Everest Fish Curry Masala Recalled Due To Contamination: सिंगापूर फूड एजन्सी (SFA) ने गुरुवारी, एव्हरेस्टच्या फिश करी मसाला या लोकप्रिय भारतीय मसाल्याच्या ब्रँडची उत्पादने बाजारातून परत मागवून घेतली आहेत. या मसाल्यात इथिलीन ऑक्साईड हे एक कीटकनाशक आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजतेय. सिंगापूर फूड एजन्सीने आयातदार SP मुथिया आणि सन्स यांना सदर प्रकरणी निर्देश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं घडलं काय?

एसएफएने स्पष्ट केले की इथिलीन ऑक्साईड हे अन्नामध्ये वापरण्यासाठी सुरक्षित नसतानाही, काहीवेळा कृषी उत्पादकांकडून निर्जंतुकीकरणासाठी याचा वापर रोपांवर केला जातो. जेव्हा या रोपांमधून पुढे विविध पदार्थ तयार होतात या इथिलीन ऑक्साईडचा काही अंश त्यातली शिल्लक राहू शकतो. काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कमी प्रमाण असल्यास लगेचच याचा आरोग्याला धोका निर्माण होत नाही पण सातत्याने असे पदार्थ आपल्या शरीरात जात असतील तर मात्र धोका संभवतो.

इथिलीन ऑक्साईडमुळे शरीराचे किती व कसे नुकसान होते?

आरोग्य व कल्याण विभागाच्या जनरल प्रॅक्टिशनर, डॉ. पृथा हाजरा यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, कमी प्रमाणात इथिलीन ऑक्साईडच्या संपर्कात येणे सुद्धा तितकेच घातक ठरू शकते. अल्पकाळात, व्यक्तींना श्वसनाच्या समस्या, डोकेदुखी, मळमळ, उलट्या किंवा सायनोसिसचा सामना करावा लागू शकतो. तर दीर्घकालीन परिणामांमध्ये प्रजनन समस्या, न्यूरोटॉक्सिसिटी, संवेदना आणि म्युटेजेनिक बदल यांचा समावेश होऊ शकतो. आश्चर्य म्हणजे असं असूनही वैद्यकीय उपकरणे निर्जंतुक करण्यासाठी सुद्धा इथिलीन ऑक्साईड वापरले जाते.

डॉ हाजरा सांगतात की, कीटकनाशके, जेव्हा आपल्या अन्नसाखळीत प्रवेश करतात तेव्हा आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात धोका निर्माण करू शकतात. काही कीटकनाशकांच्या बाबत तर अगदी कमी प्रमाणात संपर्क सुद्धा तीव्र विषबाधेला कारण ठरू शकतो. यामध्ये अतिसार, निर्जलीकरण आणि त्वचेची जळजळ अशी लक्षणे दिसू शकतात.

हे ही वाचा<< केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा

डॉ. हाजरा यांनी सांगितल्याप्रमाणे, रेस्मेथ्रिन, सायपरमेथ्रिन आणि फेनव्हॅलेरेट सारखी काही कीटकनाशके दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण करू शकतात, ज्यात प्रजननामध्ये गुंतागुंत होणे, रोगप्रतिकारक क्षमता कमी होणे, त्वचेचा संसर्ग आणि अंतःस्राव होणे याचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे कमी प्रमाणात पण वर्षानुवर्षे जर या कीटकनाशकांचा आपल्या शरीरात प्रवेश होत राहिला तरी वरील त्रास होऊ शकतात

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everest fish curry masala has pesticide detection action taken in singapore what can happen after eating this masala in long term svs
Show comments