हेमंतामधील उत्तरेकडील वार्‍यांचे गुण-दोष सुश्रुतसंहिता १.२०.२८,२९ मांडण्यात आले आहेत. प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या दिशांवरुन येणारे वारे वाहू लागतात आणि त्या त्या वार्‍यांचे गुण-दोषसुद्धा भिन्न-भिन्न असतात, हा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्या त्या दिशेनुसार, त्या दिशेच्या प्रदेशानुसार, त्या प्रदेशामधील पर्वत, दर्‍या, जंगले, झाडे-फ़ुले- फळे, माती, पाणी, पाण्याचे विविध स्त्रोत यांमधील फरकानुसार त्यांवरुन वाहून येणार्‍या वार्‍याच्या गुणधर्मांमध्ये बदल होत असावा आणि त्यानुसार मार्गदर्शन आयुर्वेदाने केलेले आहे, जे अर्थातच मुख्यत्वे मानवी आरोग्याला धरुन केलेले आहे.

हिवाळ्यातल्या हेमंत ऋतूमध्ये उत्तर दिशेचे वारे वाहतात. (सुश्रुतसंहिता १.६.२२) हेमंत ऋतूमधील उत्तर दिशेवरुन येणारे वारे हे थंड, चवीला गोड व किंचित तुरट असतात.(मधुर रस हेमंतामध्ये अपेक्षितच आहे.) हे वारे स्पर्शाला मृदू असुन स्निग्ध असतात, ज्या स्निग्धत्वाची शरीराला कोरडे करणार्‍या हेमंतामध्ये गरज असते.

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
only rs 100 crore balance left in vault of thane municipal corporation
ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट; दिवाळीनंतर पालिकेचे निघाले दिवाळ
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर

हेही वाचा : गालगुंडाची नवी साथ; बहिरेपणाचा धोका; विषाणूमध्ये परिवर्तन झाल्याची तज्ज्ञांना शंका

शरीराला आवश्यक असणारा ओलावा पुरवण्याचा गुण सुद्धा त्यांच्यामध्ये आहे, जो अर्थातच स्वस्थ व्यक्तींनाच उपकारक होतो. मात्र सर्दी-कफ-दमा अशा रोगांनी ग्रस्त असलेल्या, शरीरामध्ये पाणी वाढल्याने जाड झालेल्या, शरीरावर, एखाद्या अंगावर सूज असलेल्या अशा कफप्रकृती व्यक्तींना मात्र हे वारे उपकारक होणार नाहीत.

उत्तर दिशेचे हे वारे शरीर-संचालक मात्र शरीराला विकृतही करु शकणार्‍या वात-पित्त-कफ या दोषांचा प्रकोप होऊ देत नाहीत, अर्थात स्वास्थ्य टिकवण्यास साहाय्य करतात. हे वारे बलवर्धक असतात,ज्या बलाची हिवाळ्यात शरीराला आवश्यकता असते. उत्तरेकडच्या या वार्‍यांचे वैशिष्ट्य हे की अशक्तपणा, शरीराचा क्षय व विषबाधा या विकृतींनी ग्रस्त असलेल्यांना हे विशेषकरुन हितकर असतात. (भावप्रकाश,पूर्वखण्ड,दिनचर्या प्रकरण,श्लोक२०७)

हेही वाचा : ५० ग्रॅम केक स्लाइसच्या पचनासाठी किती चालावं लागतं? ख्रिसमस पार्टीत मधुमेहींनी काय काळजी घ्यावी? डॉक्टर म्हणाले… 

हेमंत ऋतुमधील पावसाचे पाणी- (चरकसंहिता १.२७.२०५)

हेमंतातल्या थंडीत सुद्धा क्वचित पाऊस पडतो. वास्तवात हेमंत ऋतूमध्ये पाऊस पडणे हा ऋतूचा (काळाचा) मिथ्यायोग आहे. ज्या ऋतूमध्ये जी लक्षणे दिसली पाहिजेत तशी ती न दिसता उलट अनपेक्षित अशी भलत्याच ऋतूची लक्षणे दिसणे हा झाला मिथ्या योग म्हणजे चुकीचा योग.

हेमंतातल्या थंडीत पाऊस पडला तर ती काळाची चूक आहे, जी आरोग्यास हानीकारक आणि रोगांना आमंत्रक असल्याचे आयुर्वेद सांगते. कारण असा अवकाळी पडलेला पाऊस वातावरणात अचानक बदल करुन विषाणूंचा फैलाव होण्यास आणि विषाणूजन्य संसर्गजन्य रोगांचा प्रास होण्यास कारणीभूत होतो. असा अवकाळी पाऊस शेतीसाठीसुद्धा धोकादायक होतो व फळे, भाज्या व धान्याचे नुकसान करतो.

असे असले तरी त्या त्या ऋतूमध्ये पडणार्‍या पावसामधील पाण्याचे गुण-दोष वेगवेगळे असतात, हा विचार केवळ आयुर्वेद शास्त्राने मांडला आहे. त्या त्या ऋतूंमध्ये सभोवतालचे वातावरण वेगळे असते. सूर्य, चंद्र, ऊन, वारे, जमीन या मूलभूत नैसर्गिक तत्त्वांमध्ये व त्यांच्या गुणधर्मांमध्ये फरक असतो आणि साहजिकच या सर्वांचा पावसाच्या पाण्यावर परिणाम होऊन त्या त्या ऋतूचे पाणी हे भिन्न-भिन्न गुणांचे बनते.

हेही वाचा : Winter Dehydration : हिवाळ्यात लहान मुलांनी भरपूर पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या, मुलांमधील निर्जलीकरणाची लक्षणे

त्यानुसार हेमंत ऋतुमधल्या पावसाचे पाणी हे स्निग्ध असते अर्थात शरीरामध्ये स्निग्धता वाढवते. हेमंतातल्या हिवाळ्यामध्ये शरीरात स्निग्धता (स्नेह गुण) वाढवणे अपेक्षित असल्याने पाण्याचा हा गुण पोषक ठरतो. हेमंतातल्या पावसाचे पाणी हे पचायला जड असते, जो गुण सुद्धा हिवाळ्याला पूरक ठरतो, कारण या दिवसांत पचायला जड आहार घेणेच अपेक्षित असते.

याशिवाय हे पाणी शरीराचे बल वढवणारे व वृष्य (कामेच्छा व कामशक्ती वाढवणारे) असते. एकंदर हेमंतामधील पावसाचे पाणी हे पचायला जड, शरीरात स्निग्धता वाढवणारे,बलवर्धक आणि वीर्यवर्धक व कामशक्ती वर्धक असते. हे सर्व गुण हेमंतामधील देहस्थितीला अनुरूप असल्याने हेमंतात पडणार्‍या पावसाचे पाणी पिणे त्या ऋतुमध्ये आरोग्याला अनुकूलच होईल.