Shalini Passi Diet Secret: नेटफ्लिक्सच्या ‘फॅब्यूलस लाईव्स वर्सेस बॉलीवूड वाईव्स’ (Fabulous Lives of Bollywood Wives) या सीरिजमुळे सध्या शालिनी पासी या चर्चेत आहेत. यामुळे त्यांचे फॅन्स त्यांच्या लाईफस्टाईल आणि डाएटबद्दल जाणून घेण्यास नेहमीच उत्सुक असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डाएटबद्दल बोलताना शालिनी पासी यांनी खुलासा केला की, चांगल्या आरोग्यासाठी काळं मीठ खूप फायदेशीर ठरतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“काळं मीठ हे तुमच्या आरोग्यासाठी सर्वात मोठं डिटॉक्स आहे. काळ्या मिठात लिंबू आणि पाणी मिक्स करा आणि ते प्या. हे शरीरातील आम्लता काढून टाकते”, असं शालिनी पासी यांनी पिंकविलाला सांगितलं.

हेही वाचा… Belly Fats: पोटाची चरबी वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ पद्धत एकदा वापरून पाहा

जिनल पटेल, आहारतज्ज्ञ, झायनोवा शालबी हॉस्पिटल, मुंबई यांनी सांगितले की, भारतीय काळं मीठ, ज्याला ‘काला नमक’ असेही म्हटले जाते, ते अनेक खनिजांनी भरलेले असते; जे केवळ चवदार नसून “डिटॉक्सिफिकेशन”साठीदेखील उपयोगी आहे. “जेव्हा याला अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीबरोबर घेतले जाते, तेव्हा ते एक ताजेतवाने टॉनिक तयार करते, जे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते,” असे पटेल यांनी सांगितलं.

मिठामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सदेखील असतात, जे संतुलित पीएच पातळी आणि निरोगी पचन वाढवण्यास मदत करतात. “हे मिश्रण चयापचय प्रक्रिया सुधारते आणि शरीराला महत्त्वपूर्ण पोषण देते असे मानले जाते. लिंबू यकृताचे कार्य उत्तेजित करतात, शरीरातून हानिकारक पदार्थ अधिक कार्यक्षमतेने काढून टाकण्यास मदत करतात,” असं पटेल म्हणाल्या.

हेही वाचा… बापरे! रोज टॉवेल न धुता वापरताय? यामुळे होऊ शकतात त्वचेचे गंभीर आजार, वाचा तज्ज्ञांचे मत

जिनल पटेल यांनी सांगितलं की, काळ्या मिठाच्या खनिज सामग्रीसह हे मिश्रण ब्लोटिंग किंवा अपचन यांसारख्या सामान्य पाचन समस्या दूर करू शकते. तथापि, यात लिंबू घालताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे पटेल यांनी सांगितले. जास्त लिंबू ॲसिड रिफ्लक्स, पोट खराब होणे आणि मायग्रेनसाठी आमंत्रण ठरू शकतं.”

याचे नेमके प्रमाण किती?

दिवसातून केवळ तीन ते चारवेळा हे पाणी प्या. “केवळ सोशल मीडियावर ट्रेंड चालला आहे म्हणून डिटॉक्स वॉटर घेत जाऊ नका. त्याचे फायदे समजून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि नंतरच थोड्या वेळासाठी ते सुरू करा,” असे पटेल यांनी सांगितले.

(टीप : हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. आपल्या दिनचर्येत कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या आरोग्य चिकित्सकाचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fabulous lives vs bollywood wives fame shalini passi said black salt aka kala namak is the biggest detox that removes water retention dvr