गेल्या काही वर्षांत घरगुती उपचारांची लोकप्रियता वाढत आहे. बहुसंख्य लोक आजार बरे करण्यासाठी या घरगुती उपयांकडे वळत आहेत. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी एक घरगुती उपाय सुचवला आहे. त्यांच्या मते, “भारतीय गुसबेरी म्हणजेच आवळा, रात्रभर मधात भिजवून आणि हिरवी किंवा काळी मिरी ठेचून त्यात टाकावे आणि हे चाटण खाल्ल्यास हंगामी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत होऊ शकते.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इंस्टाग्रामवर sonianarangsdietclinics नावाच्या अकांउटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी त्याची रेसिपी शेअर केली आहे.
आवळा-मध-काळी मिरीचे मिश्रण कसे तयार करावे.
साहित्य
आवळा
मध
हिरवी मिरी किंवा काळी मिरी
पद्धत
कापलेल्या आवळ्याचे तुकडे रात्रभर मधात हिरव्या किंवा काळ्या मिरीसह भिजवून ठेवा.
सेवन कसे करावे?
दिवसातून तीन वेळा, तीन चमचे घ्या.
“हे आवळा-मध-काळी मिरीचे मिश्रण रिकाम्या पोटी उत्तम काम करते. तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली पाहू शकता. यामुळे चार-आठ आठवड्यांत तुम्हाला फरक जाणवेल”, असा दावा सद्गुरू यांनी केला आहे.
आवळा-मध-काळी मिरीचे मिश्रण खरचं उपयूक्त आहे का?
याबाबत आहारतज्ज्ञ सिमरत भुई यांनी प्रत्येक घटकाचे खालील फायदे सांगितले आहेत:
- “आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे उच्च प्रमाण असते, जे शरीराला आजारातून बरे करण्यास मदत करते.”
- “काळी मिरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात आणि काही कर्करोग टाळतात”, असे भुई यांनी सांगितले. “मिरपूडमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात, जे जखमा भरण्यास आणि चयापचय वाढविण्यास मदत करतात.”
- “मधामध्ये दाहकविरोधी, अँटी-मायक्रोबियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे श्वसनाच्या अनेक आजारांवर उपचार करण्यात एक उपचारात्मक भूमिका आहे”, असे भुई यांनी सांगितले.
याबाबत आहारतज्ज्ञ सोनिया नारंग यांनी सांगितले की, “आवळा-मध-काळी मिरी यांचे मिश्रण तुमच्या त्वचेसाठी, केसांसाठी चांगले आहे आणि तुमच्या लाल रक्तपेशींची संख्या वाढवते. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी आणि हृदयाचे एकूण कार्य सुधारण्यासाठी, ते दिवसातून दोनदा घ्या. सकाळी रिकाम्या पोटी आणि सर्वोत्तम परिणामांसाठी रात्रीच्या जेवणानंतर ३० मिनिटांनी त्याचे सेवन करावे”, असे नारंग म्हणाले.
हेही वाचा – ऑम्लेट की इडली; मधुमेही व्यक्तींसाठी सर्वोत्तम नाश्ता कोणता? जाणून घ्या डॉक्टरांकडून…
पोषणतज्ज्ञ अपूर्वा अग्रवाल यांच्या मते, “आवळा, हिरवी मिरी किंवा काळी मिरी आणि मध हे एकत्रित केल्यावर एक शक्तिशाली ‘प्रतिकार-समर्थक अमृत’ तयार करण्यासाठी कार्य करतात. काळी मिरीमधील जैवउपलब्धता-वर्धक (Bioavailability-enhancer) ‘पाइपरिन’ आणि आवळा व हिरवी मिरीमधील ‘व्हिटॅमिन सी’ यासह हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट त्रिकूट ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि संक्रमणांपासून शरीराचे संरक्षण करते.”
तज्ज्ञांनी नोंदवले आहे की, हे शक्तिशाली मिश्रण रोगप्रतिकारकसंबंधित आजारांचा धोका कमी करून दीर्घकाळापासून जाणवणारा दाह कमी करते आणि संक्रमणाविरुद्ध शरीराचे संरक्षण करते. आवळा शरीराद्वारे अधिक सहजपणे शोषला जाऊ शकतो आणि संपूर्ण रात्र भिजवून ठेवल्यानंतर त्याची जैवउपलब्धता वाढू शकते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून आणि शरीराच्या नैसर्गिक संरक्षणास समर्थन देऊन, हे मिश्रण नियमितपणे सकाळी घेतल्यास सामान्य आरोग्य सुधारू शकते”, असे अग्रवाल म्हणाले.
हेही वाचा- इतरांच्या संपर्कात न राहणे, एकटेपणामुळे लठ्ठ होण्याचा धोका वाढतो का? जाणून घ्या काय सांगते संशोधन
” आवळा-मध-काळी मिरी या तिन्ही पदार्थांचे मिश्रणचे सेवन हे हंगामी खोकला, सीओपीडी आणि श्वसनमार्गाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती म्हणून वापरले जाऊ शकते. नियमित वापरामुळे शरीरात व्हिटॅमिनची पातळी वाढते, त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते”, असे भुई यांनी सांगितले.
“जर तुमच्या रक्तातील साखरेची उच्च पातळी किंवा अनियंत्रित मधुमेह असेल तर कोणत्याही घरगुती उपचारांचा अवलंब करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.”