पचनाच्या आरोग्याचा विचार केला तर अनेक समज आणि गैरसमज अनेकांच्या मनात असतात. एक सामान्य समज असा आहे की, अन्नाबरोबर किंवा नंतर पाणी प्यायल्याने पोटातील अ‍ॅसिड्स पातळ होऊ शकतात, ज्यामुळे ते अन्न बारीक करण्यास कमी परिणामकारक बनतात, ज्यामुळे पचनशक्ती बिघडते आणि ब्लोटिंग आणि गॅससारख्या इतर समस्या उद्भवतात.

डॉ. राकेश गुप्ता, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स, नवी दिल्ली, अंतर्गत औषध विशेषज्ज्ञ यांच्या मते, सत्य हे आहे की पोटातील अ‍ॅसिड हे पाण्याच्या सेवनाकडे दुर्लक्ष करून प्रभावीपणे कार्य करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. योग्य हायड्रेशन राखण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे आणि ते पचनास अडथळा आणण्याऐवजी खरोखर मदत करू शकते.

हेही वाचा… करवा चौथचा उपवास करताय? काय खावं काय खाऊ नये हे कळत नाहीय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

पोट गॅस्ट्रिक आम्ल तयार करते. मुख्यतः हायड्रोक्लोरिक आम्ल, जे अन्न पचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे पोटातील पचविणारे एंझाईम सक्रिय करण्यास आणि हानिकारक जीवाणूंचा नाश करण्यास मदत करते. पोटातील वातावरण खूप आम्लीय असते, ज्याचे pH सामान्यतः १.५ ते ३.५ च्यादरम्यान असते, ही pH लेव्हल योग्य पाचनासाठी आवश्यक आहे.

पोटातील आम्ल विरुद्ध पाणी

पोट हा एक स्नायूचा अवयव आहे, जो मोठ्या प्रमाणात अन्न आणि द्रव सामावून घेण्यासाठी डिझाइन केलेला आहे. जेव्हा तुम्ही खाता किंवा पिता तेव्हा शरीरात येणारे पदार्थ सामावून घेण्यासाठी पोटाचा विस्तार होतो. पाणी पोटात जाते आणि त्यातील घटकांमध्ये मिसळते, परंतु ते गॅस्ट्रिक ज्यूसच्या एकूण अ‍ॅसिडिटीमध्ये लक्षणीय बदल करत नाही.

हेही वाचा… “गेले सहा दिवस मी बेडवर…”, रकुल प्रीत सिंगला झाली गंभीर दुखापत, इन्स्टाग्रामवर VIDEO शेअर करत दिली माहिती, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

पोटात अम्लीय वातावरण राखण्याची उल्लेखनीय क्षमता असते. अन्नाची उपस्थिती पोटाला अधिक गॅस्ट्रिक अ‍ॅसिड तयार करण्यास चालना देते, ज्यामुळे पचनासाठी योग्य pH परत मिळवण्यात मदत होते. पाणी प्यायल्याने पोटातील सामग्रीचे प्रमाण थोड्या वेळासाठी वाढू शकते, पण गॅस्ट्रिक आम्लाची निर्मिती एक सतत प्रक्रिया आहे, जी शरीराच्या गरजांनुसार बदलते.

पचनक्रियेत पाण्याची भूमिका काय आहे?

पाचक आरोग्यासह संपूर्ण आरोग्यासाठी हायड्रेशन अत्यावश्यक आहे. जेव्हा तुम्ही जेवणापूर्वी, जेवणाच्या दरम्यान आणि नंतर पाणी पिता, तेव्हा ते पचनात अनेक प्रकारे मदत करते. पाणी पोषक तत्वांचे विघटन करण्यास मदत करते आणि पोटातील एन्झाइमॅटिक प्रक्रियेस समर्थन देते. हे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत ठेवते, बद्धकोष्ठतेचा धोका कमी करते. पचनानंतर संपूर्ण शरीरात पोषक द्रव्ये वाहून नेण्यास पाणी मदत करते.

जेवणाबरोबर पाणी पिण्याचे काय फायदे आहेत?

पाणी प्यायल्याने अन्न नरम होण्यास मदत होते, ज्यामुळे पोटाला ते पचवायला सोपे जाते. पाणी तुम्हाला पोट भरण्यास मदत करू शकते, ज्यामुळे अधिक खाणे तुम्ही टाळू शकता, टाळता आणि वजन नियंत्रणात मदत होते. पाणी तुमच्या चवीला ताजेतवाने करते, अन्नाची चव वाढवू शकते आणि तुमच्या जेवणाचा अनुभव अधिक आनंददायी बनवते.

जर तुम्हाला सतत पचनाच्या समस्या येत असतील, तर हेल्थकेअर प्रोफेशनलचा सल्ला घेणे नेहमीच चांगली कल्पना असते. पाणी आणि पोटातील आम्ल यांच्यातील संबंध समजल्याने तुम्ही तुमच्या आहाराबाबत योग्य निर्णय घेऊ शकता.

(टीप : हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. आपल्या दिनचर्येत कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या आरोग्य चिकित्सकाचा सल्ला घ्या.)