Egg Consumption : अंडे हा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेला पदार्थ आहे. चांगल्या आरोग्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण आवडीने अंडी खातात; पण तुम्हाला माहीत आहे का नियमित अंडी खाणे कितपत चांगले आहे?
यूएसमधील सेंट ल्युक मिड-अमेरिका हार्ट इन्स्टिट्युटचे शास्त्रज्ञ डॉ. जेम्स डिनिकोलँटोनियो (James DiNicolantonio) त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये सांगतात की, अंडी ही शत्रू नाहीत; तर अंडी नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन आहे आणि आपल्या शरीरासाठी ती निरोगी आहेत.”

अंडे हा निश्चितपणे एक पौष्टिक पदार्थ आहे. त्याचे आरोग्याला अनेक चांगले फायदे होऊ शकतात. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी-१२, सेलेनियम इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे. त्याशिवाय अंड्यांमध्ये चांगले फॅट्स आणि अंटीऑक्सिडंट्स घटक आहेत; जे मेंदू आणि डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.

How To Make Egg Fry
How To Make Egg Fry: भुर्जी पेक्षाही टेस्टी! १५ ते २० मिनिटांत बनवा ‘अंडा फ्राय’; लहान मुलंही आवडीने खातील ‘ही’ रेसिपी
Shivsena Eknath Shinde Rebel Winner Candidates List in Marathi
Shivsena Eknath Shinde Rebel Candidates Result : एकनाथ…
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स
Cardamom benefit in winter Wonderful Cardamom Benefits You Should Definitely Know About
हिवाळ्यात वेलची खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; आहारात समावेश करण्याआधी नक्की वाचा
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी
4 Ways to Find Your WiFi Password when You Forgot It
How To Find Wi-Fi Password: वाय-फायचा पासवर्ड विसरलात का? मग ‘या’ सोप्या टिप्स वापरा आणि मिळवा सेव्ह केलेला पासवर्ड

२०२३ च्या एका न्युट्रिअंट्स जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, कोंबडीच्या अंड्यामध्ये कोलीन, फोलेट, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, आयोडीन आणि चांगली गुणवत्ता असणारे प्रोटीन्स असतात; पण हायपर कोलेस्ट्रॉल, अॅनिमिया व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांवर अंडी फायदेशीर असल्याचे स्पष्टपणे सांगितले जात नाही. त्यामुळे अंड्यांचे फायदे आणि तोटे याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे.त्याशिवाय असेही समोर आलेय की, अंडी ही अत्यंत पौष्टिक, सहज उपलब्ध असणारी आणि परवडणारी आहेत.

हेही वाचा : सणवारामध्ये अतिप्रमाणात मद्यपान केल्यामुळे विषबाधा होऊ शकते का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

मुंबई येथील भाटिया हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. सम्राट शाह सांगतात की, आठवड्यातून सात अंडी खाणे आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित मानले जाते.
डॉ. शाह सांगतात, “अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते; ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. पण, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, अंड्यातील कोलेस्ट्रॉलचा परिणाम प्रत्येकावर सारखा होत नाही.”

डॉ. शाह पुढे सांगतात, “म्हणून संतुलित आहाराचा भाग म्हणून मी कमी प्रमाणात अंडी खाण्याचा सल्ला देईन. जर तुम्हाला कोणता आजार किंवा आरोग्याशी संबंधित समस्या असतील, तर अशा वेळी अंड्यांचे सेवन करण्याबाबत तुम्ही तुमच्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.”