माणसाच्या कोणत्याही चांगल्या किंवा वाईट सवयींचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झालेला पाहायला मिळतो. चांगली जीवनशैली, पुरेपूर झोप, चांगला आहार घेतल्याने आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहत नाही तर मानसिकदृष्ट्याही मजबूत राहतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी खाल्ल्या तर यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. या गोष्टी खाल्ल्यानंतर तुमचा दिवसभराचा थकवा दूर होतो आणि यामुळे रात्री चांगली झोप देखील लागते. तर जाणून घेऊया अशा तीन गोष्टींबद्दल ज्यांच्या सेवनाने आपल्या आरोग्याला चांगला फायदा होतो.
एक ग्लास दूध
हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी रोज एक ग्लास दूध प्यायला हवे, असे आरोग्य तज्ज्ञ देखील सांगतात. दूध आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे. दुधामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम आणि आयोडीनसह अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आढळतात, ज्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. थंडीच्या दिवसात एक ग्लास कोमट दूध प्यायल्याने तुमच्या शरीराला खूप आराम मिळतो. हवं असल्यास तुम्ही त्यात थोडी हळदही घालू शकता. दुधासोबत हळदीचे दाहक-विरोधी गुणधर्म आरोग्यास भरपूर फायदा देतात.
( हे ही वाचा: बदाम, काजू आणि पिस्ता किती प्रमाणात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य मात्रा)
बदाम
बदाम खाल्ल्याने आरोग्याला भरपूर फायदा मिळतो. बदामामध्ये हेल्दी फॅट्स, अमिनो अॅसिड, मॅग्नेशियम यांची मात्रा मुबलक प्रमाणात आढळते. तुम्ही जर दररोज रात्री काही बदाम खाल्ले तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे मिळतील. बदाम खाल्ल्यानंतर शांत आणि चांगली झोप येते. खाल्ल्यानंतरही झोप येते. बदामामध्ये असलेले अमिनो अॅसिड केसांसाठी आणि त्वचेसाठी भरपूर फायदेशीर असतात. आपली बॉडी जेव्हा स्लिप मोडवर असते, तेव्हा अमिनो अॅसिड त्वचा आणि केसांसाठी चांगले काम करण्यास सुरुवात करतात.
केळी
तुम्ही अनेक वर्कआऊट करणाऱ्या लोकांना नाशत्यामध्ये केळी खाताना पाहिलं असेल. पण तुम्हाला माहीत आहे का, जर तुम्ही झोपण्यापूर्वी केळी खाल्ली, तर त्याचा आरोग्याला भरपूर फायदा होतो. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, जे ट्रिप्टोफॅन बनवण्यास मदत करतात. जे मेंदूच्या विकासासाठी चांगले मानले जाते. तुम्ही जर दररोज झोपण्यापूर्वी केळी खाल्ली, तर तुम्हाला चांगली झोप लागते आणि तुमचे मन देखील शांत राहते. याशिवाय, केळ्यामध्ये मॅग्नेशियम देखील मुबलक प्रमाणात असते, जे स्नायू आणि मज्जातंतूंना आराम देण्याचे काम करते. तसच यामध्ये असेलेले फायबर शरीरासाठी चांगले मानले जातात.