Eating Peanuts Every Day : शेंगदाणे हा एक लोकप्रिय स्नॅक आहे. कुरकुरीत, चटपटीत असे हे शेंगदाणे आपल्यातील अनेकांनी भाजून, उकडून किंवा कच्चेदेखील खाल्ले आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का, आकाराने लहान असलेल्या या शेंगदाण्यांमध्ये भरपूर पोषक तत्व आहेत, ज्यामुळे ते अनेकांच्या पसंतीस उतरतात. पण, चवीपलीकडे शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्याने (Eating Peanuts Every Day) आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो का याबद्दल अनेकांच्या मनात नेहमीच प्रश्न उपस्थित होतात…
दैनंदिन पोषणासाठी अधिकाधिक लोक साध्या, नैसर्गिक पदार्थांकडे वळत असताना संतुलित आहारामध्ये आता शेंगदाण्यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले गेले आहे. त्यांचे समृद्ध पौष्टिक प्रोफाइल सातत्याने सेवन केल्यावर ते आपल्या शरीरावर कसे परिणाम करतात याबद्दलदेखील सांगतात.
दररोज मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे (Eating Peanuts Every Day) :
तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने सल्लागार आहारतज्ज्ञ आणि सर्टिफाईड मधुमेह शिक्षक कनिक्का मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली. त्या म्हणाल्या की, शेंगदाण्यामध्ये आढळणाऱ्या मिनरल्स रेंजचा सामान्य आरोग्यावर मोठा सकारात्मक प्रभाव पडतो. त्यांच्यातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, विशेषतः एचडीएल (गुड) कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी आणि एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात, त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. शेंगदाणे उच्च फायबर, प्रोटीन कंटेंटमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे ते मधुमेह असलेल्यांसाठी आरोग्यदायी नाश्तासुद्धा ठरू शकतात.
हृदयाचे आरोग्य आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण करण्यापलीकडे, शेंगदाण्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स, रेझवेराट्रोलसह मेंदूच्या ऊतींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून बचाव करून संज्ञानात्मक बिघडण्याची शक्यता कमी करण्यास मदत करू शकतात. याशिवाय व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे शेंगदाण्यामध्ये आढळणारे महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे, खनिजे आहेत, जे शरीराच्या विविध प्रक्रियांना समर्थन देतात.
शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्याने (Eating Peanuts Every Day) …
१. हृदयविकाराचा धोका कमी होतो
२. वजन वाढण्यास मदत होते.
३. रक्तातील साखरेवर नियंत्रण राहते.
४. मेंदू कार्य इन्हान्स करण्यास मदत होते (Enhanced brain function). एकूणच शेंगदाणे तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते.
रोज शेंगदाणे खाल्ल्याने नकारात्मक परिणामसुद्धा होतात, ते पुढीलप्रमाणे (Eating Peanuts Every Day)…
१. वजन वाढणे : जर तुम्ही शेंगदाण्याचे जास्त सेवन करत असाल तर कॅलरी कंटेंटमुळे तुमचे वजन वाढू शकते.
२. ॲलर्जी : ॲलर्जी असलेल्या व्यक्तींनी शेंगदाणे खाणं पूर्णपणे टाळले पाहिजे.
३. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या : शेंगदाणे खाल्ल्यानंतर काही व्यक्तींना पचनात त्रास होऊ शकतो, जसे की सूज येणे किंवा गॅसचा त्रास होणे.
४. औषध आणि शेंगदाणे : शेंगदाणे खात असताना रक्त पातळ करणाऱ्या औषधांचे सेवन करू नये.
शेंगदाण्याच्या सेवनाचा वजन व्यवस्थापनावर परिणाम होतो का (Eating Peanuts Every Day)?
शेंगदाण्यामध्ये गुड फॅटचे प्रमाण जास्त असले तरीही यामुळे तुमचे वजन वाढू शकते. शेंगदाण्यामध्ये असणाऱ्या हाय कॅलरी कंटेंटमुळे, शेंगदाणे कॅलरी-डेन्स फूडदेखील मानले जाते. शेंगदाणे जास्त खाल्ल्याने जास्त प्रमाणात कॅलरी वाढतात, जे कालांतराने वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात; त्यामुळे संतुलित आहारामध्ये शेंगदाण्यांचा समावेश करण्याची गुरुकिल्ली ‘संयम’ आहे. त्यामुळे मूठभर स्नॅक किंवा जेवणात शेंगदाण्याचा थोडासा समावेश करून तुम्हाला फायदे मिळू शकतात.
कच्च्या, भाजलेल्या किंवा खाऱ्या शेंगदाण्यांमध्ये काय फरक आहे ?
शेंगदाण्याच्या वेगवगेळ्या पद्धती (कच्चे, भाजलेले किंवा खारवलेले) पोषण प्रोफाइल आणि आरोग्य फायद्यांमध्ये किंचित बदल करू शकते.
कच्चे शेंगदाणे : यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पोषक, अँटिऑक्सिडंट असतात. याउलट खाऱ्या आणि भाजलेल्या शेंगदाण्यांमध्ये याचे प्रमाण कमी असते आणि ते पचण्याससुद्धा कठीण असतात. त्याचप्रमाणे हे शेंगदाणे योग्यरित्या न साठवल्यास त्यात हानिकारक जीवाणूसुद्धा असू शकतात.
भाजलेले शेंगदाणे : भाजलेले शेंगदाणे खाण्यासाठी चविष्ट तर असतात आणि पचायला सोपे जातात. हे विशिष्ट पोषक आणि अँटिऑक्सिडंट्सची पातळीदेखील कमी करू शकते. पण, एकूणच हे फायदेशीरसुद्धा ठरू शकते.
खारे शेंगदाणे : शेंगदाण्यामध्ये मीठ टाकल्याने सोडियमचे प्रमाण वाढते, जे रक्तदाब मॉनेटर करण्यासाठी चिंतेची बाब ठरू शकते.