Eggs Side Effect : अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक तत्वे असतात. शाकाहारी आणि मांसाहारी माणसंही त्यांच्या आहारात अंड्याचा समावेश करतात. सकाळच्या नाश्त्यात अंड्याचं सेवन करणं अनेकांना आवडतं. अंडा हा चविष्ट खाद्यपदार्थ असून त्याच्या अन्नपदार्थांत समावेश करणं खूप सोपं असतं. काही लोक अंडा उकडून खातात तर काही लोकांना अंड्याचं ऑमलेट खायला आवडतं. नाश्त्यासोबत अंडा खाल्ल्याने काही काळ भूख लागत नाही.
अमेरिकन हार्ट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात एक अंड खाणं योग्य आहे. पण तुम्हाला माहितेय की, अंड्याचं अधिक सेवन केल्यावर आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. एम्सचे माजी कंसल्टेंट आणि साओल हार्ट सेंटरचे फाऊंडर आणि डायरेक्टर डॉ. बिमल झांजेर म्हणतात, अंड्याचं सेवनं तुमच्या आरोग्यावर अवलंबून असतं. एकापेक्षा अधिक अंडी खाणं तुम्हाला आजारी बनवू शकतं.काही क्रॉनिक आजारांमध्ये अंड्याचं सेवन आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. पोषक तत्वांनी भरलेला अंड्याचं अतिसेवन केल्यावर आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतं. अंड्याचं सेवन कोणत्या आजरांवर अधिक घातकं ठरु शकतो, याबाबत तज्ज्ञांनी दिलेली माहिती जाणून घेऊयात.
कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी अंडी खाणं टाळावं
हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी अंडी खाऊ नयते. अंड्याचा पिवळ्या भागात जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल असल्याने आरोग्यासाठी घातकं ठरतं. ५० ग्रॅमच्या एका अंड्यात १४० मिलिग्रॅम कोलेस्ट्रॉल असतं. दोन अंड्यात १५५ कॅलरी असते. दररोज दोन अंडी खाल्ल्यावर शरीराला १८४ मिलिग्राम कोलेस्ट्रॉल मिळतं. ज्या लोकांच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक असतं त्यांनी अंड्याचं सेवन करणं बंद करावं. अशा लोकांसाठी अंड्याचं सेवन धोकादायक असतं.
अंड्यामुळं हार्ट ब्लॉकेज होऊ शकतो
हार्ट पेशंटसाठी अंड्याचं सेवन विषासारखंच आहे. द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशीत झालेल्या एका संशोधनानुसार, दररोद दोन अंडे खाल्ल्यावर शरीरात Trimethylamine N- oxide (TMAO)प्रमाण वाढतं आणि हे हृदय विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या आरोग्यासाठी खूपच घातक ठरतं. जर तुम्हाला अंड खायचं असेल, तर त्याचा सफेद भाग खायचा. पिवळा भाग आरोग्यासाठी हानिकारक आहे. ज्या लोकांना हृदयाचे विकार आहेत, अशांनी अंडा खाणं टाळावे नाहीतर हार्ट ब्लॉकेज होण्याची शक्यता वाढते.
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनीही अंडी खाऊ नये
ज्या लोकांचा रक्तदाब उच्च असतो, अशा लोकांनी अंडी खाणे टाळावे. अंड्याचं सेवन केल्यानं रक्तदाब वाढू शकतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अंड्यात मोठ्या प्रमाणावर फॅट असतं. याच्या सेवनामुळं लठ्ठपणा वाढतो. तसंच उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनाही ते धोकादायक ठरतं.