बरेच लोक चहा किंवा कॉफीने तर काही लोक कोमट पाण्याने दिवसाची सुरुवात करतात. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.  याशिवाय हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी पिणेही खूप महत्त्वाचे असते. पण का, ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? प्रमाणित योग प्रशिक्षक आणि होमिओपॅथिक डॉ. नूपोर रोहतगी यांनी इंस्टाग्रामवर याविषयी माहिती दिली असून इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या शरीरात ७० ते ७५ टक्के पाणी असते. यामुळेच अनेक आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करण्यापूर्वी सर्वप्रथम भरपूर पाणी प्यायला हवं. यामुळे शरीरातील अनेक घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि आरोग्यही चांगलं राहतं. पण हे कितपत खरं आहे? लाळेत बॅक्टेरिया असल्याने सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्यापूर्वी पाणी न पिण्याचे अनेकांचे मत असते. पण सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन तुम्ही अनेक फायदे मिळवू शकता. चला तर मग डॉ. नूपोर रोहतगी यांनी काय सांगितलं ते जाणून घेऊया…

डॉ. नूपोर रोहतगी सांगतात, सकाळी झोपे झोपेतून उठल्यावर तुम्हाला जर जोरात तहान लागली असेल आणि विना ब्रश करता तुम्ही पाणी प्यायलात तर याने नुकसान होणार नाही. उलट याचे फायदेच होतात. सकाळी ब्रश न करता पाणी पिणे फायदेशीर आहे. ब्रश न करता पाणी पिल्याने उच्च रक्तदाब सारख्या समस्या कमी करण्यास मदत मिळते आणि दिवसभर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. रात्रीच्या वेळेस तोंडात असलेले जंतू आणि बॅक्टेरिया वेगाने वाढतात त्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी ब्रश न करता पाणी पिता, तेव्हा तुमच्या शरीरात बॅक्टेरिया प्रवेश करतात परिणामी रोगप्रतिकारशक्ती वाढते.

(हे ही वाचा : सॅनिटरी नॅपकिनच्या वापरामुळे महिलांना खरंच कॅन्सरचा धोका? मग पॅडऐवजी काय वापरावे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला )

ब्रश न करता पाणी पिण्याचे फायदे

  • सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. 
  • सकाळी रिकाम्या पोटी ब्रश न करता पाणी प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.
  • जर तुम्हाला लवकर सर्दी होत असेल, तर तुम्ही सकाळी नक्कीच पाणी प्यावे. 
  • रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
  • सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्यामुळे फक्त उच्च रक्तदाबचे रुग्णच नाही तर मधुमेही रूग्णांनाही फायदा होतो.
  • सकाळी उठून पाणी प्यायल्याने गळा, मासिक पाळी, डोळे, लघवी आणि किडनीसंबंधी समस्या दूर होतात. 
  • ब्रश न करता पाणी प्यायल्याने तुमचे केस स्ट्रॉंग आणि शायनी होतात आणि त्वचेत चमकही राहते.

करु नका ‘ही’ चूक

सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगले आहे, पण सकाळी उठल्याबरोबर जास्त पाणी पिऊ नका, असे केल्याने समस्या देखील उद्भवू शकतात, असेही तज्ज्ञ सांगतात. सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यायचं असल्यास रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळी किती पाणी प्यावे?

सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदानुसार खूप पाणी एकत्र पिण्यापेक्षा एक एक घोट घेत प्यावे. तेदेखील केवळ १ ग्लास उठल्यानंतर पाणी कोमट करून प्यावे. आयुर्वेद असा सल्ला देतं, असही त्या म्हणाल्या…

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drink water right after you wake up in the morning even before brushing your teeth pdb
Show comments