Multigrain Rotis : पोळी हा आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सहसा आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेली पोळी किंवा फुलके खातो, पण सध्या मिश्र धान्यांपासून बनवलेली पोळीसुद्धा अनेक जण आवडीने खातात. मिश्र धान्यापासून बनवलेली ही पोळी खरंच आरोग्यासाठी फायदेशीर असते का, याविषयी श्री बालाजी मेडिकल इन्स्टिट्यूटच्या आहारतज्ज्ञ प्रिया पालीवाल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सविस्तर माहिती सांगितली.

मिश्र धान्यांपासून बनवलेली पोळी खावी का?

आहारतज्ज्ञ प्रिया पालीवाल सांगतात, “मिश्र धान्यांपासून बनवलेल्या पोळीचा आहारात समावेश केल्यामुळे आरोग्यास कोणताही धोका निर्माण होत नाही. ही पोळी दक्षिण आशियामध्ये आहारात आवडीने खाल्ली जाते, कारण यामुळे आरोग्यास अनेक फायदे मिळतात. गव्हाच्या पोळीपेक्षा या पोळीला लोक अधिक पसंती देतात.”

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Shrimant Dagdusheth Halwai Ganpati latest news
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य
Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
Is thirst a good predictor of dehydration
तहान लागते म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा…
tomato rice
रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळला आहात? मग आज बनवा टोमॅटो पुलाव तेही झटपट
What is the Leidenfrost effect
Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल

पालीवाल पुढे सांगतात, “मिश्र धान्यांपासून बनवलेल्या या पोळीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे अन्न पचवण्यास मदत करतात. याशिवाय बद्धकोष्ठतेची समस्यासुद्धा कमी होते. वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. या मिश्र धान्यांमध्ये अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक असतात, जे निरोगी राहण्यास मदत करतात.”

हेही वाचा : National No Bra Day : स्तनाच्या आरोग्यासाठी ब्रा घालणे, गरजेचे आहे का? वाचा, डॉक्टर काय सांगतात…

“गव्हापासून बनविलेल्या पोळीच्या तुलनेत मिश्र धान्यांपासून बनवलेल्या पोळीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याससुद्धा ही पोळी अधिक फायदेशीर ठरते. याशिवाय मधुमेह असलेल्या लोकांनीसुद्धा या पोळीचा आहारात समावेश करावा”, असे पालीवाल सांगतात.

मिश्र धान्यांपासून बनवलेल्या पोळीची चव अधिक स्वादिष्ट असते, ज्यामुळे जेवणाचा चांगला आस्वाद घेता येतो. पालीवाल सांगतात, “मिश्र धान्यांपासून बनवलेली ही पोळी गव्हाची किंवा ग्लुटेनची अॅलर्जी असलेल्या लोकांसाठी खूप चांगला पर्याय आहे.”

पालीवाल पुढे सांगतात, “मिश्र धान्यांपासून बनवलेली पोळी आपल्या शरीराला चांगले पोषक घटक पुरविते. वजनापासून रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यापर्यंत मदत करते. ही पोळी अन्नाची चव वाढवते. ज्यांना त्यांच्या आहारात बदल करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मिश्र धान्यांपासून बनवलेली पोळी एक उत्तम पर्याय आहे.”