“मला ऑक्टोबर महिन्यातल्या हिटमध्ये ना गरम काहीही खायचं नाहीये, आपण आपल्या डायटमध्ये काहीतरी थंड ॲड करू शकतो का ? म्हणजे म्हणजे बनवायलाही सोपे असेल आणि ज्याने आहाराचे सगळे नियम देखील पाळले जातील”. विशाखाने असं म्हटल्यानंतर सगळ्यात आधी माझ्या मनात विचार आला ते म्हणजे भाज्यांच्या स्मूदी.

म्हणजे भाज्यांचा थोडासा घट्टसर असणारा रस.

Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी

स्मूदी म्हटलं की अरे बापरे पण आता त्यातला सगळा फायबर निघून जाणार पण त्यात नक्की पोषणतत्वं मिळतील का आणि त्या व्हिटामिन लॉसचं काय आणि त्यात पाणी टाकायचं का का दूध टाकायचं पण त्यात मध टाकला तर चालतं का साखर टाकलेली चालते का मला थोडासा आईस्क्रीम्स स्कूप टाकता येईल का? बरं फ्रोजन फ्रुटस टाकता येतील का? स्मूदी डायट करताना असे अनेक प्रश्न विचारले जातात. आजच्या लेखात त्याच प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे.

आपल्याकडे या सीजनमध्ये विविध प्रकारची फळं आणि भाज्या उपलब्ध असतात म्हणजे आवळा, सफरचंद त्याचे वेगळेवेगळे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारच्या बेरी, करवंद मुबलक प्रमाणात बाजारात मिळतात. त्यामुळे आहार संयमन किंवा आहार नियमन करायचं असते तर या रस उन्हाळी दिवसांमध्ये आहारात वरदान ठरू शकतात.

हेही वाचा… Health Special: वैद्यानां शारदी माता असं शरद ऋतूला का म्हटलं जातं?

सोशल मीडियावर आपण खजूर केळं पालक अशी विविध पदार्थांचे एकत्र करून तयार केलेल्या स्मूदीचे व्हिडिओ पाहतो मात्र हेच घट्ट रस बनवताना किंवा स्मूदी तयार करताना पालक योग्य प्रमाणात धुवून घेणे आणि मग स्मूदी करताना वापरणे फार महत्त्वाचे आहे शिवाय कोणतीही पालेभाजी रस तयार करण्याआधी ती ताजी आणि कोवळी असावी याकडे लक्ष द्यायला हवे.

स्मूदी तयार करताना सुरुवातीला पालक, कोथिंबीर, पुदिना यासारखे पदार्थ त्यानंतर लिंबू, काही तेल बिया आणि एक फळाची फोड अशाप्रमाणे पदार्थ एकत्र केल्यास योग्य रस होऊ शकते. कोणताही रस तयार करताना शक्यतो एखाद्या फळाची फळाची फोड त्यात टाकावी ते सुद्धा गोडव्यासाठी किंबहुना फळ अजिबातच टाकले नाही तरी देखील उत्तम अजून एक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याकडे आहे. बऱ्याच वेळा काढे आणि अर्क दिले जातात त्यामुळे विविध पानांचे अर्क म्हणजे तुळशीच्या पानांचीच मध्ये तुळशी लिंबू आलं किंवा आलं पुदिना काकडी आलं पुदिना गाजर यांसारख्याच रस योग प्रतिकारशक्ती वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात मात्र दिवसभर केवळ रस पिणे कधीही उत्तम उपाय नव्हे.

हेही वाचा… लठ्ठपणावरील शस्त्रक्रियेसाठी उंची, वजनाबरोबर अन्य घटकही महत्त्वाचे, देशातील तज्ज्ञ डॉक्टरांचा निष्कर्ष

