How to Moderate Your Coffee Consumption : काही लोक सकाळी एक कप चहाच्या सेवनाने तर काही लोक एक कप कॉफीच्या सेवनाने दिवसाची सुरुवात करतात. तुम्हाला कधी एक कप कॉफी प्यायल्यानंतर आळस येतो का? जर हो, तर तुम्ही एकटी व्यक्ती नाही. कॅफिनचे सेवन केल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता जाणवणे ही एक सामान्य गोष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

डिजिटल क्रिएटर दीपशिखा जैन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले की, कॉफी दीर्घकाळासाठी निर्जलीकरणास कारणीभूत ठरू शकते आणि त्यावर उपाय म्हणून एक कप कॉफी प्यायल्यानंतर दोन बाटल्या पाणी प्यावे. त्यांनी त्यांच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कॉफी आरोग्यासाठी खरोखरच फायदेशीर आहे, पण यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते; त्यामुळे शरीरात हायड्रेशन पातळी राखण्यासाठी तुम्ही कॉफीच्या आधी किंवा नंतर पाणी प्यावे.”

याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांशी संवाद साधला.

कॉफीच्या सेवनाने खरोखर शरीरातील पाण्याची कमतरता दिसून येते का?

बंगळूरू येथील ॲस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्युट्रिशन आणि डाएटेटिक्स ॲडविना राज सांगतात की, अति प्रमाणात कॅफिनच्या सेवनाने शरीरातील पाणी कमी होते आणि निर्जलीकरणास सुरुवात होते. त्या सांगतात, “कॅफिनचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे आणि इतर हायड्रेटिंग पेयांचे सेवन जास्त केले पाहिजे, जे शरीराला अँटिऑक्सिडेंटसुद्धा पुरवतात, “या पर्यायांमध्ये तुम्ही फळांचे पाणी, आवळा आणि तुळशीचे शॉट्स, फळांचे स्मूदी, भाज्यांचे सूप, कोवळ्या नारळाचे पाणी आणि हळद आणि मिरपूड घातलेले ताक निवडले पाहिजे.

बंगळूरू येथील ॲस्टर व्हाइटफिल्ड हॉस्पिटलच्या न्युट्रिशनिस्ट अर्चना एस सांगतात की, कॅफिनमध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा गुणधर्म असतो, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि थकवा जाणवतो. जर साखर टाकलेली कॉफी पित असाल तर रक्तातील साखरेची पातळीसुद्धा वाढते, ज्यामुळे झोपेची तंद्री येऊ शकते. जे लोक कॉफीचे नियमित सेवन करतात ते याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करू शकतात, त्यामुळे कॉफी सेवन केल्यानंतरही थकवा जाणवतो आणि झोप येते.

अर्चना एस यांच्या मते, कॉफीचे सेवन कमी करणे आणि त्यानंतर दोन बाटल्या पाणी पिणे गरजेचे आहे. एक बाटली पाणी कॉफीच्या सेवनापूर्वी आणि एक बाटली पाणी कॉफीच्या सेवनानंतर प्यावे, यामुळे निर्जलीकरणाची समस्या दूर होते आणि थकवा दूर होतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drink 2 bottle of water for a cup of coffee to maintain hydration levels ndj