चांगली झोप शरीराला आणि मेंदूला आराम देते. रात्री निट झोप झाल्यास दिवसे ताजेतवाणे वाटते आणि काम करण्यासाठी शरीरात उत्साह असतो. मात्र, एव्हाना मोबाईल, लॅपटॉप या सारख्या उपकरणांमुळे उशिरा झोपण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच झोप न लागण्याच्या तक्रारी देखील पुढे येतात. यासाठी जेवण्याच्या सवयी देखील जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
खाद्यपदार्थांचा झोपेवर होतो हा परिणाम
जॉन हॉप्किन्स मेडिसीननुसार, मद्यपान हे चांगली झोप लागण्यात मदत करू शकते, मात्र झोपण्यापूर्वी त्याचे सेवन करण्याची सवय असल्यास स्मरणशक्ती संबंधी समस्या, स्लिप एपनिया आणि झोपेत चालण्याची समस्या निर्माण होऊ शकते. मसालेदार पदार्थ देखील टाळले पाहिजे. त्यांच्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते आणि तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकते. ज्या खाद्यपदार्थांमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोदके आढळतात, जसे गव्हाची ब्रेड किंवा ओटमिल या पदार्थांचे सेवन झोपण्यापूर्वी केले पाहिजे. हे पदार्थ सेरोटोनिन नावाचे झोपेसाठीचे संप्रेरक सोडण्यासाठी मदत करतात आणि ते लवकर पचतात, असे जॉन हॉप्किन्सचे म्हणणे आहे.
(‘या’ खाद्यपदार्थांचे करा सेवन, वजन कमी करण्यासह मधुमेहाचा धोका टाळण्यात करतील मदत)
खाण्याच्या सवयींमुळे झोपेवर काय परिणाम होतात याबाबत स्टेडफास्ट न्युट्रिशनचे संस्थापक अमन पुरी यांनी देखील माहिती दिली. अम्लयुक्त पदार्थ टाळण्याचा सल्ला अमन यांनी दिला. अम्लयुक्त पदार्थांच्या सेवनाने पोटात त्रास होतो, ज्यामुळे झोपेत व्यत्यत येते. खाल्ल्यानंतर तृप्त झाल्यासारखे वाटेल असे पदार्थ खाण्याचा सल्ला पुरी यांनी दिला.
पुरी यांनी प्रथिन्यांचे महत्व सांगितले. भारतीय आहाराविषयी बोलताना पुरी म्हणाले की, भारतीय आहारात प्रथिन्यांची कमी असते, त्यामुळे स्नायूंमध्ये सुधार होण्यासाठी आणि शरीराद्वारे योग्य कार्य होण्यासाठी प्रथिने असलेल्या आहाराचे सेवन करणे गरजेचे असल्याचे पुरी यांचे म्हणणे आहे.
आहारात प्रथिन्यांचा समवेश करावा
(प्रोस्टेट कर्करोगाचा धोका टाळा, जीवनशैलीत करा ‘हे’ बदल)
जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीर कॅटाबोलिक स्थितीमध्ये जाते ज्यात स्नायू पोषण मिळवण्यासाठी स्वत:ला खाऊ शकतात. त्यामुळे, स्नायूंमध्ये सुधार होण्यासाठी शेवटच्या आहारात प्रथिन्यांचा समावेश असावा, असा सल्ला पुरी यांनी दिला.
कार्बोदके, उच्च फायबर असलेले पदार्थ टाळावे
उच्च कार्बोदके असलेल्या अन्नामुळे झोप लागू शकते. मात्र, त्यामुळे चांगली झोप लागण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रात्री कार्बोदके असलेले अन्न टाळले पाहिजे. चांगले पचन होण्यासाठी झोपण्याच्या दोन तासांपूर्वी जेवण केले पाहिजे. उच्च फायबर असलेले पदार्थ झोपेत व्यत्यय आणू शकतात. त्यामुळे रात्री त्यांना टाळावे. स्टिमुलेंट देखील झोपेत व्यत्यत आणू शकतात. कॅफिन हे त्यापैकी एक आहे. त्यामुळे, जेवणानंतर कॉफी घेणे योग्य नाही, असा सल्ला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयाच्या युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप राव यांनी दिला.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)