डॉ. प्रदीप आवटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मार्च २०२० पासून आपण कोविड १९ चा सामना करत आहोत. आता हा आजार जागतिक आणीबाणी उरलेला नाही. करोना विषाणूचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे हा विषाणू त्याच्या जनुकीय रचनेमध्ये सातत्याने बदल करतो आहे. मागील दोन वर्षाच्या काळामध्ये अल्फा, बीटा, डेल्टा आणि आता नव्याने आलेला ओमायक्रॉन असे अनेक विषाणू मधील बदल आपण पाहिलेले आहेत. विषाणू जेव्हा बदलतो तेव्हा तो नुसता बदलत नाही त्या जनुकीय बदला सोबत त्याला काही नवे गुणधर्म देखील प्राप्त होतात हेही आपण पाहतो आहोत. सध्या या विषाणूच्या एरिस ( ईजी. ५.१) या नव्या व्हेरियंटची चर्चा सर्वत्र सुरु आहे. एरिस हा कितपत घातक किंवा गंभीर आहे, हे समजावून घेण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी समजून घेऊ.

आणखी वाचा: Health Special: लेप्टोस्पायरॉसिस कसा होतो, कसा टाळावा?

विषाणू म्हणजे काय?
करोनामुळे आपण सारे जण विषाणू हा सूक्ष्मजीव समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. विषाणू खरे म्हणजे इथला मूळ निवासी आहे. त्याचा इतिहास माणसापेक्षाही पुरातन आहे. विषाणूला खरे म्हणजे सजीव म्हणणे चूक आहे. कारण कोणताही विषाणू ना खाऊ शकतो ना श्वास घेऊ शकतो. विषाणू सजीव आणि
निर्जीवाच्या सीमारेषेवर रेंगाळणारा सूक्ष्मजीव आहे. आणि तरीही बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूपेक्षाही अगदी सूक्ष्म असणारा हा जीव अवघ्या जगाला सळो कि पळो करून सोडू शकतो.हा एवढा छोटा की टाचणीच्या डोक्यावर पन्नास कोटी रायनो व्हायरस नावाचा सर्दीसाठी कारणीभूत असणारे विषाणू मावू शकतात. विषाणू म्हणजे काय तर प्रोटीनने बनलेल्या पिशवीत कोंबलेला जनुकीय मटेरिअलचा गोळा. हे जनुकीय मटेरिअल हे आर एन ए किंवा डी एन ए स्वरूपात असते. डी एन ए चा आकार आपण जर एखादी लाकडी शिडी पिरगाळली तर जशी दिसेल तसा म्हणजे द्विसर्पिलाकर असा असतो तर आर एन ए मध्ये दोन ऐवजी एकच स्टँड असते. ही दोन्ही न्युक्लियक अँसिड आहेत. यांच्या रचनेत एक सांकेतिक भाषा दडलेली असते त्यानुसार नवीन विषाणू कण तयार होत जातात. मात्र विषाणू स्वतः आपली संख्या वाढवू शकत नाही. त्यासाठी त्याला जिवंत पेशीची गरज असते. कारण डी एन ए किंवा आर एन ए वर जी सांकेतिक भाषा असते तिचे भाषांतर
करणारे रायबोसोम फक्त जिवंत पेशीत असतात आणि म्हणून तो सतत सजीव पेशीच्या शोधात असतो. एकदा पेशीत प्रवेश केला की तो त्या पेशीचे जणू अपहरण करतो आणि पेशीची पूर्ण यंत्रणा विषाणूच्या सांकेतिक लिपीच्या तालावर नाचू लागते. सजीव पेशीच्या मदतीने तो आपल्या सारखेच असंख्य विषाणू तयार करतो.

आणखी वाचा: Health Special: सतत वेदना आणि थकवा देणारा ‘हा’ आजार कोणता?

यालाच आपण व्हायरस मल्टीप्लीकेशन म्हणतो. यासाठी तो पेशीतील सर्व साहित्य वापरत जातो आणि पेशीला इजा पोहचवितो. विषाणू हा जीवाणू पेक्षा वेगळा असतो. म्हणूनच जिवाणू वर उपयुक्त ठरणारी अँटिबायोटिक्ससारखी औषधे विषाणू वर उपयोगी ठरत नाहीत. त्यासाठी वेगळी अँटी वायरल म्हणजे विषाणू विरोधी औषधे लागतात. विषाणू बदलतात म्हणजे काय आणि विषाणू का बदलतो, हे दोन प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनामध्ये आहेत. विषाणू एखाद्या सजीव पेशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याची वाढ होते म्हणजे तो स्वतःच्याच अनेक कॉपी तयार करतो. एका अर्थाने एखाद्या झेरॉक्स मशीनवर आपण मूळ कागदपत्राच्या अनेक प्रती कराव्यात, अशा पद्धतीने एका विषाणू कणाचे अनेक विषाणू कण पेशी मध्ये तयार होतात. मात्र या कॉपी तयार करताना आपल्याकडून जसे टायपो होतात,स्पेलिंग मिस्टेक होतात त्या पद्धतीने विषाणूंच्या कॉपी करतानाही घडते आणि त्यातून विषाणूच्या रचनेमध्ये बदल होऊन विषाणू म्युटेट होतो. विषाणू मध्ये होणारे हे बदल अनेकदा नजरचुकीने होणारे बदल असतात तर काही वेळा यजमानाच्या प्रतिकार शक्तीला फसविण्यासाठी, तिच्यावर मात करण्यासाठी विषाणू विरोधी औषधांचा मारा चुकवण्यासाठी केलेले जाणीवपूर्वक बदलही असतात. कोणत्याही सजीवाच्या उत्क्रांतीमधील नैसर्गिक निवड हा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे विषाणू मध्ये हे जे बदल सातत्याने होत असतात त्यातील जो बदल विषाणूला तगून राहण्यासाठी मदत करतो ते बदल अधिक काळ टिकतात. ज्या शरीरामध्ये विषाणूने प्रवेश केला आहे त्याला मारण्यामध्ये विषाणूचेही नुकसान असते. कारण मग त्याला नवीन जिवंत पेशी शोधावी लागते म्हणूनच अत्यंत घातक स्वरूपाचे बर्ड फ्लू सारखे विषाणू अधिक वेगाने पसरताना दिसत नाहीत तर वेगाने पसरणारे फ्ल्यूसारखे विषाणू तेवढे प्राणघातक नसतात.

