निरोगी आयुष्यासाठी लोक आता जागरुक होत आहे. चांगल्या आरोग्यासाठी लोक योगा- व्यायाम, आहार आणि झोप या सवयींकडे लक्ष देत आहे. वजन कमी करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी लोक विविध आहार आणि हेल्थ ट्रेंड फॉलो करत असतात. असा एक हेल्थ ट्रेंड सध्या चर्चेत आहे तो म्हणजे डिटॉक्स ज्यूस. आपल्यापैकी कित्येकजण शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे फळ आणि भाज्यांचा रस आणि स्मुदींचे सेवन करतात. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात तज्ज्ञांनी या फळ आणि भाज्यांचा रस आणि स्मुदीं सारख्या डिटॉक्स ज्युसच्या सेवनाबाबत खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.
फळे आणि भाज्या मिश्रित डिटॉक्स ज्यूसच्या सेवनाबाबत तज्ज्ञांचा इशारा
हेपॅटोलॉजिस्ट अॅबी फिलिप्स यांच्या मते, आधीपासून यकृताच्या आजाराने ग्रस्त असलेल्यांसाठी फळे आणि कच्च्या भाज्यांचे मिश्रणाचे डिटॉक्स ज्यूसचे सेवन करणे हानिकारक ठरू शकते. ट्विटरवर TheLiverDoc या नावाने प्रसिद्ध असलेल्या या तज्ज्ञाने मायक्रोब्लॉगिंग साइटवर ही माहिती शेअर केलेी आहे. त्याने सांगितले की, दररोज घरी फळ आणि भाज्यांचा रसाच्या मिश्रणाचे सेवन केल्यामुळे मूत्रपिंडाला दुखापत झालेला दुसरा रुग्ण या आठवड्यात पाहिला आहे.
‘जर तुम्ही आधीपासूनच यकृताचा आजाराने असल्यास कृपया फळे आणि भरपूर कच्च्या हिरव्या आणि रंगीत भाज्या ब्लेंडरमध्ये मिक्स करुन स्वतःसाठी डिटॉक्स ज्यूस तयार करु नका” असे ट्विट डॉक्टर फिलिप्स यांनी केले आहे.
“जेव्हापासून ‘व्हॉट्सअॅप’आणि ”यूट्यूब’वरील डॉक्टरांनी गुजबेरी, बीटरूट, पालक आणि हिरवी पाले भाज्या आणि लिंबूवर्गीय फळांचे मिश्रण यकृताच्या आरोग्यासाठी पर्याय म्हणून प्रचारित केल्यानंतर हे एक नवीन फॅड विकसित होत आहे. कृपया ते करू नका. यामुळे ऑक्सलेट मूत्रपिंडाला दुखापत होऊ शकते आणि मूत्रपिंड बरे होण्यास बराच वेळ लागतो,” अशी चेतावणी त्यांनी दिली.
यकृत किंवा मूत्रपिंडाचे आजार असलेल्यांनी घ्या विशेष काळजी
बरेच लोक वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी अशा मिश्रणाचे सेवन करण्याचा प्रयत्न करत आहेत हे लक्षात घेऊन, आम्ही अधिक जाणून घेण्यासाठी तज्ञांशी संपर्क साधला. फळे आणि भाज्यांचे ज्यूस हा एक सामान्य जेवणाचा पर्याय झाला आहे हे मान्य करत तज्ञ विविध भाज्या आणि फळे एकत्र करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात, विशेषत: ज्यांना यकृत किंवा मूत्रपिंडाचे आजार आहेत त्यांच्यासाठी.
World Sleep Day 2023: शांत झोपेसाठी मदत करतील ५ सर्वोत्तम पेय
फळ आणि भाज्या मिश्रित ज्यूस मूत्रपिंडासाठी असा ठरतो धोकादायक
”यकृत आणि मुत्रपिंडाच्या आजारांच्या बाबातीत विशिष्ट पोषक घटकांचे चयापचय गंभीर ठरते आहे हे चिंतेचे कारण आहे. त्यामुळे रस किंवा स्मुदीसाठी तुम्ही कोणत्या प्रकारच्या भाज्या आणि फळांचे मिश्रण करण्याची निवड करत आहात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे”, असे नोंदणीकृत आहारतज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितले. ”ज्यूसिंगमुळे शरीरात ऑक्सलेटचे उत्पादन देखील होते” असेही त्या म्हणाल्या.
याबाबत शारदा हॉस्पिटलचे एमडी (इंटर्नल मेडिसिन) डॉ. श्रेय श्रीवास्तव यांनी सांगितले की,” ऑक्सलेट नेफ्रोपॅथी (ON) जी ऑक्सलेट उत्पादनामुळे उद्भवते – जेव्हा मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये अचानक आणि/किंवा दीर्घकालीन घट झाल्यामुळे परिभाषित केली जाते. जे मूत्रपिंड ट्यूबल्समध्ये कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स डिपॉझिशनशी संबंधित आहे.”
”ऑक्सलेटच्या प्रमुख आहार स्रोतांमध्ये पालेभाज्या (उदा. पालक), चॉकलेट, वायफळ बडबड, बीट्स, चार्ड, चहा, नट आणि गव्हाचा कोंडा यांचा समावेश होतो. व्हिटॅमिन सी आणि एमिनो अॅसिड समृध्द असलेले अन्न मूत्रपिंडमध्ये ऑक्सलेटचे स्फटिक तयार करतात आणि कच्च्या हिरव्या आणि रंगीत भाज्यांमध्ये फळे मिसळल्याने ती प्रक्रिया वाढेल, ज्यामुळे समस्या निर्माण होतात.” डॉ. श्रीवास्तव पुढे म्हणाले.
हैदराबादमधील कामिनेनी हॉस्पिटलचे वरिष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हेपॅटोलॉजिस्ट डॉक्टर पराग दशतवार यांनी सांगतिले की, ”डिटॉक्स ज्युसमुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या देखील उद्भवू शकतात, जसे की हायपर अॅसिडिटी, ब्लोटिंग आणि डायरिया.”
लठ्ठपणामुळे होणारा मधुमेहाचा धोका कमी करु शकते कॅफीन, संशोधनाचा निष्कर्ष
डिटॉक्स ज्यूसच्या आरोग्यादायी असण्याबाबत कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत
“यकृत रोगासारख्या जटिल वैद्यकीय समस्या समजणे कठीण असू शकते आणि बर्याचदा द्रुत आणि सोप्या उपायांचा अभाव असतो. यामुळे पारंपारिक औषधांबद्दल असंतोष आणि अविश्वास निर्माण होतो. स्यूडोसायन्स अनेकदा या पर्यायी औषधांच्या नावाखाली पारंपारिक उपाय आणि डिटॉक्स या असुरक्षिततेचा फायदा घेतात. ते पारंपारिक औषधांपेक्षा अधिक समग्र, नैसर्गिक आणि कमी हानिकारक मानले जातात. डिटॉक्स ज्यूस आपल्या शरीरातील विषारी पदार्थ प्रभावीपणे काढून टाकू शकतो या कल्पनेचे समर्थन करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत,” डॉ दशतवार म्हणाले.
त्यांच्या मते, उपरोधिकपणे, ते आधीपासून अस्तित्वात असलेले यकृताचे नुकसान वाढवू शकते किंवा “आधी अस्तित्वात नसताना यकृताचे नुकसान करु शकते”.