगारेट असं करता करता दिवसातून १० ते १५ सिगारेट ओढता तेव्हा त्यांना असं होतं की, आता जर एखादी सिगारेट घेतली नाही तर झोप लागणार नाही, काम होणार नाही आणि ते नकळतपणे आहारी जातात आणि त्याचे व्यसनात रुपांतर होते.”

“परीक्षांमध्ये अपयश येणे किंवा ब्रेकअप होणे, एकतर्फी प्रेम भंग होणे इत्यादी प्रकारचे प्रसंग तरुणांसमोर येतात. अशावेळी मित्र म्हणतात की, अरे काही होत नाही, एकदा सिगारेट ओढून बघ मग तुला ‘स्ट्रेस फ्री’ वाटेल. अशावेळी मानसिकरित्या गोंधळलेली अनेक तरुण मुले याकडे सहज वळतात, पण परीक्षेत नापास झाले किंवा ब्रेकअप झाले तर वाईट वाटणार. अशावेळी तुम्ही जवळच्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलू शकता, पण ते सुद्धा शक्य नसेल तर तुम्ही तज्ज्ञांकडून समुपदेशन घेऊ शकता. त्यांच्याकडे तुम्ही याबाबत चर्चा केली तर तुम्हाला मार्ग मिळू शकतो. धूम्रपानामुळे तणाव कमी होत नाही, तर त्यांना तात्पुरतं चांगलं वाटतं आणि शरीरावर याचा गंभीर परिणाम होतो, हे समजून घेणे गरजेचे आहे”, असे डॉ. रश्मी जोशी सांगतात.

हेही वाचा : गरोदर आईच्या ध्रूमपानामुळे मुलीला वेळेआधीच मासिक पाळी येण्याचा धोका? संशोधनातून समोर आलेली माहिती

धूम्रपान आणि मानसिक आरोग्य

एखाद्या व्यक्तीला दररोज १० सिगारेट ओढण्याची सवय आहे, पण एखाद्या दिवशी त्याला एकही सिगारेट ओढता आली नाही तर त्यामुळे त्याला तणाव येऊ शकतो. याविषयी डॉ. जोशी सांगतात, “आपल्या शरीरात धूम्रपान केल्यानंतर दररोज निकोटीन नावाचा पदार्थ जातो, जो आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन सोडण्यास उत्तेजित करतो, ज्यामुळे आपल्याला छान वाटतं. पण, अचानक निकोटीनचं प्रमाण कमी झालं की व्यक्तीला निराश वाटू शकते, झोप येत नाही, ताण वाढतो, त्यांना वारंवार धूम्रपान करण्याची आवड निर्माण होते आणि ते मिळालं नाही तर ते हट्ट धरतात, खोटं बोलून पैसे काढतात, कधी ते चोरी करतात किंवा मौल्यवान वस्तू विकून व्यसन करतात. तरुण मुलं जी पालकांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत, ते जेव्हा चुकीच्या मार्गाने पैसे काढून व्यसन करतात, तेव्हा त्यांच्या मनात आणखी अपराधीपणाची भावना निर्माण होते आणि त्यामुळे त्यांच्या मनात सतत नकारात्मक विचार येतात; ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो. तणावातून बाहेर पडण्यासाठी काही लोकं धूम्रपान करतात, पण याचे प्रमाण वाढले की यातून बाहेर पडता येत नाही म्हणून त्यांना पुन्हा तणाव येऊ शकतो.”

Smoking Effects on Mental Health
धूम्रपान आणि मानसिक आरोग्य

धूम्रपानाचा तुमच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो, हे सर्वांना माहिती आहे. धूम्रपान केल्यामुळे त्यातील निकोटीन हा पदार्थ शरीराचा कोणताच अवयव सोडत नाही. जेव्हा आपण सिगारेट ओढतो, तेव्हा त्यातून जाणारा कार्बोनेट पदार्थाचा परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होतो, ज्यामुळे श्वास घेण्याशी संबंधित आजार होऊ शकतात. या पदार्थामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या तर हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. याशिवाय धूम्रपानामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. या सर्व गोष्टींसाठी धूम्रपान करणे धोकादायक मानले जाते; पण त्याचबरोबर मधुमेहाच्या रुग्णांनीसुद्धा धूम्रपान करणे आरोग्यासाठी चांगले नाही. या आजारांचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. जर रक्तातील साखर कमी जास्त झाली तरी तुमचा मूड बदलू शकतो. शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य यांचा एकमेकांशी संबंध दिसून येतो.

तणाव कसा कमी करावा, याविषयी डॉ. रश्मी जोशी यांनी खालील गोष्टी सांगितल्या आहेत. –

Smoking Effects on Mental Health
तणाव कसा कमी करावा?

जेव्हा तुम्ही तणावात असाल किंवा खूप जास्त एखाद्या व्यसनाच्या आहारी गेला असाल, तर अशावेळी तुमच्या जवळच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अनेकदा तज्ज्ञ धूम्रपान थांबवण्यास मदत करण्यासाठी निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीचा (NRT) वापर करतात. या उपचार पद्धतीद्वारे रुग्णांना निकोटीन पॅच किंवा च्युइंगम दिले जाते, ज्यामुळे निकोटीनची लालसा कमी करण्यास मदत होते, याशिवाय समुपदेशनसुद्धा केले जाते. याव्यतिरिक्त तुम्हाला तुमची दररोजची जीवनशैली सुधारणे आवश्यक आहे. चालणे, धावणे, योगा किंवा तुम्हाला आवडेल त्या प्रकारचा व्यायाम तुम्ही करू शकता. त्याचबरोबर डान्स करणे, गाणी म्हणणे, चित्र काढणे इत्यादी गोष्टी, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो ते करावे.

मानसिक आरोग्य निरोगी असणे का आवश्यक आहे?

डॉ. रश्मी जोशी सांगतात, “धुक्यामध्ये गाडी चालवली तर अपघात होण्याची भीती असते, त्याचप्रमाणे धूम्रपान केल्याने मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या वर्षी धूम्रपान निषेध दिनाची जी थीम आहे “Breath simpler and celebrate smoke free life” याचे अनुकरण करा. निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा दिली आहे ती खराब होणार नाही याची काळजी घ्या. कारण जे लोकं धूम्रपान करत नाहीत, त्यांच्या शरीरातसुद्धा धूम्रपानाचे कण जातात. लहान मुले, वृद्ध माणसे आणि गर्भवती महिलांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे स्वत: एक पाऊल पुढे येऊन धूम्रपान निषेध दिनाचे महत्त्व समजून घेऊ या.”

Story img Loader