आपल्यापैकी कित्येकांना सकाळी उठल्यानंतर सर्वांत आधी कॉफी हवी असते? कॉफी प्यायल्याशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. तुम्हाला माहीत आहे का की, सकाळी खाण्याआधीचा प्यायलेली एक कप कॉफी त्या क्षणी ऊर्जा देते; पण नंतर त्यामुळे दिवसभर थकवा येतो? कारण- ते ॲडेनोसिन (adenosine) किंवा झोप येण्यास प्रोत्साहन देणाऱ्या संप्रेरकाशी (Hormone) लढते, या प्रक्रियेत तुमची ऊर्जा पातळी कमी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याव्यतिरिक्त नियमितपणे सकाळी उठल्या उठल्या कॉफीचे सेवन केल्याने, त्यावर अवलंबून राहण्याची सवय लागते. हळूहळू तुम्हाला बरे वाटण्यासाठी अधिक कॉफी पिण्याची आवश्यकता भासते; जे ॲडेनोसिनची पातळी आणखी वाढवते आणि त्यामुळे तुमची ऊर्जा पातळी कमी करते. कॉफी पिण्याचा आणि ऊर्जा वाढविण्याचा योग्य मार्ग काय आहे याबाबत अपोलो हॉस्पिटल्स, चीफ न्यूट्रिशनिस्, डॉ प्रियंका रोहतगी, यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे.

कॉफी पिण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?

फक्त दिवसाच्या सुरुवातीच्या काळात मर्यादित प्रमाणात कॉफी प्या आणि सकाळी उठल्या उठल्या कॉफी पिण्याऐवजी ती काही वेळानंतर प्या. ॲडेनोसिनची पातळी नैसर्गिकरीत्या वाढू द्या. मग दुपारच्या सुरुवातीला, जेव्हा तुमची ऊर्जा पातळी कमी होते, तेव्हा एक कप कॉफी तुम्हाला आनंद देऊ शकते आणि तुम्हाला अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकते. सुमारे १०० एमजी हे कॅफिनचे योग्य प्रमाण (Ideal dose) आहे.

हेही वाचा – ग्लुटेनयुक्त आहार टाळल्यास गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास कमी होईल का? काय आहे तज्ज्ञांचे मत…

दुपारच्या जेवणानंतर कॉफी घेतल्याने रिसेप्टर्स (Receptors) संवेदनशील राहतात. त्यामुळे कॅफfनचा प्रभाव चांगल्या प्रकारे होतो. दिवसाच्या सुरुवातीला ॲडेनोसिन तयार होण्यामुळे रिसेप्टर्सला दुपारच्या वेळी कॅफिनला अधिक जलद गतीने प्रतिसाद देण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे दुपार संपेपर्यंत तुम्हाला काम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. त्याशिवाय झोपण्यापूर्वी काही तास कॉफीचे सेवन टाळले, तर ती बाब तुम्हाला पटकन झोप येण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

सकाळी उठल्या उठल्या कॉफी न पिता, जर नाश्त्यासह कॉफी घेतली, तर रिकाम्या पोटी आम्ल निर्माण होणे टाळता येईल. कारण- कॉफी सामान्यत: आम्लयुक्त असते, त्याची पीएच पातळी ४ ते ५ च्या दरम्यान असते. तुम्ही प्रथिनयुक्त पदार्थांसह कॉफीचे सेवन करू शकता.

आपण सकाळी सर्वांत आधी कॉफी का पिऊ नये याचे आणखी एक कारण म्हणजे जेव्हा आपण उठतो तेव्हा आपले शरीर नैसर्गिकरीत्या निर्जलित होते. झोपेच्या अवस्थेत असलेले शरीर एक लिटर पाणी वापरू शकते. त्यामुळे जागे झाल्यानंतर आपल्याला शरीराला पाण्याची कमतरता भरून काढण्याची आवश्यकता असते. त्याशिवाय कॅफिन हा लघवीचे प्रमाण वाढविणारा पदार्थ असल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी अधिक कमी होऊ शकते.

हेही वाचा – बदाम, ओट्स, डाळ खाण्यापुर्वी भिजवल्यास मिळतील दुप्पट फायदे; तज्ज्ञ काय सांगतात, वाचा

सकाळी उठल्यानंतर कॉफीला पर्याय काय?

झोपेतून उठल्यावर खोलीच्या तापमानानुसार एक ग्लास पाणी पिणे किंवा लिंबू घालून कोमट पाणी पिणे, सूर्यप्रकाशात बाहेर पडणे आणि भरपरू पौष्टिक घटक, प्रथिनयुक्त नाश्ता करणे यांसारख्या खरोखर सोप्या गोष्टी आहेत. तेव्हा कॉफीचा आनंद घेण्यापूर्वी या महत्त्वपूर्ण बाबी जरूर लक्षात घ्या.