Jaggery Water Benefits: साखरेहूनही गोड असून आरोग्याला गुणकारी ठरणारा गूळ हा थंडीच्या दिवसात आवर्जून आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. गूळ म्हणजे पोटॅशियमचे भांडार, शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी सुद्धा विविध रंगाच्या गुळाची मदत होते. कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि तांबे यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील गुळात असतात. सहसा गूळ खाताना नुसता खाण्यापेक्षा चहात, किंवा चण्यासह खाण्याचा सल्ला दिला जातो, गूळ खाण्याची आणखी एक पद्धत म्हणजे कोमट पाण्यात टाकून पिणे. आयुर्वेदिक अंड्यांच्या माहितीनुसार गूळ हा एक उत्तम डिटॉक्स करणारा घटक आहे. अगदी मधुमेह असल्यासही गुळाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. यासाठी नेमका गूळ कसा व किती खावा हे आहार तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात..
आहारतज्ज्ञ सोनिया बक्षी सांगतात की, हिवाळ्यात, सकाळी लवकर कोमट पाण्यात गूळ टाकून खाणे हे दिवसभर लागणारी ऊर्जा शरीराला देऊ शकते. याशिवायही या पेयाचे अनेक फायदे आहेत. जसे की…
हाडांचे आरोग्य
गूळ हाडे मजबूत करतो, सांधेदुखीपासून आराम देतो, सांधेदुखीसारखे हाडांचे आजार बरे करतो आणि शरीराला शांत करतो. गुळात असणारे पोटॅशियम आणि सोडियमचे शरीरातील रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते.
हिमोग्लोबिनची कमतरता
जर तुमचे हिमोग्लोबिन कमी असेल तर कोमट पाण्यात गुळ खाणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. गुळामध्ये लोह आणि फोलेट असे सत्व असते ज्यामुळे शरीरात रक्तपेशींचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. ज्या महिलांना PCOD चा त्रास आहे त्यांनीही कोमट पाण्यात गूळ टाकून प्यायल्याने नियमित पाली येण्यास मदत होऊ शकते.
शरीराचे डिटॉक्स
गूळ हा शरीराला डिटॉक्सि करण्यासाठी म्हणजेच रक्त व यकृत शुद्ध करण्यासाठी कामी येतो. तुम्ही नियमितपणे कोमट पाण्यात गुळाचे सेवन केल्यास चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होऊ शकते. शरीरातील विषारी पदार्थ गुळाच्या सेवनाने शरीराबाहेर टाकले जातात परिणामी त्वचेतही सुधारणा होते.
इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते
गुळात पोटॅशियम भरपूर असल्याने ते शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या मोहिमेवर असाल तर, कोमट पाण्यात गुळ टाकून आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा सेवन करू शकता.
रोग प्रतिकारशक्तीत वाढ
गूळ हा मॅग्नेशियम, व्हिटॅमिन B1, B6 आणि C चा उत्तम स्रोत आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे असतात. गुळाच्या सेवनाने रोगरप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
हे ही वाचा<< थायरॉईडची ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा; हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी धण्याचे पाणी कसे प्यावे पाहा
गुळाचे पाणी कसे बनवायचे
एक ग्लास पाणी गरम करून त्यात १ इंच गुळाचा तुकडा घाला. नीट ढवळून घ्यावे जेणेकरून गूळ वितळेल. थोडे थंड झाल्यावर गाळून प्या. याशिवाय तुम्ही गूळ बारीक करून थेट ग्लासभर कोमट पाण्यात मिसळू शकता.
(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज लागल्यास वैद्यकीय सल्ला घेणे फायद्याचे ठरेल)