Can Yogurt Cure Diabetes: युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (FDA) ने योगर्ट उत्पादकांना योगर्टची जाहिरात करताना टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करण्याचा दावा करण्याची परवानगी दिली आहे. FDA ने या दाव्याला सहमती दर्शवली की “दर आठवड्याला किमान दोन कप योगर्ट खाल्ल्याने मधुमेह होण्याची शक्यता कमी होऊ शकते.” हे निष्कर्ष मर्यादित पुराव्यावर आधारित असून याला ‘क्वालिफाईड’ (पात्र) आरोग्यविषयक दावा असा टॅग देण्यात आला आहे. हा दावा असे दर्शवतो सदर निष्कर्ष हे पूर्णतः वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित नसून ठराविक वैद्यकीय चाचण्यांमधून समोर आले आहेत. डॉ अंबरीश मिथल, चेअरमन, एंडोक्राइनोलॉजी अँड डायबेटिस, मॅक्स हेल्थकेअर, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊया.

हा दावा सध्या चर्चेत आला असला तरी योगर्टचे सेवन आणि मधुमेहाचा कमी धोका यांच्यात संबंध असल्याचा दावा नवीन नाही. अनेक मोठ्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की योगर्टसारखे आंबवलेले दुग्धजन्य पदार्थ टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका कमी करू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी १ लाख सहभागींच्या डेटाचे विश्लेषण केले होते, ज्यामध्ये असे दिसून आले की दररोज योगर्ट खाल्ल्याने मधुमेह होण्याचा धोका १८ टक्क्यांनी कमी होतो. इतर दुग्धजन्य पदार्थांचा असाच फायदा होत असल्याचे मात्र यामध्ये म्हटलेले नाही.

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Issues of sugar factory in assembly elections is troubling candidate
विधानसभा निवडणुकीत साखर कारखानदारीचे मुद्दे पेटले!
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…

लक्षात घ्या की, योगर्टचे सेवन आणि टाइप 2 मधुमेहाचा कमी धोका यांच्यातील संबंधाचा पुरावा निरीक्षणात्मक आहे आणि त्याबाबत अद्यापही काही वाद आहेत. ऑस्ट्रेलियन मधुमेह, लठ्ठपणा आणि जीवनशैली (२०१३) अभ्यासासारख्या इतर अभ्यासांनी असे सुचवले आहे की संपूर्ण फॅट्स युक्त दुग्धजन्य पदार्थ प्री-डायबेटिस होण्याची शक्यता कमी करू शकतात.

दह्यात कॅल्शियम, प्रथिने, ब जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. चांगल्या बॅक्टेरियायुक्त आंबलेल्या दुधापासून बनवलेले, हे प्रोबायोटिक्सचे समृद्ध स्त्रोत आहे जे जळजळ कमी करण्यात आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यात मदत करू शकते. अलीकडील निरीक्षणामध्ये असेही समजतेय की, पूर्ण फॅट्स युक्त दुग्धजन्य पदार्थांचे सेवन हृदयरोग किंवा स्ट्रोकच्या जोखमीशी संबंधित नाही.

एक लक्षात घेण्याजोगी बाब अशी की बाजारात मिळणारे योगर्ट हे कृत्रिमरीत्या गोड केले जातात, ज्यामुळे त्यात अतिरिक्त कॅलरीची भर पडते. ही साखर योगर्टच्या फायद्यांमध्ये घट करू शकतो. FDA ने मात्र असा काही फरक पडत असावा याची पुष्टी केलेली नाही. आपण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर आपण नियमित कॅलरीजचे प्रमाण लक्षात घ्यायला हवे.

कोणते योगर्ट निवडावे?

योगर्टमध्ये लॅक्टोज आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवतात. दुग्धजन्य पदार्थांमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असतो. फक्त विकत घेताना आपण त्यातील साखरेचे प्रमाण व कॅलरीज मोजू शकता. भारतात मोठ्या प्रमाणावर योगर्टचे सेवन करण्याची पद्धत नाही. पण ग्रीक योगर्ट सारखे पर्याय आरोग्यदायी व चविष्ट सिद्ध होऊ शकतात. वाटल्यास आपण हे योगर्ट बदाम, बेरी व चिया सीड्सबरोबर खाऊ शकता.

हे ही वाचा<< १०० ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये दडलेत ‘इतके’ फायदे; वजनापासून ते मधुमेह व हृदयावर कसा होईल प्रभाव?

दही की योगर्ट, फरक काय?

या संपूर्ण लेखात वाचताना कदाचित तुम्हालाही ही गोष्ट खटकली असेल की आपण दह्याला योगर्ट का म्हणतोय? तर मंडळी मुळात दही व योगर्ट हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. दुध नैसर्गिकरित्या आंबवून किंवा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस वापरून दही तयार होते आणि ते वातावरणात किंवा दुधात आधीच अस्तित्वात असलेल्या बॅक्टेरियाचा वापर करते. दुसरीकडे, विशिष्ट जिवाणू, सामान्यत: लैक्टोबॅसिलस बल्गेरिकस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस यांच्या मदतीने योगर्ट तयार केले जातात. योगर्ट तयार करण्यासाठी सामान्यतः म्हशीचे दूध वापरले जाते कारण गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधात फॅट्सचे प्रमाण जास्त असते.