Dry fruits and nuts for Skin health: वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी ड्रायफ्रुट्स हे अधिक लोकप्रिय आरोग्यदायी स्नॅक्स आहेत. परंतु, तुम्ही जर वारंवार येणाऱ्या मुरमांमुळे त्रासले असाल, तर तुम्ही तुमच्या ड्रायफ्रुट्स खाण्याच्या निवडीबाबत पुन्हा एकदा विचार करू शकता. कारण- ड्रायफ्रुट्स हे पोषक घटकांनी भरलेले असले तरी काही ड्रायफ्रुट्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्वचेच्या समस्या वाढू शकतात.
चेन्नई येथील श्री बालाजी मेडिकल सेंटरमधील आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी, “ओमेगा-६ फॅटी अॅसिड असलेले काजू, अक्रोड व शेंगदाणे यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते जळजळ वाढवू शकतात आणि ते मुरमे येण्याचे एक प्रमुख कारण आहे. ओमेगा-६ आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडमधील असंतुलन शरीराच्या दाहक प्रतिसादाला चालना देऊ शकते, ज्यामुळे त्वचेची स्थिती बिघडू शकते,” असे सांगितले.
दुसरीकडे मॅकाडामिया, बदाम, हेझलनट्स व चेस्टनट यांसारख्या ड्रायफ्रुट्समध्ये ओमेगा-६ चे प्रमाण कमी असते आणि मुरमांची समस्या असलेल्यांसाठी ते अधिक सुरक्षित मानले जातात. “त्यामध्ये व्हिटॅमिन-ई व सेलेनियमदेखील भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करतात आणि एकूणच त्वचेच्या आरोग्यास समर्थन देतात,” असे त्या म्हणाल्या.
ड्रायफ्रुट्स मुरमांना कारणीभूत ठरतात का?
दीपलक्ष्मी म्हणाल्या, “उच्च ग्लायसेमिक इंडेक्समुळे ड्रायफ्रुट्स मुरुमांवरदेखील परिणाम करू शकतात. मनुका, खजूर व जरदाळू यांसारख्या ड्रायफ्रुट्समध्ये डाईंग प्रक्रियेतून केंद्रित साखर असते, ज्यामुळे इन्सुलिन स्पाइक्सचे ते कारण ठरू शकते. हे ड्रायफ्रुट्स जळजळ उत्तेजित करतात, जे दोन्ही मुरमांच्या येण्यास कारणीभूत ठरतात. ज्यांना मुरमे येण्याची शक्यता असते, त्यांना ड्रायफ्रुट्सचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.”
“जेव्हा आहाराद्वारे मुरमांवर नियंत्रण ठेवण्याचा विचार येतो तेव्हा संयम महत्त्वाचा असतो. हायड्रेटेड राहताना अँटिऑक्सिडंटयुक्त अन्न आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडचा समावेश केल्याने त्वचेचे संतुलन राखण्यास मदत होऊ शकते,” दीपलक्ष्मी म्हणाल्या, त्यांनी हेदेखील सांगितले की, प्रत्येकाची त्वचा अन्नाबाबत वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते आणि म्हणूनच फूड डायरी ठेवणे आणि योग्य सल्ल्यासाठी त्वचारोग तज्ज्ञ किंवा पोषण तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे चांगल्या त्वचेसाठी अधिक प्रभावी धोरण ठरू शकते.