डोळे कोरडे पडण्याच्या समस्येचा अनेक मुलांना सामना करावा लागतो. या समस्येला “ड्राय आय सिंड्रोम’ असं म्हणतात. यामध्ये मुलांचे डोळे कोरडेपणामुळे ताणले जातात. खरं तर, कोरड्या डोळ्याच्या समस्येमुळे सकाळच्या वेळी तर कधीकधी दिवसभर वेदना होत राहतात. या त्रासामुळे तुमच्या मुलाची दृष्टी अंधुक होऊ शकते. परंतु कोरड्या डोळ्यांमुळे दीर्घकाळ दृष्टीची समस्या उद्भवत नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुलांचे डोळे कोरडे होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. ज्यामध्ये प्रदूषण, धूर किंवा डोळ्यांना त्रास होऊ शकतो अशा इतर गोष्टीही कारणीभूत ठरु शकतात. ऍलर्जी किंवा कॉन्टॅक्ट लेन्स यांच्यामुळेदेखील डोळ्यांना त्रास होऊ शकतो. तुमच्या मुलाचे डोळ्यांना बरे वाटण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. यासह काही घरगुती उपायदेखील करु शकता.
हेही वाचा- जेवल्यानंतर लघवी केल्याने डायबिटीज होत नाही? यामागील सत्य काय ते तज्ञांकडून जाणून घ्या
मुलांचे डोळे कोरडे का पडतात?
ड्राय आय सिंड्रोमची समस्या त्या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवते जी सतत मोबाईलचा, संगणकाचा वापर करतात, तसंच जे तासनतास वाचन करतात. डोळे कोरडे पडल्यामुळे ते जळजळ करतात, डोळ्यांमध्ये खाज सुटते आणि ते लुकलुकतात. ज्यामुळे मुलांना वर्गात लक्ष केंद्रित करणं अवघड होऊन जातं. मुलांचे डोळे कोरडे पडण्यास अनेक कारणे जबाबदार असू शकतात. त्यापैकी काही कारणे खालीलप्रमाणे –
- एखादी ऍलर्जी
- कॉन्टॅक्ट लेन्स घालणे
- पोषणाची कमतरता
- स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणांचा अतिवापर
अनेकदा मुलांना त्यांच्या डोळ्यांशी संबंधित समस्या योग्य प्रकारे सांगता येत नाहीत. मात्र त्यांना हा त्रास जाणवायला लागल्यावर ते सतत डोळे चोळतात. त्यामुळे पालकांनी मुलांवर लक्ष ठेवायला हवं.
हेही वाचा- लहान मुलांसाठी किडनीची सूज बनू शकते मोठी समस्या, ‘ही’ लक्षणे दिसताच करा उपचार
ड्राय आय सिंड्रोमची सामान्य लक्षणे –
- डोळे वारंवार लुकलुकणे
- डोळ्याभोवती लालसरपणा येणे
- सतत डोळे चोळणे
- डोळ्यांच्या आजूबाजूला जळजळ होणे
- अंधुक दिसणे
- वाचण्यात अडचण, डिजिटल उपकरणांवर काम करतानाही डोळ्यांना त्रास होणे.
घरगुती उपचार –
- मुलांना धूर आणि डोळ्यांना त्रास देणाऱ्या इतर गोष्टींपासून लांब ठेवा
- मुलं बाहेर जाताना त्यांनी सनग्लासेस घातल्याची खात्री करा. टोपी किंवा छत्री वापरण्याचा प्रयत्न करा. कारण ते सूर्य, वारा आणि धूळीपासून मुलांच्या डोळ्यांचे संरक्षण करू शकतात.
- तुमच्या मुलाच्या पलंगाजवळ ह्युमिडिफायर ठेवा.
- झोपताना पंख्याचा वापर टाळा
- जर तुमचे मूल सहसा कॉन्टॅक्ट लेन्स घालत असेल, तर त्याला रीवेटिंग ड्रॉप्स वापरण्यास सांगा किंवा डोळ्यांना बरे वाटेपर्यंत चष्मा घाला.
- डोळ्यांसबंधित औषध घ्या. अधूनधून तुमच्या नेत्रचिकित्सकांचा सल्ला घ्या.
- रोज सकाळी सुमारे ५ मिनिटं मुलाच्या पापण्यांवर एक उबदार, ओलसर कापड ठेवा. नंतर पापण्यांना हलके मसाज करा. यामुळे डोळ्यांची नैसर्गिक ओलेपणा वाढण्यास मदत होते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, डोळ्यांसंदर्भातील अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)