Are Egg Whites Healthy : दैनंदिन प्रोटीनची (प्रथिने) गरज भागविण्यासाठी अनेक जण फक्त अंड्याचा पांढरा भाग खाणे पसंत करतात. तर आज एका इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आलोक चोप्रा यांनी दावा केला आहे की, अंड्याचा पांढरा एक ‘इम्फ्लेमेन्ट्री प्रोटीन’ आहे. त्यामुळे तुम्ही तोच एक भाग खाल्ल्यास तुमच्या शरीरासाठी तो योग्य नसतो. पण, जर तुम्ही अंड्याचा पांढरा आणि पिवळा भाग एकत्र खाल्ल्यास (Eating Egg Whites) तो एक संपूर्ण आहार बनतो आणि तो अधिक फायदेशीर ठरू शकतो. तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सल्लागार सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर नाडेडला हजारथैया, डॉक्टर आलोक चोप्रा यांच्याशी असहमत आहेत. कारण – अंड्याचा पांढरा भाग खाणे (Eating Egg Whites) योग्य आहे आणि ते आरोग्यासाठी चांगलेसुद्धा आहे. अंड्याच्या पांढऱ्या भागात भरपूर प्रोटीन्स आणि अमिनो ॲसिड असते; परंतु कॅलरी, कोलेस्ट्रॉल, चरबी कमी असते. त्यामुळे हृदय निरोगी राहते आणि वजन व्यवस्थापन आहारामध्ये अंड्याचा पांढरा भाग हा एक लोकप्रिय पर्यायसुद्धा ठरतो ; असे हजारथैयाचे मत आहे.

धरमशिला नारायणा हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सल्लागार, डॉक्टर महेश गुप्ता यांनीदेखील सांगितले की, अंड्याचा पांढरा भाग कमी चरबीच्या प्रोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो. बहुतेक लोकांसाठी अंड्याचा पांढरा भाग जन्मजात दाहक (इम्फ्लेमेन्ट्री प्रोटीन) नसतो आणि तो निरोगी आहाराचा भाग असू शकतो. त्यामध्ये रिबोफ्लेविन, सेलेनियम यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात; जे विविध शारीरिक कार्यांना समर्थन देतात.

हेही वाचा…Migraine Relief Trick : १५ ते २० मिनिटे गरम पाण्यात बुडवून बसा पाय! मायग्रेनची समस्या होईल कमी? वाचा डॉक्टरांचे मत

पण, अंड्याची ॲलर्जी किंवा संवेदनशीलता असलेल्या लोकांसाठी, अंड्याचा पांढरा भाग खरोखरच एक दाहक प्रतिक्रिया करणार ट्रिगर ठरू शकतो. डॉक्टर हजारथैया यांच्या मते, अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये ओव्हलब्युमिन, ओव्हुम्युकोइड यांसारखी प्रथिने असतात आणि त्यामुळे संवेदनशील व्यक्तींना ॲलर्जीचा प्रतिक्रियात्मक त्रास होऊ शकतो. “या प्रथिनांमुळे अतिसंवेदनशील व्यक्तींमध्ये ॲलर्जीची प्रतिक्रिया म्हणजेच सूज, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी किंवा पाचन समस्या यांसारखी लक्षणे दिसू शकतात. अशा परिस्थितीत अंड्याचा पांढरा खाल्ल्याने (Eating Egg Whites) शरीरात जळजळ होऊ शकते,” असे डॉक्टर गुप्ता यांनी स्पष्ट केले.

तर डॉक्टर हजारथैया म्हणतात की, यामुळे जळजळ, पाचन समस्या, त्वचेवर पुरळ किंवा श्वासोच्छ्वासाच्या त्रासाची लक्षणेसुद्धा जाणवू शकतात. त्याशिवाय संधिवातासारख्या स्थितीसुद्धा उद्भवू शकतात. अंड्याच्या पांढऱ्या भागातील काही प्रथिने जळजळ वाढवू शकतात. पण, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रतिसाद असू शकतो.