ज्यांना वजन वाढवायचं असेल त्यांनी या रसामध्ये मध दाण्याचं कूट किंवा दाण्याचं बटर किंवा बदामाचे बटर बदाम काजू अक्रोड यांसारखे सुक्या मेव्याचे पदार्थ एकत्र करू शकता नाहीतर वजन संयमनासाठी कोणत्याही प्रकारच्या तेलबियांची स्मूदी कधी खाऊ नका. ज्यांना केस सुंदर करायचे आहेत त्यांच्यासाठी तेलबिया आवळा पुदिना अशी सुंदर स्मृती एक कप जरी स्मूदी प्यायल्यास तरी देखील केसांचे आरोग्य वाढू शकते आणि बदाम यांचीच रस वजन देखील वाढवते त्यामुळे याच रसांचे ठरवून घेणेदेखील आवश्यक आहे. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मूदी तयार करताना शक्यतो खूप जास्त पाणी घालू नये आणि दुधासोबत कोणत्याही फळाची किंवा भाज्यांची स्मूदी तयार करू नये यामुळे दुधातील कार्बोहायड्रेट्सचे रुपांतर अनावश्यक शर्करेमध्ये होते आणि कधी कधी अशीच स्मूदी पचनासाठी देखील जड होऊन जाते.

हेही वाचा… छातीत फक्त जळजळ होतेय की हार्टअटॅक आलाय? लक्षण कसे ओळखाल, फक्त डाव्या बाजूला दुखणं नव्हे तर..

पोटाचे आरोग्य राखण्यासाठी विविध तेलबिया आणि त्यासोबत आलं किंवा लिंबू असं एकत्र केलेली स्मूदी अत्यंत उपाय कारक आहे कोणतीही स्मूदी तयार केल्या केल्या त्वरित पिणे आवश्यक आहे तुम्ही सकाळी तयार केलेली स्मूदी जर दुपारी पिणार असाल तर त्याचा काही उपयोग नाही अशीच स्मूदी न पिणे उत्तम कोणत्याही भाज्यांचा रस काढून तो की अर्ध्या तासाचा एक तो दहा मिनिटांचा वर देखील ठेवू नये कारण अनेकदा फळभाज्या म्हणजेच कारलं दुधी भोपळा यांसारख्या भाज्यांचा रस अत्यंत जहरी ठरू शकतो त्यामुळेच स्मूदी पिताना किंवा स्मूदी आहारात समावेश करताना पहिली गोष्ट कोणतीच स्मूदी तुमच्यासाठी आवश्यक आहे का याचा अंदाज घ्या दुसरी गोष्ट त्या ती का प्यायची आहे हे कळण्यासाठी आहार तज्ञांचा सल्ला नक्की घ्या तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट स्मूदीमध्ये कोणतेही दूध टाकताना म्हणजे सोया मिल्क बदाम मिल्क दाण्याचे दुध ओट दूध यासारखे कोणतेही प्रकारचे दूध मिसळताना करताना तीच स्मूदी तुम्ही कोणत्या वेळी पिणार आहात हे ठरवणं देखील तितकंच आवश्यक आहे.

सगळ्यात महत्त्वाच्या पाच स्मूदी माहिती करून घेऊया.

१. एक म्हणजे बीट रूट्स स्मूदी ही धावपटूंसाठी तसंच उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी उत्तम.

२. कोहळ्याचा रस ज्यांना त्वचेच्या तक्रारी आहेत त्यासाठी उत्तम त्यांना पोटाचे विकार आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा रस उत्तम असतो. गाजराचा रस केसाचे आरोग्य आणि त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी ही स्मूदी गुणकारी आहे.

३. गाजर आणि तेलबियांचा एकत्र रस केस गळती आणि संप्रेरकांचे असंतुलन असले असणाऱ्यांसाठी ही स्मूदी अत्यंत उपयुक्त आहे.

४. एबीसी म्हणजेच आवळा -बीट आणि काकडी केसांचे आरोग्य त्वचेचे आरोग्य आणि पोटाचे विकार यावर औषधी असणारी ही स्मूदी आहे.

५. अवोकॅडो पेर केसांचे त्वचेचे आणि संप्रेरकांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी हीच स्मूदी विशेष गुणकारी आहे.

६. गाजर-काकडी पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच भुकेच्या संप्रेरकांचा समतोल साधण्यासाठी हीच स्मूदी अत्यंत उपयुक्त आहे.

काय मग तुम्ही या ऑक्टोबर हिट मध्ये कोणती स्मूदी पिताय?