Why Urinating After Sex is Important: युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) ही एक सामान्य समस्या ठरत आहे. लघवी करताना प्रायव्हेट पार्टला प्रचंड वेदना व जळजळ जांवर असल्यास त्यामागील एक कारण हे युटीआय सुद्धा असू शकते. सुदैवाने, UTI चा धोका कमी करण्याचे मार्ग आहेत. मूत्रमार्गाच्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी अनेक डॉक्टर प्रायव्हेट पार्टसच्या स्वच्छतेवर भर देण्याचा सल्ला देतात. अनेकदा आपण लघवी थांबवून ठेवू नये हा सल्ला ऐकला असेल विशेषतः सेक्स केल्यावर लघवी करण्याबाबत अनेकदा गूगलला प्रश्न केले जातात. आज आपण या प्रश्नाचे नेमके उत्तर व त्याचे शरीरावर होणारे प्रभाव जाणून घेणार आहोत.
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे काय? (What Is UTI)
मूत्रमार्गाचा संसर्ग हा तुमच्या मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागात होणारा बॅक्टेरियाचा संसर्ग आहे. मूत्रमार्ग ही अवयवांना एकमेकांशी जोडणारी प्रणाली आहे जी मूत्र बनवते- साठवते क शरीराबाहेर काढून टाकते. वेळच्या वेळी मूत्र शरीराबाहेर न पडल्यास किडनी, मूत्राशय या अवयांमध्ये बिघाड होऊ शकतो. यूटीआयच्या सर्वात सामान्य प्रकाराला सिस्टिटिस म्हणतात. याशिवाय युरेथ्रायटिस व पायलोनेफ्रायटिस हे यूटीआयचे सर्वात गंभीर प्रकार आहेत.
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन कशामुळे होते? (What Causes UTI)
जेव्हा बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश करतात तेव्हा UTI चा धोका वाढतो. सामान्यतः जेव्हा त्वचेवर किंवा गुदद्वाराजवळील बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश करतात तेव्हा असे होते. शारीरिक फरकांमुळे, पुरुषांपेक्षा स्त्रियांना यूटीआय होण्याची शक्यता जास्त असते.
‘या’ गोष्टींमुळे वाढतो युटीआयचा धोका
- सेक्स
- गर्भधारणा
- वय (वृद्ध प्रौढ आणि लहान मुलांना UTI चा जास्त धोका असतो)
- वाढलेल्या प्रोस्टेटसह मूत्रमार्गातील समस्या
- शौचानंतर नीट स्वच्छता न करणे
- योनिमार्गातील बदल, रजोनिवृत्ती किंवा शुक्राणूनाशकांचा वापर, ल्युबचा वापर
युटीआयची लक्षणे (UTI Early Symptoms)
- यूटीआयची लक्षणे सहज ओळखता येण्यासारखी असतात.
- लघवी करताना वेदना किंवा जळजळ
- लघवीत रक्त येणे
- फेसाळ लघवी
- वारंवार लघवीला जावे लागणे तरीही लघवी न होणे
- ओटीपोटात दुखणे
- ताप आणि थंडी वाजून येणे, पाठदुखी, मळमळ आणि उलट्या
हे ही वाचा<< बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर व वजनावर होतो सर्वात मोठा परिणाम; ४०० जणांमध्ये दिसले ‘हे’ बदल
युटीआय उपचार (UTI Cure)
तुम्हाला UTI आहे असे वाटत असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच आपण खालीलप्रमाणे घरगुती उपचारही अवलंबून पाहू शकता.
- योनी आणि क्लिटॉरिसच्या जवळ युटीआयचा सर्वात मोठा धोका असतो.वेबएमडीने काही आरोग्य सेवा तज्ज्ञांच्या हवाल्याने सांगितले की, सेक्सनंतर लघवी केल्यास मूत्रमार्गातील बॅक्टेरिया बाहेर पडतात. लघवी केल्यानंतर पुढून मागच्या बाजूने योनी मार्ग पुसून काढा.
- पाणी पिऊन शरीराला हायड्रेटेड ठेवा
हे ही वाचा<< किडनी निकामी करू शकतात ‘ही’ ५ फळे; फ्रुक्टोजमुळे युरिक ऍसिड वाढून शरीरच देतं गंभीर संकेत
- क्रॅनबेरी ज्यूस नियमितपणे प्यायल्याने यूटीआयचा धोका कमी होऊ शकतो.
- अधिक केमिकल्स असणारे साबण योनीमार्गावर वापरू नका. साबणाचा Ph लेव्हल जाणून मगच वापर करा. फार कडक ब्रशने घासू नका.
- गर्भनिरोधक गोळ्या व कंडोम डॉक्टरांशी चर्चा करूनच ठरवा.