Heart Attack and Ice cream : अनेक लोकांना बाराही महिने आईस्क्रीम खायला आवडते. जेवणानंतर आईस्क्रीम खाल्ले, तर मन तृप्त होते. समोर आईस्क्रीम दिसले, तर अनेकांना मोह आवरत नाही. आईस्क्रीमप्रिय लोक आवडीने त्यांच्या फ्रिजमध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम ठेवतात. तुम्हालाही आईस्क्रीम खायला आवडते का? जर हो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरंच नियमित गोड खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? द इंडियन एक्स्प्रेसने मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ वेदिका प्रेमानी यांच्या हवाल्याने आईस्क्रीम आणि हृदयाच्या आरोग्याचा संबंध यांविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

आईस्क्रीम खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका उद्भवतो का?

प्रेमानी सांगतात, “आईस्क्रीममध्ये सॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस व साखरेचे प्रमाण जास्त असते आणि आईस्क्रीमचे अति सेवन केल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजाराचा, तसेच स्थूलता व टाईप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.”

हेही वाचा : टिफिनमध्ये मांसाहारी पदार्थ घेऊन जाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

जर तुम्हाला नियमित आईस्क्रीम खायला आवडत असेल, तर आरोग्याचा कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून आईस्क्रीम कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला वेदिका प्रेमानी देतात.

जिलेटो आणि सॉर्बेट

जिलेटो आणि सॉर्बेटसारख्या अनेक कमी फॅट्सयुक्त आईस्क्रीम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या लोकांनी कमी फॅट्सयुक्त आईस्क्रीम खावे. जिलेटो हे दूध आणि मलईपासून बनविले जाणारे आईस्क्रीम आहे आणि सॉर्बेट हे फळांपासून बनविले जाणारे आईस्क्रीम आहे; ज्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ अंड्याचा समावेश नसतो.

हेही वाचा : दिवसातून एकदाच जेवण अन् मध्यरात्री ३ वाजता व्यायाम; अभिनेता शाहरुख खानचा ‘हा’ फिटनेस फंडा खरंच फायदेशीर आहे का? वाचा तज्ज्ञांचे मत

प्रेमानी सांगतात की, सॉर्बेटमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे यात कमी कॅलरी आणि फॅट्स दिसून येतात. त्यामुळे आईस्क्रीमप्रिय लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय मानला जातो.
प्रत्येक वेळी आईस्क्रीम खाण्यापूर्वी त्यातील कॅलरी, फॅट्स व साखर यांचे प्रमाण तपासावे आणि त्यानुसार चांगला पर्याय निवडावा.

आईस्क्रीम खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत का?

“जर ताज्या व पौष्टिक घटकांपासून आइस्क्रीम तयार केले असेल, तर त्याचे आरोग्यदायी फायदे दिसून येतात. जसे फळे, कमी फॅट्सयुक्त दूध किंवा दह्यापासून बनविलेले आईस्क्रीम आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बहुतेक आईस्क्रीममध्ये फॅट्स, साखर व कॅलरी खूप जास्त प्रमाणात असतात,” असे प्रेमानी सांगतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating a lot of ice cream can really increase heart attack risk read what dietitian said ndj