इंटरनेटवर शेवग्याबद्दल तुम्ही वाचलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे त्यात दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने आहेत. पण या दाव्याची पडताळणी करण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? काळजी करू नका; जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या सुपरफूडप्रमाणे शेवग्याचे अनेक फायदे आहेत. त्याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर जाणून घेऊ या…

शेवगा हा जीवनसत्त्वे ए, सी, ई, के व अनेक बी जीवनसत्त्वे, तसेच कॅल्शियम, लोह, पोटॅशियम व मॅग्नेशियम यांसारख्या खनिजांचाही चांगला स्रोत आहे. त्याशिवाय शेवग्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, पॉलिफेनॉल्स व बीटा-कॅरोटीनसह अँटिऑक्सिडंट्सचे उच्च प्रमाण असते; जे शरीरातील मुक्त रॅडिकल्स निष्प्रभ करण्यात, ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करण्यात मदत करतात. त्यामुळे हृदयविकार, कर्करोग व मधुमेह यांसारख्या जुनाट आजारांपासून संरक्षण मिळविण्यात मदत होऊ शकते, असे डॉ. संगीता तिवारी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. डॉ. तिवारी या NFC आर्टेमिस लाइट येथे क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

Farmers demand geographical classification for organic vaal in Chirner uran news
उरण: चिरनेरच्या सेंद्रिय गोड वालांना हवे भौगोलिक मानांकन
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
india struggles to meet soybean procurement goals
विश्लेषण : सोयाबीन खरेदीची उद्दिष्टपूर्ती का नाही?
bank mitra warn of agitation over low remuneration lack of protection of service
‘बँक मित्रां’चा आंदोलनाचा इशारा; तुटपुंजे मानधन, सेवाशर्तींचे संरक्षण नसल्याने त्रस्त
Ancient Egypt medicine Serqet goddess
Ancient Egyptian History: ४,१०० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील फॅरोचे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा शोध लागला; का आहे हा शोध महत्त्वाचा?
mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
nashik land purchase fraud
नाशिक : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या नावाने फसवणूक, दोन जणांविरुद्ध गुन्हा

इतकेच नाही, तर शेवगा हा फायबरने समृद्ध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे नियमित आतड्यांसंबंधीच्या कार्याला प्रोत्साहन मिळते, बद्धकोष्ठता टाळता येते आणि निरोगी आतड्याच्या आरोग्याला (मायक्रोबायोमला ) समर्थन मिळते. “त्याशिवाय शेवग्याच्या पानांमध्ये उच्च प्रमाणात असलेल्या क जीवनसत्त्व रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि संक्रमणांपासून संरक्षण करण्यास उपयुक्त ठरते,” असे डॉ. तिवारी यांनी सांगितले.

हेही वाचा –वयाच्या पन्नाशीतही तजेलदार त्वचा असणाऱ्या ऐश्वर्या रायने सांगितले सौंदर्याचे रहस्य? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या…

दुसरीकडे तज्ज्ञांनी असे सुचवले आहे, ” दही किंवा ग्रीक योगर्ट हा प्रथिनाचा चांगला स्रोत आहे, जो स्नायूंच्या आरोग्यासाठी आणि दीर्घकाळापर्यंत प्रतिकारशक्तीच्या विरूद्ध वारंवार आकुंचन टिकवून ठेवण्याची स्नायुच्या क्षमतेसाठी आवश्यक आहे. “दह्यामध्ये प्रो-बायोटिक्स असतात, जे आतड्याच्या निरोगी मायक्रोबायोमला समर्थन देतात, तसेच पचन आणि पोषक शोषणास मदत करतात,” असे मत डॉ. ऋतुजा उगलमुगले यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना व्यक्त केले. डॉ. ऋतुजा उगलमुगले या मुंबई सेंट्रल येथे वोक्हार्ट रुग्णालयात अंतर्गत औषध तज्ज्ञ आहेत.

शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने आहेत का?


याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना मुंबई येथे अपोलो स्पेक्ट्रा येथे आहारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या फौजिया अन्सारी (Fauziya Ansari) यांनी सांगितले की, शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात हा दावा वादातीत आहे. शेवगा खरोखरच पौष्टिकतेने समृद्ध आणि वनस्पती-आधारित प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे; विशेषत: शाकाहारी आणि वनस्पती-आधारित आहार करणाऱ्या लोकांसाठी. दही विशेषत: ग्रीक दही हे प्रथिनांनी समृद्ध आहे. पण, एक गोष्ट दुसऱ्यापेक्षा नऊ पट चांगली आहे, असे सुचविणारा कोणताही अभ्यास नाही. संतुलित आहार हा नेहमीच महत्त्वाचा असतो.

हेही वाचा –सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…

प्रथिनांचे सेवन प्रभावीपणे वाढविण्यासाठी आपल्या आहारात विविध पोषक समृद्ध पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. “शेंगा, क्विनोआ, नट (दाणे), बिया, पनीर, मसूर, संपूर्ण धान्य व ओट्स हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत. प्रत्येक पदार्थ महत्त्वपूर्ण प्रथिनांच्या योगदानासह अद्वितीय आरोग्यदायी लाभ देतो. जर तुम्ही आहारात मोठे बदल करू इच्छित असाल, तर आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले आहे. त्यामुळे तुम्हाला निरोगी आणि संतुलित पद्धतीने प्रथिनांचे सेवन कसे वाढवायचे याबद्दल मार्गदर्शन मिळू शकते,” असे अन्सारी म्हणाल्या.

Story img Loader