Facial Exercise For Glowing Skin : वाढत्या वयामुळे आपल्या त्वचेमध्ये अनेक बदल होत असतात. सुरकुत्या येणे ही सामान्य गोष्ट आहे; पण बऱ्याचदा अशा वृद्धत्वाची लक्षणे वेळेआधी दिसू लागतात. अशा वेळी महिला मेकअप करून या खुणा लपवण्याचा प्रयत्न करतात. सामान्यतः बदललेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे तुम्ही अकाली वृद्ध दिसू लागता. चेहऱ्याच्या काही व्यायामाने सुरकुत्या येण्याच्या समस्येपासून बऱ्याच अंशी तुमची सुटका होऊ शकते. चला तर मग अशा चेहऱ्याच्या व्यायामांबद्दल जाणून घेऊ; जे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी दी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

फिश फेस योगा

Nagpur, Thieves stole donation box Mahal,
साक्षात ‘विघ्नहर्ता’ मंडपात, तरीही चोरट्यांनी साधला डाव
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Kaustubh Pandharipande faces a big challenge of kidney disease
नागपूर : माळरानाच्या संवर्धकासमोर किडनी आजाराचे मोठे आव्हान
documentary making, Abhijit Kolhatkar, Shilpa Godbole, producer director duo, documentary, Urdu ghazal, Shashikala Shirgopikar, Reverb Production, passion project, artistic journey
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : अद्यायावतीकरणाचा उद्योग…
Badlapur sexual assault case,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीच्या चारित्र्याविषयी माहिती गोळा करण्याचे काम सुरू
article about badlapur school sexual assault case sexual harassment against women and girl
तिला कणखर करणे महत्त्वाचे!
order of CIDCO Deputy Registrar to submit Building Hazardous Certificate navi Mumbai
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश
Documentary, future, struggle,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : उद्यासाठीचा आटापिटा…

या व्यायामाने सुरकुत्याची समस्या दूर केली जाऊ शकते. वास्तविक हा व्यायाम गालांच्या स्नायूंना टोन करतो आणि चेहऱ्याची त्वचा ताणण्यासही मदत करतो. त्याशिवाय हा व्यायाम रोज केल्यास रक्ताभिसरणही सुरळीत होते आणि त्यामुळे त्वचेवर चमकही येते. फिश फेस एक्सरसाइज करण्यासाठी तुमचे गाल व ओठ आतल्या बाजूला खेचा आणि पाच ते १० सेकंद या आसनात राहा. नंतर शरीराला आराम द्या आणि हा व्यायाम १० ते १५ वेळा करा.

फिश फेस योगा कसा करायचा

१. तोंड बंद करा आणि माशाच्या चेहऱ्याप्रमाणे गाल आतल्या बाजूला खेचून घ्या.
२. या पोजमध्ये राहून हसण्याचा प्रयत्न करा.
३. १५ ते २० सेकंद या पोजमध्येच राहा. तुम्हाला गाल आणि जबड्याच्या भागात तणाव जाणवेल.
४. आता पोज सोडा आणि आराम करा.
५. ही एक्सरसाइज नियमितपणे किमान पाच वेळा करा.

शीर्षासन

शीर्षासन हे अत्यंत महत्त्वाचे आसन आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हे सर्वोत्तम आसन आहे. या आसनामुळे मेंदूपर्यंत अधिक रक्तपुरवठा होतो. मानसिक तणाव दूर करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.

शीर्षासन कसे करायचे

१. एखादे कापड गुंडाळून केलेली गादी प्रथम डोक्याखाली ठेवावी.

२. दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवा आणि कोपऱ्यापर्यंत हात जमिनीवर टेकवा. एकमेकांत अडकवलेली बोटे मधोमध ठेवा.

३. डोक्याचा वरचा भाग गादीवर आणि गुडघे जमिनीवर टेकलेले असावेत.

४. शरीराचा भार मानेवर, तसेच हाताच्या कोपरांवर संतुलित करावा.

५. एक गुडघा दुमडत हळूहळू वर उचलावा. त्याचबरोबर दुसरा गुडघा दुमडून हळूहळू वर उचलावा.

हेही वाचा >> Yoga Tips: उच्च रक्तदाबामुळे त्रस्त आहात? रोज सकाळी करा ‘ही’ योगासने; तणावही होईल कमी

६. आता पाय समांतर रेषेत येतील, असे ठेवावेत. या अवस्थेत असताना श्वासाची गती सामान्य असू द्या.

७. पूर्वावस्थेत येण्यासाठी हळूहळू पाय खाली घ्यावेत. त्यानंतर शवासन करा किंवा उभे राहा.