निरोगी राहण्यासाठी आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण बहुतेक आजार हे चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होतात. आपल्याला सर्वांनाच हे माहित आहे की, दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. दूध सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे आणि आजारी व्यक्तीपासून ते निरोगी व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्ही हे पाहिलेच असेल की, बरेच लोक सकाळी दूध पितात आणि बर्याच लोकांना रात्री दूध प्यायला आवडते. त्याचवेळी यामध्ये देखील दुमत असते की कोणत्या वेळी दूध पिणे योग्य आहे?
अवेळी दूध पिणंही घातक ठरू शकतं. दूध सकाळी प्या किंवा रात्री प्या. जसे त्याचे फायदे आहेत, तसेच त्याचे नुकसानही आहे. दूध पिण्याची योग्य वेळ जाणून घेण्यापूर्वी आधी सकाळी आणि रात्री दूध पिण्याचे फायदे, नुकसान काय आहेत ते पाहुयात.
रात्री दूध पिणे शक्यतो टाळावे –
दुधाची ऍलर्जी आहे, अशा लोकांनी रात्री दूध पिणे टाळावे. दूध पचायला जड असतं. त्यामुळे ज्यांची पचन क्षमता कमजोर आहे. रात्री झोपण्यापूर्वी दुधाचे सेवन केल्याने तुम्हाला पचनाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की एका ग्लास दुधात १२० कॅलरीज असतात. झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने पचनक्रिया मंद होऊ शकते. झोपण्यापूर्वी खाल्लेल्या कोणत्याही पादार्थाच्या कॅलरीज बर्न करणे थोडे कठीण आहे. यामुळेच वाढलेल्या वजनाने त्रासलेल्या लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी दूध पिऊ नये.
रात्रीच्या दुधामुळे कफ होत असल्यास –
रात्री झोपताना दूध प्यायल्याने कफ होतो अशी अनेकांची तक्रार असते. काही प्रमाणात हे खरे असले तरी खूप गार दूध पिऊ नये. दूध एका लहान पातेल्यात काढून थोडे कोमट करुन मगच प्यायला हवे. तसेच दूध प्यायल्यावर त्यावर घोटभर कोमट पाणी आवर्जून प्यायला हवे. म्हणजे दुधाचे जे कण घशात अडकलेले असतात ते निघून जाण्यास मदत होते आणि कफ होत नाही.
दूध पिण्याची योग्य वेळ
दुधामुळे होणारी कोणतीही समस्या टाळण्यासाठी, दूध पिण्याची योग्य वेळ कोणती आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. नॅशनल स्लीप फाऊंडेशनच्या मते, दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ झोपेच्या दोन किंवा तीन तास आधी आहे. जर तुम्हाला त्याच्याशी संबंधित दुष्परिणामांपासून सुरक्षित राहायचे असेल, तर झोपण्याच्या तीन तास आधी दूध प्या आणि दूध पिल्यानंतर लगेच झोपू नका.
हेही वाचा – अति तेथे माती! जास्त लिंबू पाणी पिण्याचे फायद्यांसह ‘हे’ तोटेही जाणून घ्या
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रात्री दूध पिऊ नये.