Healthy Food In Monsoon : पावसाळा आला की अनेकांना गरमा गरम भजी, समोसे आणि चहाचा आनंद घ्यावा असे वाटते. पावसाच्या वातावरणात हे पदार्थ जरी आपल्याला तृप्त करत असले तरी आरोग्यासाठी हे पदार्थ खरंच चांगले आहेत का?
पावसाळ्यात सर्वात जास्त रोगराई पसरते. अशात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याची गरज जास्त भासते. अनेक प्रकारचे आजार, ॲलर्जीचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो; त्यामुळे पावसाळ्यात आपण काय खातो यावर लक्ष देणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ताजी फळे, भाज्या, घरी तयार केलेल्या पौष्टिक अन्नाचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या वरिष्ठ न्युट्रिशन थेरेपिस्ट मीनल शाह यांनी द इंडियन एक्स्प्रेसच्या एका वृत्तात पावसाळ्यात चांगले आरोग्य जपण्यासाठी दहा खाद्यपदार्थांविषयी सांगितले आहे.

हिरवी मिरी – हिरव्या मिरीच्या दाण्यांमध्ये पाइपरिन असतात, जे एक अल्कलॉइड आहेत आणि याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि के भरपूर प्रमाणात आढळतात. हिरव्या मिरेपूडमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात, जे फ्री रॅडिकल्स नष्ट करून आजाराचा धोका कमी करतात. याशिवाय हे मिरेपूड हायड्रोक्लोरिक ॲसिडचे उत्पादनाला प्रोत्साहन देत गॅसेसची समस्या दूर करतात, त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. यात अँटिमायक्रोबायल गुणधर्म आहेत. मिरेपूड आरोग्यासाठी धोकादायक असलेले बॅक्टेरिया नष्ट करतात आणि अन्नाद्वारे होणाऱ्या विषबाधेचा धोका कमी करतात.

फळे – चेरी, जांभूळ, डाळिंब यांसारखी हंगामी फळे व्हिटॅमिन ए, सी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सयुक्त असतात. विक्रेत्यांकडून आधीच कापलेली फळे खाणे आणि त्यापासून रस पिणे टाळा आणि घरगुती उच्च-गुणवत्तेची ताजी फळे खा आणि ज्यूस प्या.

द्रव – सूप, मसाला चहा, ग्रीन टी, डाळ इत्यादी द्रवांचा आहारात समावेश करा, कारण हे हायड्रेनशसाठी चांगले आहेत आणि रोगप्रतिकारकशक्तीसुद्धा चांगली ठेवतात.

भाज्या – पावसाळा हा दुधी भोपळ्याचा हंगाम असतो. कडधान्य, भाज्या, पराठे, सूप, सॅलेड इत्यादी पदार्थांमध्ये दुधी भोपळ्याचा समावेश करा. कच्च्या भाज्यांऐवजी वाफवलेले सॅलेड खा. कारण त्यात आरोग्यास हानिकारक बॅक्टेरिया असतात आणि भाजी वाफवल्यानंतर ते नष्ट होण्यास मदत होते.

प्रोबायोटिक्स – आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी दही, ताक, लोणच्याचा आहारात समावेश करा. हे पदार्थ आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत करतात, जे आरोग्यास हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात.

हेही वाचा : तुम्ही महिनाभर कोक, पिझ्झा, बर्गर, सँडविच खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल दिसतील? वाचा आहारतज्ज्ञांचे मत

प्रोटिन्स – आहारात प्रोटिनचा समावेश केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि आजारातून लवकर बरे होण्यास मदत होते. दूध आणि दूग्धजन्य पदार्थ, मूग डाळ, मसूर, सोया, अंडी आणि चिकन इत्यादी पदार्थ प्रोटिनचे चांगले स्त्रोत मानले जातात.

आले आणि लसूण – सर्दी, ताप दूर करण्यासाठी आले, लसूण प्रभावी उपाय म्हणून काम करतात. आले, लसणामध्ये अँटिबायोटिक आणि अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आढळतात. आल्याचा चहा घशाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. लसणामध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत. तुम्ही भाजी, चटणी, सूप, चहा इत्यादींमध्ये आले, लसणाचा वापर करू शकता.

मेथीचे दाणे – मेथीचे दाणे हे ऊर्जा वाढवण्यास मदत करतात. यामध्ये आवश्यक खनिजे असतात, जे ताप कमी करण्यास आणि पचन क्रियेशी संबंधित समस्या दूर करण्यास फायदेशीर असतात.

हळद – हळदीमध्ये कर्क्यूमिन असतात, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. गॅस्ट्रिक अल्सर आणि रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यास मदत करतात. एक चमचा हळद, दूध आणि मधाबरोबर किंवा गरम पाण्यात एकत्रित करून प्या.

ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् – पावसाळ्यात अन्न आणि पाण्याद्वारे आजारांचा धोका वाढतो. अशावेळी प्रतिकारशक्ती वाढवण्यास ओमेगा-३ फॅटी ॲसिड फायदेशीर ठरतात. मासे, ऑयस्टर, अक्रोड, पिस्ता, चिया सीड्स, जवस इत्यादी तेलबियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात.