Best Fruit To Lower Cholesterol: आजच्या काळात सर्व वयोगटातील लोक अनेक आजारांशी झुंज देत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे बिघडलेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी. बिघडलेक्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर सर्वात मोठा परिणाम होत आहे आणि मोठ्या संख्येने लोक वाढत्या कोलेस्टेरॉलच्या समस्येशी झुंजत आहेत. कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीरासाठी एक आवश्यक घटक आहे, जो पेशी आणि संप्रेरकांच्या निर्मितीस मदत करतो. शरीरात कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार असतात. एक वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) आणि दुसरे चांगले कोलेस्ट्रॉल (HDL). जेव्हा वाईट कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा ते रक्ताच्या नसांमध्ये जमा होते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. चांगले कोलेस्ट्रॉल वाढणे हे चांगले लक्षण आहे आणि ते एलडीएल नियंत्रित करते.
तज्ञांच्या मते, आपल्या शरीरातील एकूण कोलेस्टेरॉलची सामान्य पातळी २०० mg/dL पेक्षा कमी असते. LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल १०० mg/dl पेक्षा कमी आणि HDL म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल ६० mg/dl पेक्षा जास्त असावे. जेव्हा शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढते, तेव्हा ते रक्ताच्या धमन्यांमध्ये जमा होते आणि रक्तप्रवाहावर परिणाम होतो. ही स्थिती धोकादायक आहे. तुम्हाला हे माहीत नसेल पण रोज सफरचंद खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि अनेक आजारांपासून आराम मिळतो.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जर उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्या लोकांनी दररोज २ सफरचंद खाणे सुरू केले तर खराब कोलेस्ट्रॉल (LDL) सुमारे ४० टक्क्यांनी कमी होऊ शकते. नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. संशोधकांच्या मते सफरचंद खाल्ल्याने शरीरात जमा झालेले कोलेस्टेरॉल निघून जाईल आणि हृदयाचे आरोग्य मोठ्या प्रमाणात मजबूत होईल. सफरचंदमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, जे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. सफरचंदात पॉलिफेनॉल आणि फायबर चांगल्या प्रमाणात असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. फायबर आपल्या शरीरात पोहोचते आणि फॅटी ऍसिड तयार करते, ज्यामुळे यकृतातील कोलेस्टेरॉलचे उत्पादन कमी होते. सफरचंद शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून टाकते.
( हे ही वाचा: नसांमध्ये अडकलेले खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने काढून टाकतील ‘या’ बिया? कसे व कधी करावे सेवन जाणून घ्या)
हा अभ्यास इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगच्या संशोधकांनी २०१९ मध्ये केला होता. त्यांनी अभ्यासात सांगितले की, रोज एक सफरचंद खाणे वृद्धांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. तसेच हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो.सफरचंद खाल्ल्याने रक्ताच्या धमन्यांना आराम मिळतो आणि रक्तप्रवाह चांगला होतो. कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज किमान ३0 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. मांसाहाराचे प्रमाण कमीत कमी ठेवावे. आपली जीवनशैली निरोगी ठेवली पाहिजे. वेळोवेळी तपासणी करावी.