Bottled cold coffee can cause blood insulin levels : आपल्यातील अनेकांना कोल्ड कॉफी खूपच आवडते. हिवाळा असो किंवा उन्हाळा ही कोल्ड कॉफी पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. कोल्ड कॉफी बनवायला अतिशय सोपी आणि चवीला स्वादिष्ट असे पेय आहे. पण, बाटलीबंद कोल्ड कॉफी मानवी शरीरावर विपरीत परिणाम करू शकते का? तर त्यावर उपाय म्हणून दी इंडियन एक्स्प्रेसने के. जे. सोमय्या मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या पोषण व आहारशास्त्र विभागाच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ डॉक्टर मोनल वेलांगी यांच्याशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉक्टर मोनल वेलांगी म्हणाल्या की, मार्केटमध्ये मिळणाऱ्या बंद बाटलीतील कोल्ड कॉफीमध्ये सरासरी १५ ग्रॅम प्रति १०० मिलिलिटर साखर असते. या साखरेमुळे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत वाढ होऊन इन्सुलिन वाढू शकते. बाटलीबंद कोल्ड कॉफी वारंवार प्यायल्याने रक्तातील इन्सुलिनची पातळी वारंवार वाढू शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास, त्यामुळे रक्तातील साखर वाढून टाईप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो, असे हेल्दी इंडियन प्रोजेक्ट (THIP)च्या पोषणतज्ज्ञ गरिमा देव वर्मन यांनी सांगितले आहे.

इन्सुलिन स्पाइक्स कमी करण्याचे सोपे उपाय :

१. शुगर फ्री कोल्ड कॉफी हा एक चांगला पर्याय आहे. कारण- मून एट अल. २०२१ च्या मेटा विश्लेषणाने सूचित केले आहे की, जास्त कॅफिन सेवनाने इन्सुलिन प्रतिरोध आणि संवेदनशीलतेवर लक्षणीय परिणाम झालेला नाही. कॅफिनच्या सेवनामुळे एपिनेफ्रिन संप्रेरक वाढते, ग्लुकोज, इन्सुलिन शरीरात सोडणे कमी होते, असे डॉक्टर मोनल वेलांगी म्हणाल्या आहेत.

२. पॅकबंद कोल्ड कॉफी पिण्यापूर्वी किंवा ऑर्डर करण्यापूर्वी एक वाटी सॅलड खा. कारण- सॅलडमधील फायबर इन्सुलिनची वाढ कमी करण्यास मदत करील, असे पोषणतज्ज्ञ गरिमा देव वर्मन यांनी सांगितले आहे.

हेही वाचा…one legged balances: तुम्ही दहा सेकंद एका पायावर उभं राहू शकता का? नाही! तर तुमचं आयुष्य होऊ शकतं कमी? वाचा डॉक्टरांचे मत

३. शुगर फ्री कोल्ड कॉफी ही प्रतिकप सुमारे १/४ चमचा डिकॅफिनेटेड कॉफीसह पिणे हा चांगला पर्याय ठरेल.

४. आरोग्याच्या दृष्टिकोनातून दररोज दोन कपपेक्षा कमी कॉफी पिणे उत्तम ठरेल. कारण- आरोग्यावरील होणारे इतर विपरीत परिणाम टाळण्यासाठी, संसर्गजन्य रोग आणि कॉमोरबिडीटीचा धोका कमी करण्यासाठी ही एक गुरुकिल्ली आहे.

५. पोषणतज्ज्ञ गरिमा देव वर्मन म्हणाले की, मधुमेहींनी कॉफी पिणे पूर्णपणे टाळले पाहिजे आणि ३० किंवा ५० च्या वयाच्या निरोगी व्यक्तींनी दैनंदिन भोग म्हणून नाही, तर अधूनमधून ट्रीट म्हणून ही कॉफी प्यावी.

डॉक्टर मोनल वेलांगी म्हणाल्या की, कॉफीचे पहाटे किंवा रात्री उशिरा सेवन करणाऱ्या बहुतेक लोकांना कमी ग्लुकोज, प्री-डायबेटिस आणि मधुमेहामुळे ग्रस्त असलेल्या लोकांना अशा स्पाइकचा अधिक धोका असतो. तर, पोषणतज्ज्ञ गरिमा देव वर्मन यांच्या म्हणण्यानुसार ज्यांचे वजन जास्त आहे, ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना प्री-डायबेटिक आहे, तसेच लहान मुले किंवा वृद्धांनी पॅकबंद कोल्ड कॉफी पिऊ नये.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drinking of bottled cold coffee can cause blood insulin levels to increase doctor said easy ways of reducing these spikes asp