Can black pepper powder prevent uncontrolled sneezing: सकाळी उठताच तुमचीही सुरुवातीची पंधरा मिनिटं शिकण्यात,चोंदलेलं नाक मोकळं करण्यात जातात का? हा फक्त तात्पुरता त्रास नसून यामुळे अत्यंत भीषण आरोग्य स्थिती उद्भवू शकते. जर तुम्ही यावर उपाय शोधत असाल तर आरोग्य मार्गदर्शक, मंजू मित्तल यांनी एक सोपा व घरगुती उपाय सुचवला आहे. मसाल्यांची राणी म्हणजे काळी मिरी तुम्हाला या त्रासातून सुटका मिळवून देऊ शकते. काळी मिरीमधील अँटिऑक्सिडंट्स तुम्हाला त्वरित प्रभाव दाखवू शकतात.
काळी मिरीचे सेवन कसे करावे?
मित्तल सांगतात की, सकाळच्या कोमट चहाच्या कपाप्रमाणे, तुम्हाला फक्त रोज सकाळी कोमट पाण्यात ¼ (पाव) चमचा काळी मिरी पूड मिसळून प्यायची आहे “यामुळे अनियंत्रित शिंका नियंत्रणात आणण्यासाठी मोठी मदत होऊ शकते.
काळी मिरीचे फायदे काय?
मित्तल पुढे सांगतात की, काळी मिरी पावडर वजन कमी करण्यास, शरीराला डिटॉक्सि करण्यास, कर्करोगापासून बचाव करण्यास आणि तुमचे आतडे आणि पोट स्वच्छ करण्यास मदत करते. या पावडरमध्ये पोटॅशियम असते जे हृदयाची गती आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. काळी मिरी शरीरात लाल रक्तपेशी आणि कॅल्शियम तयार करण्यास मदत करतात. शिवाय यातील व्हिटॅमिन बी बद्धकोष्ठ, त्वचेचे आरोग्य सुधारून सुरकुत्या कमी करते.”
काळी मिरीमुळे खरोखरच शिंका कमी होतात का?
जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ सुषमा पीएस यांनी शेअर केले की, काळी मिरी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. वजन कमी करण्यात मदत करणे आणि कर्करोग रोखणे यासह अनेक आरोग्यविषयक फायदे या काळ्या मिरीमध्ये आहेत आहेत. त्यातील पोटॅशियम रक्तदाब आणि नाडीचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते आणि त्याचे डिटॉक्सिफायिंग गुण पोट आणि आतडे स्वच्छ करून शरीराला मदत करू शकतात. शिवाय, काळी मिरीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी जास्त असते आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीत योगदान देते. पण शिंका कमी व्हाव्या यासाठी काळ्या मिरीचा वापर योग्य आहे असे सांगणारे ठोस पुरावे नाहीत.
उलट मिरीच्या उग्र वासामुळे काही लोकांना शिंका येऊ शकते. काही निरीक्षणांनुसार, काळी मिरी अनुनासिक परिच्छेदातील ऍलर्जी कमी करून शिंका येणे कमी करण्यास मदत करू शकते, परंतु वैज्ञानिक पुरावे या सिद्धांताचे समर्थन करत नाहीत. सर्व गोष्टींचा विचार केला, जरी काळी मिरीचे आरोग्यासाठी अनेक फायदे असले, तरीही शिंका कमी करण्याची क्षमता पुराव्यानिशी सिद्ध झालेली नाही.
दुसरीकडे, डॉ अर्चना बत्रा, आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह प्रशिक्षक यांनी शेअर केले की कोमट पाणी हे मिरपूड पातळ करण्यास मदत करते, ज्यामुळे ते वापरणे सोपे होते. उष्णतेमुळे संवेदनशील झालेल्या अनुनासिक परिच्छेदांना आराम मिळतो, ज्यामुळे शिंकण्याचे प्रमाण कमी होते.
काळी मिरीमध्ये पाइपरिन हे सक्रिय संयुग असतं, ज्यात अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म आढळतात. या संयुगामुळे नाकातील जळजळ कमी होऊन रक्तसंचय होण्याचे प्रमाण घटते. नाक मोकळे झाल्याने शिंकण्याची इच्छा सुद्धा कमी होते. शिवाय यामुळे बॅक्टरीयाच्या वाढीस प्रतिबंध घातला जातो परिणामी तुम्हाला शरीराच्या अंतर्निहित संसर्गांशी सुद्धा लढता येते.
या दोन्ही बाजू लक्षात घेऊन आपण जरी हा उपाय करणार असाल तरी एकदा तुमच्या आरोग्यस्थितीशी परिचित असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.