पण डॉक्टर गुप्ता म्हणाले की, अंड्याचा पांढरा भाग (Eating Egg Whites) सामान्य लोकांसाठी जन्मजात दाहक आहे हे सूचित करणारा कोणताही ठोस पुरावा नाही. “त्यातील उच्च गुणवत्तेची प्रथिने स्नायूंची दुरुस्ती आणि एकूण आरोग्य यांसाठी फायदेशीर ठरू शकतात. कोणत्याही अन्नाप्रमाणे तुमच्या शरीराचे ऐकणे आणि अंड्याचा पांढरा भाग खाल्ल्यानंतर (Eating Egg Whites) तुम्हाला काही प्रतिकूल प्रतिक्रिया जाणवल्यास आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे,” असे गुप्ता म्हणाले आहेत.

पण, बंगळुरूच्या एस्टर व्हाईटफील्ड हॉस्पिटलच्या मुख्य क्लिनिकल आहारतज्ज्ञ वीणा व्ही. म्हणतात की, अंड्याचा पिवळा भाग काही लोकांसाठी खाणे सोपे नसते. कारण- त्याबद्दल नकारात्मक धारणा आहे. त्यामध्ये कोलेस्ट्रॉल, अराचिडोनिक एसिड (arachidonic acid) असतात, जे ओमेगा-6 फॅटी आम्लांचे सदस्य आहेत. या घटकांमुळे शरीराला सूज येऊ शकते. पण सहसा, जर अंड्याच्या पिवळ्या भागाचे योग्य प्रमाणात सेवन केले, तर जळजळ होत नाही.

हेही वाचा…Standing Desks Not Good For Health : तुम्हीसुद्धा उभं राहून काम करता का? मग थांबा! तुम्हालाही होऊ शकतात या आरोग्य समस्या

अंड्याच्या पिवळ्या भागात ए, डी व ई जीवनसत्त्वे :

अंड्याच्या पिवळ्या भागात ए, डी व ई ही जीवनसत्त्वेही असतात. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये कमी कॅलरीज असूनही तो आरोग्यासाठी फायदेशीर असतो. अंड्यातील पांढरा भाग म्हणजे (Eating Egg Whites) पाणी आणि काही प्रथिने, प्रामुख्याने अल्ब्युमिन, जे स्नायूंची दुरुस्ती आणि वाढ जलद करतात, असे वीणा यांनी स्पष्ट केले. अनेक आहारातील प्रोटीनमध्ये चरबी आणि कार्बोहायड्रेट्स नसतात. त्यामुळे हे प्रोटीन बहुतेक लोकांसाठी चांगले आहे; ज्यांना अतिरिक्त कॅलरी किंवा कोलेस्ट्रॉलशिवाय प्रोटीन वाढवायचे असेल, त्यांच्यासाठी हा पर्याय बेस्ट आहे.

तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे बहुतेक लोकांसाठी, अंड्याचा पांढरा भाग (Eating Egg Whites) हा एक निरोगी, दाहकविरोधी अन्न पर्याय आहे. पण, जर एखाद्याला अंड्याचा पांढरा भाग खाल्ल्यानंतर वर सांगितल्याप्रमाणे काही लक्षणे जाणवल्यास, त्यांनी ॲलर्जी किंवा संवेदनशीलता वगळण्यासाठी आरोग्य सेवा प्रदात्याशी सल्लामसलत करावी. पण, त्याव्यतिरिक्त बाकीच्यांसाठी अंड्याचा पांढरा भाग संतुलित आहारासाठी एक उत्तम जोड असू शकतो आणि तो तुमच्या शरीराला आवश्यक प्रथिने प्रदान करतो, असे डॉक्टर हजारथैया म्हणाले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating egg whites healthy or not egg whites are not inherently inflammatory and can be part of a healthy diet read expert advice asp