आजकाल लोकं मोबाईल हातात न घेता इयरफोन किंवा हेडफोन लावून बोलणे पसंत करतात. मिटींगदरम्यान, गाणी ऐकण्यासाठी तसेच ऑनलाईन शाळेदरम्यान मुलांचा इयरफोन वापर करणं वाढलं आहे.कानात इयरफोन घालून काम करणं सोयीस्कर तर आहे; मात्र त्याचा अतिवापर केल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. नियमित हेडफोन, एअरफोन वापरणाऱ्या दहापैकी दोन तरुणांना बहिरेपणा येत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. इअरबड्स तुमच्या कानाच्या अगदी जवळ असतात, त्यामुळे त्यांचा जास्त वापर केल्याने श्रवणशक्ती कमी होऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ अंकुश सायल यांच्या मते, मोठ्या आवाजात म्युझिक ऐकत असताना तसेच बराच वेळ इयरफोन वापरल्यास त्याचा कानांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे कानात इन्फेक्शन, ऐकण्याची क्षमता कमी होणे, बहिरेपणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे इयरफोन, हेडफोन वापरण्याची योग्य पद्धत काय आहे ते समजून घेणे गरजेचे आहे.

हेडफोन लावल्यानंतर वॉल्यूम सेट करा

वॉल्यूम फिटिंग तपासल्यानंतरच आवाज वाढवा, काही लोक आधीच फोन किंवा हेडफोन जास्त वॉल्यूमवर सेट ठेवतात पण ही सवय तुमचे कान खराब करू शकते. हेडफोन वापरण्यापूर्वी आवाज कमी केला पाहिजे. कानात अचानक आवाज आल्यामुळे कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही तुमचे हेडफोन कोणासोबत शेअर करत असाल, तर त्यामुळे कानात इन्फेक्शन होऊ शकतं. जर घरातील अनेकांना हेडफोनची गरज असेल तर तुम्ही सर्वांनी स्वतःसाठी स्वतंत्र हेडफोन ठेवावा.

हेही वाचा – तासनतास मोबाईल, लॅपटॉप वापरून डोळ्यांवर ताण येतोय? ‘अशी’ घ्या काळजी

हेडफोन-इयरफोन जास्त वापरल्याने होणारे तोटे

कान दुखणे –

बराच वेळ मोठ्या आवाजात हेडफोन किंवा इयरफोन लावून बोलले किंवा गाणी ऐकल्यामुळे कानात वेगळाच आवाज ऐकायला येतो. त्यामुळे कान दुखण्याची शक्यता वाढते.

मेंदूवर वाईट परिणाम-

तज्ज्ञांच्या मते, हेडफोन इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी निर्माण करतात. त्यामुळे त्याचा दीर्घकाळ वापर केल्यास मेंदूवर वाईट परिणाम होतो.

कानात मळ साठणे-

तासनतास इयरफोन किंवा हेडफोन वापरल्याने कानात मळ साठू शकतो. त्यामुळे कानात इंन्फेक्शन, ऐकण्याची क्षमता कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

कानाचा संसर्ग-

अनेकदा लोक हेडफोन इतरांबरोबर शेअर करतात. पण यामुळे इअरफोनच्यामार्फत बॅक्टेरिया, जंतू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या कानापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे कानाला संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हेडफोन किंवा इअरफोन कोणाशीही शेअर करणे टाळा. जर दिलेत तर ते स्वच्छ केल्यानंतरच तुम्ही वापरा.

चक्कर येणे-

तज्ज्ञांच्या मते, जास्त वेळ इअरफोन लावून गाणी ऐकल्याने, बोलण्याने किंवा मोठा आवाज ऐकल्यास तुम्हाला चक्कर येऊ शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earphones side effects if you are constantly using headphones experts gave shocking information srk