How many Chapatis Can a Diabetic Patient Eat: डायबिटीज हा एक क्रोनिक आजार आहे ज्यात आपल्या रक्तातील साखरेची पातळी एकाएकी वाढू लागते. डायबिटीज असताना जेव्हा तुमचे पँक्रियाज इन्सुलिन उत्पादन करणे थांबवते तेव्हा ब्लड शुगरचा स्तर वाढू लागतो.डायबिटिजच्या रुग्णांना आपल्या आहारात भात कमी करणे महत्त्वाचे असते पण केवळ चपाती खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहू शकते का? जर आपण पोळ्याच खाणार असाल तर त्यासाठी कोणते पीठ वापरावे? या प्रश्नांकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे. आज आपण डॉ. पाखी शर्मा यांच्याकडून या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात..
डायबिटीज असल्यास तुमच्या शरीरात किती प्रमाणात कार्बोहायड्रेट जाते याकडे लक्ष देणे गरजेचे असते. डायबिटिक रुग्णांनी आपल्या आहारात प्रोटीन, फायबर व आवश्यक पोषक तत्वे समाविष्ट करायला हवीत. अनेकजण आहारात गव्हाच्या पिठापासून बनलेल्या पोळ्यांचा समावेश करतात पण जेव्हा पीठ दळलं जातं तेव्हा त्यातून बहुतांश सत्व निघून जातात, त्यात पुन्हा जेव्हा आपण पीठ चाळून घेतो तेव्हा शेवटी केवळ मैदा शिल्लक राहतो. जो अर्थात डायबिटीजच्या रुग्णांसाठी नुकसानदायक असतो.
गव्हाच्या पिठात कार्ब्स अधिक असतात व ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा अधिक असतो ज्यामुळे ब्लड शुगर बूस्ट होऊ शकते. अशावेळी गव्हाच्या ऐवजी खालील पर्यायी पोळ्यांचा आपण विचार करू शकता. डायबिटीज रुग्णांनी एका दिवसात किती पोळ्या खाव्यात हे सुद्धा आपण जाणून घेऊयात..
बेसनाच्या पोळ्या
बेसन हे अनेकदा वजन कमी करताना आहारातून बाहेर काढले जाते पण आश्चर्य म्हणजे बेसनाच्या म्हणजेच चण्याचे पीठ ग्लूटेन फ्री असते. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात येण्यास मदत होते. अगदीच चवीत फरक वाटत असल्यास सुरुवातीला गव्हाच्या पिठात बेसन टाकून पोळ्या करायला सुरुवात करू शकता.
हे ही वाचा<< दुधात ‘या’ ३ गोष्टी मिसळल्यास बनतात अमृतासमान; याच्या सेवनाने रक्तातील साखर झपाट्याने कमी होऊ शकते
ज्वारीच्या पोळ्या किंवा भाकरी
डायबिटीजच्या रुग्णांना ज्वारीची भाकरी अत्यंत लाभदायक ठरू शकते. ज्वारीत पाचक फायबर, मँग्नेशियम, प्रोटीन उपलब्ध असते त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्वारीच्या पिठात सुद्धा कमी ग्लूटेन असते.
नाचणीची भाकरी
नाचणीची भाकरी खाल्ल्यास आपल्याला पोट पटकन भरल्यासारखे वाटू शकते. यामुळे वजन सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते. डायबिटीजच्या रुग्णांना फायबरयुक्त नाचणीच्या भाकरीचा फायदा होऊ शकतो.
हे ही वाचा<< डायबिटीज रुग्णांसाठी ‘हा’ सुका मेवा ठरतो विषासमान? काजू बदाम खाल्ल्याने शरीरात होतात ‘हे’ बदल
डायबिटीज रुग्णांनी किती पोळ्या खाव्या? (How many Chapatis Can a Diabetic Patient Eat)
हेल्थलाईनच्या माहितीनुसार, एका वेळेच्या जेवणात २ पोळ्या खाऊ शकता आणि जर आपल्याला ब्लड शुगरचा त्रास असेल तर दिवसभरात ६ ते ७ पोळ्या खाऊ शकता.