डॉ. किरण नाबर, त्वचाविकारतज्ज्ञ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Health Special: आनंदीबाईंच्या नावात आनंद आहे. पण आज त्या माझ्या दवाखान्यात आल्या त्या मात्र दुःखी चेहऱ्याने. त्यांना वेदना होत आहेत, हे त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळत होतं. मला म्हणाल्या, “ डॉक्टर हे बघा ना मला काय झालंय. तीन दिवस झाले. असे हे पाठी व छातीवर पाणी भरून फोड आलेत. फक्त एकाच बाजूला व फार दुखतंय. रात्री झोपच नाही आली.”

मी त्यांना नीट तपासलं तेव्हा माझ्या लक्षात आले की हा नागीणीचा आजार होता. मी त्यांना तसं म्हटल्यावर त्या आणखी घाबरल्या. म्हणाल्या , “नागीण दोन्ही बाजूने एकत्र येते ना… आणि त्यानंतर त्या माणसाचं काही खरं नसतं? मला काही होणार तर नाही ना?” मी त्यांना मग नागीण या आजाराबद्दल नीट माहिती दिली व त्यांचा गैरसमज दूर केला. नागीण या आजाराच्या नावानेच माणूस घाबरतो व पूर्वापार चालत आलेल्या नागिणीबद्दलच्या सांगो वांगी अंधश्रद्धांमुळे तर तो आणखी धास्तावून जातो… आज आपण नागीण या आजाराबद्दल जाणून घेऊ या.

हेही वाचा : Health Special: ‘हंगामी इन्फ्लूएन्झा’चा धोका कुणाला? (भाग दुसरा)

नागीण म्हणजे काय?

नागीण हा VARICELLA ZOSTER VIRUS या विषाणूमुळे होणारा त्वचेचा विकार आहे. या आजारामध्ये त्वचेवर ठणकणाऱ्या पाणी भरलेले फोड येतात. आपल्यापैकी बहुतेकांना लहानपणी कांजिण्यांचा आजार झालेला असतो. या आजाराचे विषाणू आपल्या मज्जारज्जूमध्ये जाऊन शांतपणे निष्क्रिय अवस्थेत लपलेले असतात. असे ते कित्येक वर्षे राहतात व त्यानंतर हेच विषाणू आपल्या शरीरातील मज्जारज्जूकडून निघणाऱ्या नसेमार्फत बाहेर येतात. या आजारामुळे ती नस तर दुखतेच पण ती ज्या त्वचेवर संवेदना पोहोचवते तिथेही पाणी भरून फोड येतात. या आजाराला नागीण असे म्हटले जाते.

नागीण कोणाला होऊ शकते?

लहानपणी ज्यांना कांजिण्या होऊन गेल्या आहेत त्यापैकी कोणालाही नागीण होऊ शकते, अगदी लहान मुलांनादेखील. पण शक्यतो नागीण ही पन्नास वर्षाच्या वरील लोकांना होते. तसेच ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, उदाहरणार्थ- कर्करोगाचे रुग्ण, रक्ताचा कर्करोग, एचआयव्ही व ज्यांना रोगप्रतिकारशक्ती कमी राहण्यासाठी उपचार चालू आहेत (उदाहरणार्थ स्टिरॉइडच्या गोळ्या किंवा अवयवरोपण तसेच कर्करोग झालेल्या व्यक्तींना सुरू असलेली औषधे) अशा व्यक्तींनाही नागीण होण्याची शक्यता जास्त असते.

हेही वाचा : Mental Health Special : मुलांच्या प्रायव्हसीचा आईवडील म्हणून तुम्ही विचार करता का?

नागीणची लक्षणे काय ?

काही जणांना, विशेषता वृद्धांना नागीण येण्याच्या दोन-तीन दिवस आधीच तो भाग दुखायला लागतो, तर इतरांना फोड येणे आणि तो भाग दुखणे हे एकदमच चालू होतं. नस ज्या भागात संवेदना पोहोचवते त्या भागात पाणी भरून छोटे मोठे फोड येतात. तरुणांना कमी दुखतं, पण वय जर पन्नासहून अधिक असेल तर मात्र दुखणे जास्त असते. नसेला जंतुसंसर्ग झाल्यामुळे दुखणं हे टोचल्यासारखे किंवा कापल्यासारखे वाटणे, अधूनमधून असह्य वेग येणे, तर कधी कधी सतत दुखत राहणे अशा प्रकारचे असते. काहींना तर रात्र रात्र झोप लागत नाही. अंगावर कपडा सहन होत नाही. कधी कधी त्या ठिकाणी खाज येते. मुंग्या आल्यासारखे वाटते.

अंधश्रद्धा कोणती?

काही वेळा फोड येण्यापूर्वी नसेचे दुखणे सुरु होते . त्यामुळे Heart attack , appendix किंवा किडनीचा रोग समजून रुग्णास भरती केले जाते. पण नंतर पाणी भरून फोड आल्यावर हा तसला काही आजार नाही हे लक्षात येते. मज्जारज्जूकडून निघालेली नस ही उजव्या किंवा डाव्या बाजूला जात असल्यामुळे नागीणीचे फोड हे फक्त एकाच बाजूने येतात. नागीण दोन्ही बाजूंनी मिळते व ते घातक असते ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. नागीण सुरू झाल्यापासून साधारण आठ ते दहा दिवसांमध्ये फोडांमधील पाणी सुकत जाते व तिथे खपली धरते . दुखणेही हळूहळू कमी होत जाते आणि महिन्याभरात थांबते. नागीण बरी झाल्यानंतरही दीड महिन्याच्याही नंतर दुखणे तसेच चालू राहिले तर त्याला नागीणी नंतरचे नसचे दुखणे किंवा Post Herpetic Neuralgia असे म्हटले जाते. असे दुखणे साधारण सहा महिने ते वर्ष किंवा दोन वर्ष देखील चालू राहू शकते.

हेही वाचा : हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा का होतो? तज्ज्ञ सांगतात, थंडीच्या दिवसांत केसांची कशी घ्यावी काळजी ….

नागीण आयुष्यात किती वेळा होते?

बहुधा नागीण आयुष्यात एकदाच होते. पण क्वचित प्रसंगी ती काही कालावधीने पुन्हा देखील उद्भवू शकते.