पोटफुगीच्या समस्येमुळं पचन क्रियेत अडथळा निर्माण होतो आणि आपल्याला अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं. खाण्याच्या वाईट सवयी, हेवी मिल्स, दारुचं व्यसन, जेवणाची अचूक वेळ आणि इतर काही गोष्टींमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आतड्यांचे आजार होण्याची समस्या वाढते. पचन क्रिया चांगली असेल, तर तुमचं आरोग्य, शरीर, मन, आत्मा या गोष्टींचा समोताल योग्य पद्धतीने राहण्यास मदत होते. आतडांच्या समस्यांवर वेळीच उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं असतं. आतड्यांचे आरोग्य हे दुसऱ्या मेंदुप्रमाणे असतं, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. आतड्यांच्या आजारावर मात करण्यासाठी सकस आहाराची गरज असते. फिटनेस आणि न्यूट्रिशन एक्सपर्ट व्ही, पी, विटाबायोटिक्स यांनी पचन क्रिया चांगली राहण्यासाठी काही फळांचं सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठ्या प्रमाणात फायबर असलेली फळे आणि भाज्या

सफरचंद, केळी, बेरी, हिरव्या भाज्या, मुळा यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. या फळांचे आणि भाज्यांचे सेवन केल्यामुळं पचन क्रिया चांगली राहते. यामध्ये विटॅमिन्स आणि फायबर असल्याने तुमच्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते. तसेच बद्धकोष्टता आणि आतड्यांच्या आजारांपासून तुमची सुटका होण्यास मदत मिळते.

नक्की वाचा – धावल्याने शरीराला होतात हे फायदे, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेला महत्वाचा सल्ला

प्रोबायोटिक फूड्स

प्रोबायोटिक फूडचं सेवन केल्यानं पोटांचे विकारांपासून दिलासा मिळू शकतो. दही खाल्ल्यानेही तुमच्या शरीरात पचन क्रिया चांगली राहते. ब्रेकफास्ट करताना तुम्ही दही खाऊ शकता. दही खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. फळांसोबत दही खाल्ल्यावर ते खूप चविष्ट लागतं. दह्याचं सेवन केल्यामुळं पचन क्रिया अधिक चांगली होते. त्यामुळे आतड्यांचे आजार उद्भवण्याची शक्यता कमी असते.

धान्याचे सेवन करा

आहारात मोठ्या प्रमाणात व्होल ग्रेन्स असणे आवश्यक असते. मिलेट राईसचाही समावेश केल्याने आरोग्याला फायदे होतात. फायबर, अॅंटि ऑक्सिडन्ट्स, आणि इतर व्होल ग्रेन्स पदार्थांचं सेवन केल्यामुळं आतड्यांचे विकार होण्याचा धोका टळू शकतो. शरीर निरोगी राहण्यासही याचा फायदा होऊ शकतो. तसेच बद्धकोष्टतेपासूनही संरक्षण करण्यात याची मदत होऊ शकते. गव्हाचे पिठातून बेड्स केले जातात. तसेच रोटी, बाजरी, ज्वारी हे व्होल ग्रेन्सचे महत्वाचे सोर्स आहेत.

औषधी वनस्पती आणि मसाले

जिंजर, बडीशेप, मिंट आणि हळद अशाप्रकारच्या औषधी वनस्पती आणि मसाले पोटाच्या विकारांना रोखण्यास फायदेशीर ठरू शकतात. या पदार्थांचं सेवन केल्यावर मळमळ, छातीची जळजळ आणि पोटाचे विकरांपासून सुटका होऊ शकते.

बिया

बियांमध्ये मोठ्या प्रमाणात अॅंटीऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि विटॅमिन असतं. फ्लॅक्स सीड्स आणि चिया सीड्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फायबर फ्लॅक्स सीड्समध्ये असतात. या बियांच्या सेवनामुळं जळजळ कमी होते आणि कोशिका भित्ती स्थिर राहण्यास मदत मिळते. आतड्यांचे शु्द्धीकरण आणि पचन क्रिया चांगली राहण्यासही बिया खाणे फायदेशीर ठरतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eat these five foods to strengthen your immune system and maintain healthy digestive tract read experts advise nss
First published on: 13-02-2023 at 18:25 IST