Dog grass eating health: आजपर्यंत तुम्ही कधी एखाद्या श्वानाला उद्यानामधील गवत खाताना पाहिले आहे का? खरे तर श्वान हा मिश्राहारी प्राणी आहे. पण, तरीही तो गवत का खात असेल? श्वानाने गवत खाणे ही गोष्ट अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे.
याबाबत अनेक वर्षांपासून श्वानाचे मालक त्यांचे तर्क व्यक्त करतात. त्यामध्ये ते श्वान जेव्हा गवत खातो तेव्हा तो भुकेला असू शकतो, अस्वस्थ आहे म्हणून, तो बहुधा उलटी करायचा प्रयत्न करतोय, त्याचा हा खाल्लेले अन्न पचनवण्याचा प्रयत्न असावा, अशी विविध कारणे सांगतात. परंतु, यामागे आणखीही कारणे असू शकतात.
पोटाच्या त्रासावर उपाय म्हणून गवत
पुण्यातील पेटकेअर प्रो क्लिनिकचे डॉ. ईशान यांनी सांगितले की , श्वानांना मळमळ होत असताना किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल अस्वस्थता जाणवत असताना त्यांनी गवत खाणे असामान्य नाही. गवत एक नैसर्गिक उत्तेजक म्हणून कार्य करते, त्यांना पोटदुखीपासून मुक्त होण्यासाठी ही गोष्ट उलट्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यास मदत करते. तसेत प्रत्येक वेळी गवत खाल्ल्यामुळे उलट्या होत नाहीत.
जर तुमचा श्वान वारंवार गवत खात असेल आणि नंतर उलट्या करीत असेल, तर तुमच्या पशुवैद्याचा सल्ला घेण्याची वेळ आली आहे, असे समजावे. अधूनमधून गवत खाणे सामान्य आहे; परंतु वारंवार उलट्या होणे हे अंतर्निहित आरोग्य समस्या दर्शवू शकते.
लांडग्यांसारखे वन्य श्वान अनेकदा त्यांच्या भक्ष्याच्या पोटात आढळणारी वनस्पतीजन्य पदार्थ खातात. यावरून असे सूचित होते की, पाळीव श्वानांसाठी गवत खाणे हा त्यांच्या पचनास समर्थन देण्यासाठी फायबरचा एक छोटासा डोस मिळविण्याचा नैसर्गिक मार्ग असू शकतो. श्वान प्रामुख्याने मांस-आधारित आहार खातात, गवत हा त्यांच्या पौष्टिक आहारातील पूरक आहाराचा मार्ग असू शकतो.
श्वान हा जिज्ञासू प्राणी आहे, ज्याला फिरायला आवडते. जर तुमचा श्वान बराच वेळ एकट्याने व्यतीत करीत असेल किंवा त्याच्यात मानसिक उत्तेजनाची कमतरता असेल, तर गवत खाणे हे त्याचे लक्षण असू शकते.
हेही वाचा : रोझमेरीच्या पाण्याचा वापर करताना टाळा ‘या’ चुका; तज्ज्ञांच्या महत्त्वाच्या टिप्स..
काळजी कधी करावी?
गवत खाणे सामान्यत: निरुपद्रवी असते; परंतु काही परिस्थिती अशा आहेत, जेथे ती धोक्याची घंटा असू शकते.
वारंवार उलट्या होणे : जर तुमचा श्वान प्रत्येक वेळी गवत खाल्ल्यावर सतत उलटी करीत असेल, तर पशुवैद्याचा सल्ला घ्या.
अत्याधिक सेवन : सतत गवत खाणे ही बाब पौष्टिकतेची कमतरता किंवा सखोल आरोग्य समस्या दर्शवू शकते.