Holiday Heart Syndrome: नवीन वर्ष सुरू होण्यास आता अवघे काही तास शिल्लक आहेत. यादरम्यान नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला थर्टी फर्स्ट पार्ट्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. यानिमित्ताने काही जण घरातच राहून नवीन वर्ष साजरे करतात, तर अनेक जण बाहेर जाऊन पार्टीचा आनंद लुटतात. या पार्ट्यांमध्ये (New Year 2024) उत्साहाच्या भरात अनेक लोकं अति मद्यपान करतात. मद्यपान करणे सामान्य आहे, मात्र यामुळे हॉलिडे हार्ट सिंड्रोमचा धोका वाढतो. यात ह्रदयाच्या लयीत अडथळा निर्माण होतो, तसेच हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता जाणवू लागते. याला अॅट्रियल फायब्रिलेशन (AFib) असेही म्हणतात.
दरम्यान, न्यू इअर पार्टीत अतिमद्यपानामुळे होणारा हॉलिडे हार्ट सिंड्रोमचा धोका टाळण्यासाठी नोएडामधील मेट्रो हॉस्पिटल,कार्डियाक कॅथ लॅबचे सीनिअर इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आणि ग्रुप डायरेक्टर डॉ. समीर गुप्ता यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. ज्याच्या मदतीने न्यू इअर पार्टीत अतिमद्यपानानंतर लोकांना हॉलिडे हार्ट सिंड्रोमपासून दूर राहण्यास मदत होईल. दरम्यान, ज्या लोकांना आधीच हृदयासंबंधित आजार आहेत, त्यांना हॉलिडे हार्ट सिंड्रोमचा धोका अधिक आहे. त्यामुळे नवीन वर्ष साजरे करताना हृदयरोग्यांनी विशेष काळजी घ्या.
अतिमद्यपान केल्यास त्याचा हृदयावर काय परिणाम होतो? ( Does Drinking Alcohol Affect Your Risk for Heart Disease)
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने स्वायत्त मज्जासंस्थेमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते. यामुळे हृदयाच्या विद्युत सिग्नलवर परिणाम होतो, ज्यामुळे हृदयाच्या लयीत अनियमितता जाणवते. अशा परिस्थितीत छातीत धडधडणे, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत अस्वस्थता जाणवणे अशी लक्षण दिसू लागतात.
यामुळे शारीरिक ताण निर्माण होतो आणि हृदयाच्या वरच्या डाव्या बाजूच्या उती ताणल्या जातात. हृदयाच्या विद्युत गुणधर्मांमधील बदलांव्यतिरिक्त हा अतिरिक्त ताण त्याच्या संचरनेत बदल करतो, ज्यामुळे वरची बाजू मोठी होते.
‘ही’ लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा (Holiday Heart Syndrome Symptoms)
हॉलिडे हार्ट सिंड्रोम लक्षणे वेळीच ओळखणे महत्वाचे आहे. विशेषत: सुट्टीच्या दिवशी अतिमद्यपान केल्यानंतर काही जाणवल्यास विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्यात ह्रदयात धडधडणे, छातीत दुखणे, हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल, हलके डोके दुखणे, श्वास घेण्यात अडचण, थकवा अशी लक्षणे जाणवतात. ही लक्षणं ह्रदयाच्या लयीत अनियमितता असल्याचे दर्शवतात. काहींना ही लक्षणे स्पष्ट जाणवत नाहीत. काहींना अधूनमधून ही लक्षणे जाणवतात. दरम्यान, काहींना ही लक्षणं येतात आणि जातात, ती सहसा काही मिनिटे ते तासांपर्यंत टिकतात किंवा ते कायमचे असू शकतात. म्हणून ही लक्षणे दिसल्यावर त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
ही स्थिती कशी हाताळायची?
दरम्यान, हॉलिडे हार्ट सिंड्रोमचा उपचार व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून असतो. जर एखाद्या व्यक्तीची प्रकृती आधीच खराब असेल तर डॉक्टर त्याला कार्डिओव्हर्सन करण्याचा सल्ला देतील, अशी शक्यता असते. ही एक अशी शस्त्रक्रिया आहे, जी सामान्य ह्रदयाची लय पुनर्संचयित करण्यासाठी कमी-ऊर्जा शॉक वापरते. यामध्ये तुम्हाला मद्यपानापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण अभ्यासात असे दिसून आले आहे की, दररोज ८० मिलीग्रामपेक्षा कमी अल्कोहोलचे सेवन केल्यास हॉलिडे हार्ट सिंड्रोमचा धोका कमी होऊ शकतो.
हॉलिडे हार्ट सिंड्रोमचा धोका कसा रोखायचा? (Holiday Heart Syndrome Treatment)
१) अल्कोहोलचे मर्यादित सेवन करा: सुट्ट्यांच्या दिवसांत मद्यपान करताना थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मद्यपान करताना तुम्ही तुमच्या काही मर्यादा सेट करा.
२) हायड्रेशन बॅलन्स: अल्कोहोलमध्ये पाण्याचा वापर करून प्यायल्यास शरीराची हायड्रेशन पातळी राखता येते. यामुळे अल्कोहोलचा शरीरावर होणारा वाईट परिणाम कमी करता येतो.
३) आरोग्यदायी निवडी: लायटर, लोअर अल्कोहोल ड्रिंक्सची निवड केल्यास पार्टीचा योग्य आनंद घेता येतो. शिवाय अल्कोहोलचे सेवनही कमी होते.
४) नियमित व्यायाम: दररोज व्यायाम केल्यास शरीरातील अति अल्कोहोलच्या सेवनानंतर होणारा नकारात्मक प्रभाव कमी करता येतो.
६) औषधांचे नियमित सेवन करा: रात्री मद्यपान केल्यानंतर नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग (NSAID) घेऊ नका, कारण ते तुमच्या हृदयावर आणखी ताण आणू शकतात.यामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो, हृदयाच्या आरोग्यासाठी आणखी एक ट्रिगर बनू शकते.
७) शारीरिक बदलांकडे लक्ष द्या: शरीरात होणारे बदल, त्रास ओळखा. अल्कोहोलच्या सेवनाने कोणतीही अस्वस्थता जाणवल्यास त्याचे सेवन करणे टाळा आणि आराम करा.
सुट्ट्यांचा योग्य प्रकारे आनंद घ्यायचा असेल तर आधी ह्रदयाचे आरोग्य जपणे फार महत्वाचे आहे. अशावेळी अल्कोहोलचे मर्यादित सेवन करून शरारीचे निरोगी आरोग्य राखले पाहिजे.