Dog Winter Clothes: हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी आपल्याला हुडीज, जॅकेट वा स्वेटर वापरणे आवश्यक ठरते. परंतु, पाळीव प्राण्यांचे मालकदेखील आपल्या प्राण्यांची हिवाळ्यात खूप काळजी घेतात. त्यांना थंडी वाजू नये म्हणून त्यांना जॅकेट घालतात. पण, तुमच्या पाळीव प्राण्याला थंडीपासून संरक्षणासाठी शरीरापेक्षा किती अतिरिक्त कृत्रिम थरांची गरज आहे? इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमने पाळीव प्राण्यांना उबदार ठेवण्याचे महत्त्वाचे घटक समजून घेण्यासाठी पशुवैद्यांशी चर्चा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुमच्या पाळीव प्राण्यांना स्वेटरची गरज आहे का?

जिगली येथील प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सारस्वत म्हणाले की, कुत्र्यांसाठी विविध कपड्यांचे पर्याय उपलब्ध असले तरी त्यांची नैसर्गिक फर त्यांना आवश्यक ते इन्सुलेशन प्रदान करते. अतिरिक्त स्तरांची आवश्यकता प्राण्यांची जात आणि कोटाच्या प्रकारावर अवलंबून असते.

“हस्की व जर्मन शेफर्ड्स यांसारख्या दुहेरी कोटेड जातींच्या कुत्र्यांना जाड नैसर्गिक फर असते आणि बहुतेक परिस्थितीमध्ये त्यांना स्वेटरची आवश्यकता नसते,” अशी माहिती देत ते म्हणाले, “जास्तीत जास्त थंडीत, हलक्या थराच्या जॅकेटचा वापर केला जाऊ शकतो. परंतु, पाळीव प्राण्यांच्या पालकांनी, जास्तकरून त्यांच्या वागण्यात अस्थवस्थता जाणवणे. थंड जागा शोधणे किंवा स्वेटर काढण्याचा प्रयत्न करणे यांसारख्या प्राण्याच्या अस्वस्थतेच्या लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे“, असे डॉ. सारस्वत म्हणाले.

याउलट चिहुआहुआसारख्या लहान केसांच्या जातींमध्ये नैसर्गिक इन्सुलेशन नसते आणि त्यांच्या शरीराला वरून अधिक योग्य थरांचा आधार देण्याची आवश्यकता असते. “त्यांना सामान्यत: थंड हवामानात दोन थरांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे बीगल्ससारख्या मध्यम-लेपित जातींना सामान्यतः फक्त एक थर आवश्यक असतो. मात्र, तापमानानुसार हलक्या ते मध्यम वजनापर्यंत तो बदलतो,” असे डॉक्टर म्हणाले.

जातीची पर्वा न करता, डॉ. सारस्वत यांनी, स्वेटर योग्य आकाराचे आहेत, आरामदायक सामग्री वापरून बनवलेले आहेत आणि थर लावल्यामुळे ओलावा निर्माण होणार नाही ना याची खात्री करण्यावर भर दिला. त्यात जातीतही वय, आरोग्याची परिस्थिती व वातावरण यांच्या आधारे स्वेटर किती थरांचे असावे हे समायोजित केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

तुमच्या कुत्र्याला अधिक गरम होत असल्याचे संकेत

तुमच्या पाळीव प्राण्याने जास्त थरांचे स्वेटर घातलेले नाही ना याची खात्री करण्यासाठी, या संकेतांकडे लक्ष द्या. डॉ. सारस्वत यांनी सुचवले की, तुमचा कुत्र्यामध्ये अस्वस्थपणा, जास्त तहान किंवा आळशीपणा अशी काही चिन्हे दिसत आहेत का आणि जास्त उबदारपणा व घामामुळे त्याचे कपडे ओलसर झाले नाहीत ना ते पाहा. शरीर जास्त गरम होण्याच्या सर्व लक्षणांमध्ये कपडे काढण्याचा प्रयत्न करणे, शारीरिक क्रियाकलापांना नकार देणे, झाकलेल्या भागांना जास्त चाटणे आणि तणावाची काही चिन्हे असू शकतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Does your pet need to wear sweaters in cold learn expert opinions sap