Coriander Water For Thyroid: थायरॉईड हा एक आजार आहे ज्यामध्ये शरीरात आयोडीनची कमतरता असल्याने थायरॉईड ग्रंथीला सूज येते. थायरॉईड नियंत्रणात न राहिल्यास अनेक आजारांचा धोका वाढू लागतो. थायरॉईड रोग पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त प्रभावित करतो. आहारात सोया पावडर, सोया प्रोटीन आणि सोया कॅप्सूलचे जास्त सेवन केल्याने थायरॉईडचा त्रास होऊ शकतो. जेव्हा थायरॉईड ग्रंथी सक्रिय झाल्याने टी ३ व टी ४ हे हॉर्मोन्स शरीरात अधिक स्रवतात तेव्हा शरीर सर्वच प्रक्रियांसाठी मागणी करू लागते याला हाइपरथायरायडिज्म असेही म्हणतात. थायरॉईड मुख्यतः आपल्या खराब जीवनशैलीचा परिणाम असला तरी काही घटनांमध्ये अनुवांशिक थायरॉईड झाल्याचे सुद्धा दिसून आले आहे. जर आपल्यालाही हा त्रास असेल तर आज आपण त्यावर सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत.
थायरॉईडवर उपाय जाणून घेण्याआधी थायरॉईडची लक्षणे जाणून घेऊयात.
- वजनात अचानक वाढ होणे
- मांसपेशी कमकुवत होणे
- ताण व थकवा जाणवणे
- दृष्टी कमजोर होणे
- डोळे चुरचुरणे
- चिडचिड
- झोप न लागणे
धण्याच्या पाण्याने थायरॉईड कमी होऊ शकतो का?
थायरॉईडवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक औषधे बाजारात उपलब्ध आहेत पण त्यातील सर्वात गुणकारी व त्याहूनही सुरक्षित औषध तुम्हाला किचनमध्येच सापडेल. हे औषध म्हणजे धण्याचे पाणी. आयुर्वेदिक तज्ज्ञ व योग गुरु श्री नित्यानंदम यांच्या माहितीनुसार थायरॉईडवर उपचारासाठी धण्याचे पाणी गुणकारी ठरू शकते. या पाण्यात विविध प्रकारचे अँटी ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे औषधीय सत्व शरीराला लाभतात. धण्यामध्ये असणाऱ्या खनिज व व्हिटॅमिनमुळे सुद्धा थायरॉड वाढवणारे हार्मोन्स कमी होण्यास मदत होते.
हे ही वाचा<< मनुक्याचे पाणी ‘या’ ५ आजारात करते अमृतासारखे काम; कधी व कसे सेवन करणे ठरेल फायदेशीर?
धण्याच्या पाण्याचे सेवन कसे करावे?
जर आपल्याला थायरॉइडचा त्रास असेल तर दिवसातून निदान दोन वेळा तरी धण्याच्या पाण्याचे सेवन करावे. यासाठी धण्याची पावडर पाण्यात मिसळूनही आपण सेवन करू शकता. किंवा तुम्ही जेव्हा पाणी पिणार असाल त्याच्या काही वेळ आधी धण्याच्या बिया पाण्यात टाकून उकळून घ्या. धण्याच्या बिया काही वेळ पाण्यात भिऊन मग उकळल्यास अधिक फायदा होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)