अनेकजण शिजवलेल्या अन्नासह कच्चे अन्न म्हणजे सॅलड, फळे खातात. हॉटेल्समध्येही पदार्थांसह रायता, सॅलड दिले जाते. परंतु, शिजवलेल्या अन्नसह कच्चे अन्न खाणे आरोग्यदायी असते किंवा नाही, तसेच शिजवलेल्या अन्नासह काय खावे, काय खाऊ नये आणि त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

डॉक्टरांचे असे मत आहे की, आपले शरीर शिजवलेले आणि न शिजवलेले अन्न वेगवेगळ्या प्रकारे पचवत असते. त्यामुळे जेव्हा शिजवलेले आणि न शिजवलेले अन्न एकत्रित खाल्ले जाते, तेव्हा त्या अन्नाचे कमी पचन होऊन, किंवा न पचता विघटित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिजवलेले अन्न आणि न शिजवलेले अन्न एकत्रित खाऊ नये. जेवण करताना अनेकांना फळे खाण्याची सवय असते. परंतु, जेवणाच्या आधी ३० मिनिटे किंवा जेवणानंतर दोन तासांनी फळे खावीत. जेवणासह फळे खाऊ नयेत. यामुळे अपचन किंवा गॅसेस चा त्रास होऊ शकतो.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…
pizza advertisment banned
पिझ्झा, केक आणि शीतपेयाच्या जाहिरातींवर बंदी; ‘या’ देशाने केली कारवाई, कारण काय?

शिजवलेले आणि न शिजवलेले पदार्थ यांच्या पचनात काय फरक आहे ?

आपली पचनसंस्था थोडी गुंतागुंतीची असते. त्यामध्ये शिजवलेले आणि न शिजवलेले अन्न एकत्र खाल्यास त्याची गुंतागुंत वाढू शकते. शिजवलेल्या अन्नाचे पचन करणे शरीराला सोप्पे जाते. न शिजवलेले अन्न, कच्चे अन्न याचे पचन करण्यासाठी शरीराला अधिक पाचक द्रावणाची आवश्यकता असते. जेव्हा शिजवलेले आणि न शिजवलेले अन्न एकत्र केले जाते, तेव्हा पचनाचे त्रास सुरु होतात. सतत ढेकर येणे, गॅस, अपचन होणे इ. कारण कच्चे अन्न पचवण्यासाठी आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि प्रयत्नांची आवश्यकता असते. अन्न चघळणे किंवा अन्न चावून खाणे ही पचनाची पहिली पायरी आहे आणि जेव्हा अन्न अयोग्यरित्या चघळले/चावले जाते तेव्हा त्यामुळे पचनास त्रास होतो. शिजवलेले अन्न चावण्याची क्रिया व्यवस्थित होते किंवा ते कमी चावले गेले तरी जठरात त्याची पचनक्रिया व्यवस्थित होऊ शकते. कच्चे अन्न , न शिजवलेले पदार्थ आणि शिजवलेले अन्न या दोहोंचे वेगवेगळ्या स्तरावर शरीराला फायदे असतात. कच्च्या अन्नामध्ये ज्यात सॅलड, फळे यांचा समावेश असतो, त्यात पोषकद्रव्ये अधिक असतात. परंतु, ते पचण्यासाठी अधिक ऊर्जा लागते. शिजवलेल्या अन्नामचे पोषणमूल्य कमी होते. परंतु, ते पचण्यास सुलभ असते.

हेही वाचा : ‘या’ महिलांना बीजांडकोशाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक ! कोणत्या व्यवसाय करणाऱ्या महिला ठरू शकतात कर्करोगग्रस्त

शिजवलेले आणि न शिजवलेले अन्न एकत्र खाण्याचे दुष्परिणाम

आहारतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा यांनी इन्स्टाग्रामवर या विषयावर एक माहितीपूर्ण पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शिजलेले पदार्थ कधीही न शिजवलेल्या पदार्थात मिसळू नका. त्यामुळे आतड्यांना सूज येते. पोट फुगणे हा आजार नाही. अन्नपदार्थ चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यामुळे, अन्नाचे चुकीच्या पद्धतीने मिश्रण केल्यामुळे, आधीचे न पचलेले अन्न आणि नवीन अन्न यांचे मिश्रण झाल्यामुळे पोटाचे विकार उद्भवतात.

धान्य, भाज्या, मसूर, डाळी आणि सोयाबीन यांसारखे घटक पदार्थ तेल, मसाले, मीठ आणि औषधी वनस्पती वापरून शिजवले जातात. ते शरीराद्वारे सहज पचले जाऊ शकतात, शोषले जाऊ शकतात. दुसरीकडे फळे आणि भाज्यांच्या सॅलड्स सारख्या कच्च्या पदार्थांमध्ये फळांमधील ऍसिड, भाज्यांमधील फायबर, अन्य जीवाणू सक्रिय अवस्थेत असतात. अन्न शिजवले जाते, तेव्हा अशा प्रकारचे ऍसिड, जीवाणू, अन्य घटक नष्ट होतात. त्यामुळे ते सहज पचले जाते. कच्च्या अन्नामध्ये असणारे घटक शिजलेल्या अन्नातील घटकांना हानी पोहोचवू शकतात. तसेच, कच्चे मांस, सीफूड, अंडी असे घटक पूर्ण शिजवले गेले नाही, तर अन्न विषबाधा होऊ शकते. तसेच फळे, भाज्या कापून खाताना कटर, चॉपिंग बोर्ड, हात यांच्यावर असणारे जीवाणूही तसेच पोटात जाण्याची शक्यता असते.

…तर काय कराल ?

डॉ जांगडा यांनी काही नियम सांगितले आहेत. तुम्ही शिजवलेले जेवण खात असाल, तर तेच खावे आणि अर्धा किंवा एक तासानंतर पाणी प्यावे. तुम्ही फळे किंवा भाजी, सॅलडसारखे न शिजवलेले पदार्थ खात असाल तर न शिजवलेले पदार्थच खा. एकावेळी एकाच प्रकारच्या भाज्या किंवा फळे खा. न शिजवलेल्या अन्नातही वेगवेगळे मिश्रण करू नका. शिजवलेल्या अन्नानंतर २ तासांनी न शिजवलेले अन्न घ्या.

आपले शरीर वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पचवत असते. शिजवलेल्या आणि न शिजवलेल्या अन्नाचे मिश्रण केल्यामुळे अपचन आणि पोटाचे अन्य विकार होऊ शकतात. त्यामुळे जेवताना योग्य ती काळजी घ्यावी.

Story img Loader