विषाणू आपली जनुकीय रचना बदलतो तेव्हा त्याचा काय परिणाम होतो?
जनुकीय रचना बदलल्यामुळे विषाणूला काहीवेळा नवे गुणधर्म प्राप्त होऊ शकतात. काही वेळा हे बदल विषाणू प्रसारास सहाय्यभूत ठरतात किंवा काही वेळा प्रसाराचा वेग मंदावतो देखील. काही विशिष्ट बदलांमुळे विषाणू मानवी शरीरातील कोणत्या अवयवावर हल्ला करेल, याचे स्वरूप देखील बदलू शकते.तसेच विषाणूच्या घातकतेमध्ये देखील बदल होऊ शकतात.

एरिस ( ईजी. ५.१) व्हेरियंट
सध्या नव्याने आढळलेला एरिस ( ई.जी. ५.१) हा व्हेरियंट त्या अर्थाने पूर्णपणे नवा नाही. तो ओमायक्रॉन कुटुंबाच एक भाग आहे. स्पाईक प्रथिनामध्ये झालेल्या दोन बदलांमध्ये तो निर्माण झाला आहे. आता इंग्लंड आणि अमेरिकेत तो आढळल्याने त्याची चर्चा सुरु झालेली तरी आपल्याकडे तो मे महिन्यातच सापडलेला आहे आणि एवढे असूनही मागील दोन महिन्यात आपल्याकडे कोविड रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवडयाच्या शेवटी राज्यात केवळ १०३ रुग्ण आहेत आणि त्यातील अवघे ३ रुग्णालयात भरती आहेत. त्यामुळे इंग्लंडमध्ये जरी या विषाणूचा साप्ताहिक प्रसाराचा वेग २०.५१ टक्के अधिक असला तरी आपल्याकडे असे दिसत नाही. प्रत्येक व्हेरियंट वेगवेगळया भूभागात काही प्रमाणात वेगळे वर्तन दाखवू शकतो. या व्हेरियंटमुळे लक्षणे, आजाराची घातकता आणि रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण या मध्ये कोणताही ठळक बदल झालेला नाही, हे महत्वाचे आहे.

मूळात ओमायक्रॉन या विषाणू प्रकाराला अनेकांनी या पूर्वीच नैसर्गिक लसीकरण म्हणून संबोधले आहे. हे नवे बाळ त्याच कुटुंबातील आहे तेव्हा काळजी नसावी. कोविड १९ आजाराच्या पॅन्डेमिककडून एन्डेमिककडे जाण्याच्या प्रवासात हा ओमायक्रॉन मैलाचा दगड आहे, हे या पूर्वीच सिध्द झालेले आहे. एकूण काय विषाणू हे कोणत्याही कसलेल्या अभिनेत्यापेक्षा कमी नसतात. ‘नया दिन नही रात’, चित्रपटामध्ये नऊ भूमिका केलेल्या संजीव कुमार सारखे विषाणू नवे नवे रूप घेऊन आपल्यासमोर सातत्याने येत असतात. पण तरीही मूळ अभिनेता कोण, हे आपण ओळखतोच..! तेवढे हुशार आपणही आहोतच. त्यामुळे विषाणू बदलतो आहे,ही खरं म्हणजे बातमीच नव्हे कारण विषाणू मध्ये बदल होणे हा त्याच्या जीवनक्रमातील नित्यनेमाने घडणारी घटना आहे .त्यामुळे करोना विषाणू आपले रूप बदलतो आहे या घटनेमुळे सर्वसामान्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र पावसाळा आहे कोविड सोबत फ्ल्यू, डेंग्यू , टायफाईड, कोकणात लेप्टो असे आजार श्रावणसरीसोबत येत आहेत तेव्हा त्या संदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. कोविडचे हे नवे एरिस बाळ मात्र अजून तरी गुणी बाळासारखे शांत आहे, हे नक्की!