5 Superfoods To Increase Your Good Cholesterol levels : हृदयाच्या आरोग्याबाबत जगभरातील लोकांना काळजी वाटते. विशेषत: भारतीय नागरिक हृदयाच्या हेल्थकडे गांभिर्याने पाहतात. रोजच्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश करून आरोग्य सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. परंतु, चुकीच्या पदार्थांचं सेवन केल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहत नाही आणि आरोग्याच्या समस्या डोकं वर काढतात. शरीरात असलेलं एचडीएल कोलेस्ट्रॉल हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीत आरोग्याच्या समस्या सोडवण्यासा मदत करू शकतं. हैदराबाच्या यशोदा रुग्णालयातील सीनियर कन्सलटंट डॉ. व्ही. राजासेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एचडीएल धमण्यांमधून यकृताकडे जास्त कोलेस्ट्रोलचं निरसन करतं, त्यामुळे हृदय रोगाचा धोका टळण्यास मदत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यशोदा रुग्णालयाचे सीनियर कन्सलटंट फिजिशीयन डॉ. दिलीप गुडे यांच्या माहितीनुसार, पुरषांमध्ये एचडीएलची पातळी 40mg/dl किंवा त्यापेक्षा जास्त असली पाहिजे. तर स्त्रियांमध्ये याचं प्रमाण 50 mg/dl किंवा त्यापेक्षा अधिक असणं गरजेचं आहे. एचडीएल जास्त प्रमाणात असल्यावर हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीत रोगांना प्रतिबंध करण्यास मदत होते. ८० पेक्षा जास्त प्रमाणात असलेलं एचडीएल कोलेस्ट्रोल हृदयाचं आरोग्य बिघडवू शकतं.

नक्की वाचा – आहारात फक्त २ स्ट्रॉबेरींचा समावेश करा, हृदय धडधडेल अन् मेंदू धावेल, तज्ज्ञांनी सांगितलेले फायदे जाणून घ्या

या ५ पदार्थांचं सेवन ठरेल फायदेशीर

1) अॅव्होकॉडो

या फळामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण अधिक असतं.त्यामुळे शरीरात एचडीएल कोलेस्ट्रोल वाढण्यास मदत मिळते. भारतीय नागरिक अव्होकॉडो फळ सॅंडविच आणि सॅलडसोबत खाऊ शकतात.

२) फॅटी फिश

सार्डिन, मॅक्रेल आणि अन्य मोठे मासे भारतात गोड्या पाण्यात आढळतात. या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडचं प्रमाण खूप जास्त असतं. या माशांचं सेवन केल्यावर एचडीएल कोलेस्ट्रोलचं प्रमाण वाढतं आणि शरीरातील सूज कमी होते. तसंच हृदय निरोगी ठेवण्यासही हे मासे फायदेशीर ठरतात.

३) काजू आणि बिया

काजू, बदाम, अक्रोड, जवस आणि चिया सिड्स यांसारख्या बियांचं सेवन केल्यावर शरीराला हेल्दी फॅट्स आणि न्यूट्रिशन्स मिळतं. तसंच शरीरात एचडीएल कोलेस्ट्ऱॉलचं प्रमाणही वाढतं. या बिया स्नॅक्स आणि अन्य पदार्थात मिक्स करून खाऊ शकता.

४) ऑलिव्ह ऑईल

अन्नपदार्थांमध्ये ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्यास शरीरातील एचडीएलची पातळी वाढते. भाज्यांमध्ये किंवा सॅलड शिजवताना या ऑईलचा वापर करू शकता. आरोग्यासाठी हे ऑईल फायदेशीर असते.

५) सोयाबीन आणि शेंगा

सोयाबीन आणि शेंगा, जसं की मसूराची डाळ, चने आणि काळे सोयाबीन यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि नैसर्गिक प्रथिने असतात. या पदार्थांचं सेवन केल्यावर शरीरात हेल्दी कोलेस्ट्रॉल मिळण्यात मदत होते. तुम्ही हे पदार्थ डाळीच्या भाज्यांमध्ये मिक्स करून खाऊ शकता.