Avoid having poha daily: पोहे हा एक अत्यंत लोकप्रिय नाश्त्याचा पर्याय आहे, जो त्याच्या लाइटनेससाठी आणि पौष्टिकतेसाठी पसंत केला जातो. पण, तुम्हाला माहीत आहे का की पोह्याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला जात नाही, विशेषतः जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर. दीपिका पदुकोण, ऋषभ पंत, कतरिना कैफ आणि इतरांसोबत काम केलेल्या सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी अलीकडेच असे म्हटले आहे.
“पोहे खाणे ही एक सामान्य चूक आहे. मी असे म्हणत नाही की पोहे हा चांगला नाश्ता नाही. ज्यांची पचनशक्ती खूप चांगली आहे आणि ज्यांची जीवनशैली खूप सक्रिय आहे, त्यांच्यासाठी हा नाश्ता चांगला आहे; कारण पोहे पचायला खूप कठीण असतात. यामुळे बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि आम्लपित्त होऊ शकते, लोकांना ते लक्षात येत नाही,” असे शाह यांनी योग ट्रेनर श्लोका यांच्याशी झालेल्या संभाषणात सांगितले.
पोहे पचायला कठीण का असतात? (What makes poha difficult to digest?)
हैदराबादमधील लकडी का पूल येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटल्सच्या अंतर्गत औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. हरिचरण जी म्हणाले की, उच्च कार्बोहायड्रेट आणि तुलनेने कमी फायबरमुळे पचनक्रिया चांगली असलेल्या लोकांसाठी पोह्यांची शिफारस केली जाते. “पोह्यांसाठी वापरलेला भात हे एक प्रक्रिया केलेलं धान्य आहे, ज्यामुळे ते पचायला सोपे जाते, परंतु त्यात उच्च फायबर सामग्रीचा अभाव असतो, जो सामान्यतः नियमित आतड्यांच्या हालचालींना मदत करतो,” असे डॉ. हरिचरण म्हणाले.
ज्यांची पचनशक्ती चांगली आहे, त्यांच्यासाठी पोहे पचनसंस्थेवर अनावश्यक ताण न टाकता जलद उर्जेचा स्रोत प्रदान करतात. तथापि, डॉ. हरिचरण यांनी सांगितले की, ज्यांची पचनक्रिया मंदावते किंवा ज्यांना जठरांच्या समस्या असतात, त्यांच्यासाठी कमी फायबरचे प्रमाण योग्य पचनक्रिया किंवा आतड्यांच्या हालचालींना प्रभावीपणे चालना देऊ शकत नाही.
याव्यतिरिक्त पोहे बहुतेकदा मसाले, कांदे आणि शेंगदाणे घालून तयार केले जातात, जे संवेदनशील पोटांसाठी अधिक आव्हानात्मक असू शकतात. म्हणून पोहे हे एक पौष्टिक आणि हलके अन्न असले तरी ज्यांची पचनसंस्था अशा पदार्थांना कार्यक्षमतेने हाताळू शकते आणि प्रक्रिया करू शकते, त्यांच्यासाठी ते सर्वात योग्य आहे, जेणेकरून त्यांना अस्वस्थता न येता त्याचे फायदे मिळतील,” असे डॉ. हरिचरण यांनी नमूद केले.
पचनाच्या समस्या असलेल्या व्यक्तींसाठी, उच्च फायबर असलेल्या भाज्यांसह पोहे खाणे किंवा संतुलित आहारात त्यांचा समावेश केल्याने संभाव्य समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते, असे डॉ. हरिचरण यांनी सांगितले.
नाश्त्यामध्ये पोहे कसे समाविष्ट करावे आणि पचनशक्ती कशी वाढवावी?
फरीदाबाद येथील क्लाउडनाइन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या पोषणतज्ज्ञ मनप्रीत कौर पॉल यांनी खालील गोष्टी शेअर केल्या:
पोहा स्मूदी बाऊल- भिजवलेले पोहे दही, एक केळे आणि थोडे मध घालून मिक्स करा. त्यावर चिया सीड्स, फ्लॅक्ससीड्स आणि थोडे बेरीज किंवा नट्स असे टॉपिंग्ज घाला. दह्यासोबत पोह्याचे मिश्रण प्रोबायोटिक्स वाढवते, तर फळे आणि बियांमधील फायबर निरोगी पचनास मदत करते.
पोहा स्टफ्ड शिमला मिरची – भाजलेले कांदे, मसाले आणि बडीशेप किंवा ओवा यांसारख्या पाचक औषधी वनस्पतींचे मिश्रण घालून पोह्याचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण पोकळ शिजलेल्या शिमला मिरच्यांमध्ये भरा आणि मऊ होईपर्यंत बेक करा. शिमला मिरचीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी अॅड केले तर औषधी वनस्पती पाचन एंजाइमची क्रिया वाढवते.
पोहे आणि मसूर डाळीचे सूप – हळद, जिरे आणि आले घालून हलके डाळीचे सूप शिजवा. त्यात शेवटी भिजवलेले पोहे घाला आणि पोहे मऊ होईपर्यंत काही मिनिटे उकळवा. मसूर आणि पोह्यांच्या मिश्रणातून प्रथिने आणि फायबर मिळते, ज्यामुळे पचन सुरळीत होते, तर मसाल्यांमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात.