Dough Kept In The Refrigerator: सकाळी लवकर ऑफिसला जाणाऱ्या अनेक महिला रात्रीच पोळी बनविण्यासाठी लागणारे गव्हाचे पीठ मळून ठेवतात. गव्हाचे पीठ रेफ्रिजरेटरमध्ये साठवणे ही बऱ्याच घरांमध्ये सामान्य गोष्ट आहे. परंतु, नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मळून ठेवलेले गव्हाचे पीठ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्यामध्ये घातक जीवाणू निर्माण होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, या व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे खरंच गव्हाच्या पिठाची कणीक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे योग्य आहे का? याबाबत खरी माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही काही आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे.

धर्मशिला नारायण हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ पायल शर्मा, यांनी इंडियनएक्स्प्रेस.डॉट कॉमला सांगितले की, ताजेपणा राखून, पीठ खराब होण्यापासून रोखण्यासाठी कणीक योग्यरीत्या ठेवली जाणे आवश्यक आहे. “खरे तर, मळलेली कणीक हवाबंद डब्यात साठवली पाहिजे. कारण- त्यामुळे कणीक कोरडी होण्याला किंवा रेफ्रिजरेटरमधील इतर गंध शोषण्याला प्रतिबंध होतो,” असे त्या म्हणाल्या.

Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…
pizza advertisment banned
पिझ्झा, केक आणि शीतपेयाच्या जाहिरातींवर बंदी; ‘या’ देशाने केली कारवाई, कारण काय?
How to store green chili for a long time
फ्रिजशिवाय हिरवी मिरची दीर्घकाळ कशी साठवायची? फॉलो करा ‘या’ तीन सोप्या टिप्स…
Avoid These Foods to Control Cholesterol Levels
Cholesterol Level in Winter : कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

“गव्हाची कणीक जास्त वेळ बाहेर ठेवल्यास ती उबदार वातावरणात आंबते. रेफ्रिजरेटिंग ही प्रक्रिया मंद करू शकते; परंतु तरीही ही कणीक २४-४८ तासांच्या आत वापरली जावी. या कालमर्यादेच्या पलीकडे पिठाला आंबट चव येऊ शकते. तसेच त्यातील पोषक घटकही कमी होऊ शकतात,” असे शर्मा म्हणाल्या. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, ठरावीक तासांनंतर फ्रिजमध्ये कणीक ठेवल्यास, त्यात जीवाणूंची वाढ होऊ शकते.

हेही वाचा: रात्रभर पाण्यात भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाणं योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे उत्तर…

“तुम्ही जर कणीक जास्त कालावधीसाठी साठवण्याचा विचार करत असाल, तर पीठ गोठवणे हा एक चांगला पर्याय आहे. ते फ्रिजरमध्ये अनेक आठवडे टिकू शकते आणि आवश्यकतेनुसार तुम्ही ते वितळवू शकता. त्यामुळे पीठ रेफ्रिजरेट करणे अल्पावधीसाठी चांगले आहे; परंतु आरोग्य बिघडू नये आणि चांगली चव मिळावी यासाठी मळलेल्या कणकेचे लवकर सेवन करणे आवश्यक आहे,” असे शर्मा म्हणाल्या.

Story img Loader