PCOS & Facial Hair Treatment: मॉडेल व सामाजिक कार्यकर्ती हरनाम कौर हिचा दाढी असलेला लुक हा कितीही प्रेरणादायी असला तरी इथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की हा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) चा परिणाम आहे. या स्थितीत तुम्हाला मासिक पाळीत अडचणी येतात. तसेच स्त्रीच्या शरीरात अँड्रोजन नावाचे पुरुष संप्रेरक (हार्मोन्स) अधिक प्रमाणात असतात. या स्थितीला हायपरअँड्रोजेनिझम असेही म्हणतात. आपल्याला किंवा आपल्या ओळखीत इतर कुणाला जर हा त्रास असेल आणि आपण चेहऱ्यावर वाढणाऱ्या अनावश्यक केसांची वाढ थांबवू इच्छित असाल तर आज आपण यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन जाणून घेणार आहोत.

हायपरअँड्रोजेनिझम म्हणजे काय?

डॉ. आस्था दयाल, प्रमुख सल्लागार, प्रसूती आणि स्त्रीरोग, सीके बिर्ला हॉस्पिटल, गुरुग्राम यांनी सांगितले की, “हायपरअँड्रोजेनिझम हे पीसीओएसचे एक वैशिष्ट्य आहे. या स्थितीत स्त्रियांमध्ये, अंडाशयांची गुणवत्ता कमी होते तसेच शरीरात पुरूष संप्रेरकांचा अतिरिक्त प्रमाणात स्राव होती. यामुळे पुरुषांच्या त्वचेप्रमाणे बारीक पुरळ आणि केस महिलांच्या त्वचेवर येऊ शकतात. उदाहरणार्थ, तुमच्या चेहऱ्याचे केस बहुतेकदा दाढीच्या भागात (गाल व हनुवटी) वाढू शकतात. शिवाय तुमच्या छातीवर आणि पोटावर केसांची वाढ होऊ शकते.”

How does Set dosa differ from Benne dosa (1)
सेट डोसा हा बेन्ने डोसापेक्षा वेगळा कसा आहे? कोणता डोसा आहे आरोग्यदायी? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Little Boy Viral Video
“तू मोठा झाल्यावर किती बायका करणार?” चिमुकल्यानं दिलं भन्नाट उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल; VIDEO एकदा पाहाच
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण

“केवळ केसाची वाढच नव्हे तर पुरुषांमध्ये केसगळतीचा दिसणारा पॅटर्न सुद्धा महिलांमध्ये दिसून येऊ शकतो, बहुतांश पुरुषांमध्ये दिसणारा पॅटर्न म्हणजे ज्यात केस कपाळाच्या मधूनच गळू लागतात, हा त्रास PCOS शी लढणाऱ्या महिलांमध्ये सुद्धा दिसून येऊ शकतो. याशिवाय अनियमित मासिक पाळी, वजन कमी जास्त होणे असेही त्रास वाढू लागतात. आश्चर्यकारक बाब म्हणजे बारीक शरीर असलेल्या PCOS रूग्णांमध्ये एंड्रोजेनिक वैशिष्ट्ये थोडी अधिक ठळकपणे दिसून येतात. काही वेळा रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात आणि त्यामुळे मिशा किंवा चेहऱ्यावरील केसही वाढू शकतात.”

हायपरअँड्रोजेनिझमवर उपचार काय?

डॉक्टर दयाल यांच्या माहितीनुसार, सामान्यतः काही जीवनशैलीतील बदल आणि इन्सुलिन सेन्सिटायझर या समस्यांवर उपाय ठरू शकतात. तर काहीवेळा आपल्याला मुरुम आणि चेहऱ्यावरील केसांचे प्रमाण कमी करण्यासाठी अँटी-टेस्टोस्टेरॉन औषधे घेता येऊ शकतात. टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करण्यासाठी औषधे काम करण्यास वेळ घेतात. त्यामुळे ज्या स्त्रियांना पुरळ किंवा केसांसंबंधित समस्या येत असतील त्यांना पीसीओएस-विशिष्ट उपचारांची गरज असते.”

मेटफॉर्मिन आणि थायाझोलिडिनेडिओन्स सारखी इन्सुलिन-कमी करणारी औषधे, इंसुलिन आणि एन्ड्रोजनची पातळी कमी करतात. ही औषधे काळजीपूर्वक घ्यावीत कारण यामुळे ऍलर्जीक प्रतिक्रिया, श्वासोच्छवासाच्या समस्या, मंद किंवा अनियमित हृदयाचे ठोके, लघवीत रक्त आणि रक्तातील साखर कमी होणे अशी लक्षणे दिसून येऊ शकतात.

याशिवाय गोनाडोट्रॉपिन-रिलीझिंग हार्मोन (GnRH) तुमच्या अंडाशयात एंड्रोजनचे उत्पादन कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतात. परंतु हा महाग पर्याय आहे. शिवाय याचा प्रभाव गर्भनिरोधक गोळ्यांप्रमाणेही असू शकतो. या औषधांच्या साइड इफेक्ट्समध्ये चमक भरणे, वजन वाढणे, कामवासना कमी होणे (हायपोगोनाडिझम) यांचा समावेश असू शकतो.

चेहऱ्यावरचे केस काढल्यास वेगाने वाढतात? जाड होतात? फेशियल हेअरबाबत त्वचा तज्ज्ञांनी सोडवले सर्व मुख्य प्रश्न

हायपरएंड्रोजेनिझमची इतर कारणे आहेत का?

हायपरएंड्रोजेनिझमसाठी कारणीभूत अन्य अनेक हार्मोन्स आहेत जे एंड्रोजनच्या उत्पादनावर आणि स्रावावर प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ, ल्युटेनिझिंग हार्मोन (LH) आणि अॅड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन (ACTH). पिट्यूटरी ग्रंथींमधून दोन्ही हार्मोन्स स्रवतात. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, यांपैकी कोणतेही एक किंवा अधिक योग्य प्रमाणात नसल्यास, हायपरअँड्रोजेनिझम स्थिती उद्भवू शकते.