Ultra-Processed Foods: मागील काही वर्षांपासून प्रोसेस्ड खाद्यपदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. BMJ मध्ये प्रकाशित झालेल्या एका प्रमुख ३० वर्षांच्या अभ्यासात अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्य पदार्थ आणि अकाली मृत्यूचा वाढणारा धोका यांच्यातील संबंधांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. युनायटेड स्टेट्समध्ये आयोजित केलेल्या संशोधनाने आपल्या निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहाराचे महत्त्व अधोरेखित केले.
या अभ्यासात अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांबद्दल सांगितले की, अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ नेहमी विविध औद्योगिक प्रक्रियेतून जातात. यामध्ये अनेकदा रंग, फ्लेवर्स, इमल्सीफायर्स आणि इतर आरोग्यास घातक पदार्थांचा समावेश असतो. खालील पदार्थांचा देखील या प्रक्रियेत समावेश असतो.
प्रोसेस्ड मांसाहारी पदार्थ
साखरयुक्त पेय
डेअरी प्रोडक्ट
प्रक्रिया केलेले नाश्त्याचे पदार्थ
संशोधक या सर्व अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा सल्ला देत नाहीत पण, सुदृढ आरोग्याला चालना देण्यासाठी ते यातील विशिष्ट पदार्थांची विक्री मर्यादित ठेवावी यावर भर देतात.
हे भारतीयांसाठी चिंताजनक का?
डॉ. भारती कुमार, फोर्टिस हॉस्पिटल, नगरभवी, बंगळुरू यांच्या मते , भारतीयांसाठी ही एक चिंताजनक बाब आहे. कारण आपल्याकडे अनेक लोक अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांवर अधिकाधिक अवलंबून राहू लागले आहेत.
इंडियन काउंसिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्सने सह-लेखन केलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात भारतात प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ बनवण्यात झपाट्याने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
करोना काळानंतर, अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांसाठी आपला बाजारातील हिस्सा कमी झाला. डॉ कुमार यांनी सांगितले की, “करोनाच्या काळात आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे आणि पोषक आहाराला प्रोत्साहन देण्यावर सरकारचे लक्ष होते, ज्यामुळे आपला बाजारातील अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचा हिस्सा कमी झाले असे आपण म्हणू शकतो.”
पण आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, २०११ आणि २०२१ दरम्यान या क्षेत्राचा चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर (सीएजीआर) १३.३७% पर्यंत पोहोचला आहे, तरीही तो जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणाऱ्यांपैकी एक आहे.
अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकते?
डॉ कुमार अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमुळे वाढणाऱ्या धोक्याबाबत सांगताना म्हणाले की, या पदार्थांच्या सेवनाने शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते शिवाय आवश्यक पोषक तत्वांचा अभाव जाणवतो. तसेच यात कॅलरीज जास्त असतात ज्यामुळे कुपोषण, वजन वाढणे आणि दीर्घकालीन आजार यासाठी कारणीभूत ठरु शकते.
अशा पदार्थांमध्ये अतिप्रमाणात वापरली जाणारी साखर, अधिक चरबी आणि सोडियमयुक्त पदार्थांमुळे हृदयरोग, मधुमेह आणि पचन समस्या उद्भवतात.
कोणत्या पदार्थांचे सेवन करणे योग्य?
हेही वाचा: 80/10/10 Diet : वजन कमी करण्यासाठी खरंच उपयुक्त आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…
डॉ कुमार सांगतात की, अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ खाऊन आरोग्य धोक्यात घालण्यापेक्षा या आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करा.
ड्राय फ्रुट्स
ड्राय फ्रुट्स आपल्या शरीराला प्रथिने आणि फायबर प्रदान करतात, ज्यामुळे तुम्हाला उत्साही वाटते. याचे दररोज आवर्जून सेवन करावे.
ताजी फळे आणि भाज्या
फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात, जे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. यामुळे तुम्ही निरोगी राहता.
उकडलेली अंडी
उकडलेली अंडी निरोगी चरबी आणि जीवनसत्त्वे असलेले परिपूण स्त्रोत आहे. याच्या सेवनाने त्वचा, केस आणि आरोग्यही सुदृढ राहते.