उन्हाळा सुरू झाला आहे. सुर्य आग ओकतो आहे. या वातावरणामध्ये तुम्हाला उन्हापासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही काही ना काही पर्याय शोधक असता. कोणी आईस्क्रीम खातात, कोणी थंडगार ज्यूस पितात, कोणी हलके कपडे घालतात आणि तर घरात राहतात. आपल्या आरोग्याची काळजी घेताना आपण आपल्या शरीराच्या सुरक्षितेची काळजी घेतो पण आपल्या शरीराच्या सर्वात महत्त्वाच्या भागाची काळजी घेण्यास विसरतो ते म्हणजे डोळे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बहुतेक लोक स्ट्रिक्ट स्किनकेअर रुटीन पाळतात आणि उष्ण हवामानात सामावून घेण्यासाठी त्यांचा आहार बदलतात. पण उन्हाळ्यात डोळ्यांच्या संरक्षणाकडे मात्र दुर्लक्ष करतात. वाढत्या तापमानामुळे डोळ्यांशी संबंधित जंतुसंसर्ग वाढत आहे. डॉ नेहा अरोरा यांनी फायनाशिअल एक्सप्रेसला याबाबत माहिती दिली आहे ज्यामध्ये उन्हाळ्यात डोळ्यांच्या बाबतीत निर्माण होणाऱ्या काही सामान्य समस्या देखील समाविष्ट आहेत:

  1. डोळ्यांची ऍलर्जी: वाढते तापमान आणि हवेतील प्रदूषकांची उच्च पातळी उन्हाळ्यात तुमचे डोळे अधिक संवेदनशील बनवू शकते. डोळ्यांच्या ऍलर्जीच्या काही सामान्य लक्षणांमध्ये डोळे लाल, डोळ्यांना खाज सुटणे आणि डोळे जळणे यांचा समावेश होतो.
  2. नेत्रश्लेष्मलाशोथ(कंजक्टिवाइटिस) : एखाद्या व्यक्ती एक किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये नेत्रश्लेष्मलाशोथ (गुलाबी डोळा) अनुभवू शकतो. या स्थितीमुळे डोळे लाल होतात, खाज सुटते आणि अश्रू येतात. डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा दाह होण्याचे कारण जीवाणूजन्य, विषाणूजन्य किंवा ऍलर्जी असू शकते आणि संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्काद्वारे प्रसार होऊ शकतो.
  3. कोरडे डोळे: उन्हाळ्यात डोळे कोरडे होणे अधिक सामान्य आहे कारण उच्च तापमानामुळे अश्रू फिल्म खूप लवकर बाष्पीभवन होते. ज्यांना पूर्वी डोळ्यांशी संबंधित समस्या होत्या त्यांना कोरडे डोळे होण्याची शक्यता असते.
  4. स्टाय: स्टाय हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे ज्यामुळे एक किंवा दोन्ही पापण्या सुजतात. रुग्णांना डोळा दुखणे, सूज येणे आणि लालसरपणा येऊ शकतो. ही स्थिती प्रौढांपेक्षा मुलांमध्ये जास्त असते.
  5. फोटोकेरायटिस:सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे डोळ्याच्या पृष्ठभागावर जळजळ होऊ शकते, ज्यामुळे वेदना, लालसरपणा, अस्पष्टता आणि दृष्टी तात्पुरती कमी होते. एखादी व्यक्ती सनग्लासेस, टोपी किंवा छत्री वापरून हे टाळू शकते.

    हेही वाचा : Asthma : रात्री अचानक येणारा दम्याचा झटका टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय?

जरी या समस्या सहसा काही काळासाठी असतात, त्या अत्यंत त्रासदायक असू शकतात. या समस्या टाळण्यास मदत करण्यासाठी येथे काही सोप्या पायऱ्या आहेत:

  1. अल्ट्राव्हायोलेट (UV) संरक्षणासह सनग्लासेस डोळ्यांना कोणत्याही प्रकारच्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत करतात आणि कोणत्याही प्रकारच्या सूर्यप्रकाशास देखील कमी करतात.
  2. कमीत कमी 7-9 तास झोपा कारण ते तुमच्या डोळ्यांना नैसर्गिक पद्धतीने टवटवीत करण्यास मदत करते.
  3. तुमचे डोळे सुजलेले किंवा लाल असल्यास, लक्षणे दूर करण्यात मदत करण्यासाठी त्यांना दिवसातून काही वेळा थंड पाण्याने धुण्याचा प्रयत्न करा.

    हेही वाचा : संत्री-लिंबाच्या तुलनेत आवळ्यामध्ये ९ पट जास्त असते व्हिटॅमिन सी, जाणून घ्या त्याचे फायदे
  4. तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी आणि अति सूर्यप्रकाशाच्या हल्ल्यापासून बरे होण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, फळे, गाजर,, नट इत्यादींचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करा.
  5. पुरेशा प्रमाणात पाणी पिऊन उन्हाळ्यात चांगले हायड्रेटेड राहा, आणि निरोगी आहारा आणि फळांचा रस घेतल्ल्याने कोरडे डोळे टाळता येतात आणि उन्हाळ्यात तुम्हाला चांगले हायड्रेट ठेवता येते.
  6. कृत्रिम अश्रू किंवा कोणत्याही प्रकारचे पर्याय (जसे की आय ड्रॉप) डोळ्यातील नैसर्गिक ओलावा पुनर्संचयित करण्यात मदत करू शकतात. उन्हाळ्यात त्यांचा वापर हा हायड्रेटेड राहण्याचा एक उत्तम मार्ग आहे, केवळ कोरडेपणा टाळण्यासाठीच नाही तर कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी देखील. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे आय ड्रॉप वापरा.
  7. तुमच्या डोळ्यांना आराम देण्यासाठी, डोळे बंद करून काकडीचा तुकडा थोडावेळ धरून ठेवा.
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eye health how does the summer heat damage your eyes how to take care learn from experts snk