pregnancy tips: आई होण्याचे स्वप्न पाहण्यापासून ते आई होण्यापर्यंतचा प्रवास स्त्रीसाठी खूप रोमांचक, भावनिक आणि जबाबदार असतो. आईच्या आरोग्यासाठी आणि बाळाच्या विकासासाठी गर्भधारणेपासून नवव्या महिन्यापर्यंत गर्भवती महिलेच्या आहाराची अत्यंत काळजी घेतली जाते. या काळात चांगले अन्न, औषधोपचार, व्यायाम, चांगली पुस्तके, आजूबाजूचे चांगले वातावरण हे खूप महत्त्वाचे आहे. गरोदरपणात भरपूर फळे, भाज्या, पातळ प्रथिने आणि हेल्दी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण गर्भधारणेदरम्यान स्त्री जे काही खाते त्याचा तिच्या आणि मुलाच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. जेव्हा मूल पोटात वाढत असते तेव्हा त्याची आई त्याच्या अन्नाचा स्रोत असते. आई जे काही खाते ते थेट मुलाला जाते. म्हणूनच अनेक स्त्रिया गरोदरपणात भरपूर तूप खातात. मात्र गरोदरपणात तूप खाणे खरेच फायदेशीर आहे का? चला जाणून घेऊ या.
गरोदरपणात तूप स्त्रीच्या आरोग्यासाठी फायदेशीर
प्रसूती-स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ राम्या काबिलन यांच्या मते, भारतीय स्वयंपाकात वापरल्या जाणार्या मुख्य घटकांपैकी तूप एक आहे. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा तिला घरातील वडीलधारी मंडळी तूप खाण्याचा सल्ला देतात. गरोदरपणात तूप खाणे स्त्रीच्या एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हे पचनासही खूप मदत करते.
गरोदर स्त्रीने तूप खाल्ल्यास बाळ सहज बाहेर येते का?
गर्भवती महिलेने तूप का खावे यावर प्रसूती-स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रम्या कबिलन यांनी त्यांच्या ‘इन्स्टाग्राम’ पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. तुम्ही गरोदर असताना रोज एक चमचा तूप खा. तूप आईच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण अनेकदा असे सांगितले जाते की, गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांत तूप खाल्ल्याने योनीमार्गातून बाळाला सहज बाहेर येण्यास मदत होते. मात्र हे खरे नाही, असे डॉक्टर सांगतात.
तूप बाळाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी फायदेशीर
पारंपरिक आयुर्वेदिक औषधांमध्ये शतकानुशतके तुपाचा वापर केला जात आहे आणि गरोदर महिलांसाठी याचे विविध आरोग्यविषयक फायदे आहेत. तुपामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे असतात, जी गर्भधारणेसह बाळाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी खूप चांगली असतात. गर्भवती महिलांना संपूर्ण गर्भधारणेदरम्यान उत्साही राहण्यास ते मदत करते. मुलाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या योग्य विकासासही मदत करते.
हेही वाचा – गर्भवती महिलांनी थिएटरमध्ये चित्रपट पहावा की नाही? काय सांगतात डॉक्टर, जाणून घ्या
निरोगी त्वचा
त्वचेची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतींमध्ये तुपाचा वापर अनेकदा केला जातो. गरोदर महिलांना गरोदरपणात त्यांच्या त्वचेत बदल जाणवू शकतात आणि तूप मॉइश्चरायझर म्हणून वापरल्यास किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय केल्यास त्वचेचे पोषण आणि कोरडेपणा किंवा खाज कमी होण्यास मदत होते.