Fairness Creams Kidney Problems : बरेच जण त्वचेचा रंग उजळवण्यासाठी किंवा त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फेअरनेस क्रीम्स किंवा इंजेक्शनचा वापर करतात. पण, अशा क्रीम्स आणि इंजेक्शनमुळे तुमच्या शरीरावर हानिकारक परिणाम होत असतात याकडे मात्र लोक दुर्लक्ष करतात. उजळ दिसण्यासाठी वर्षानुवर्षे ते अशा प्रकारच्या क्रीम्स, इंजेक्शनचा वापर करीत राहतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण, अशा क्रीम्स आणि इंजेक्शनमध्ये ग्लुटाथिओनचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा फक्त तुमच्या त्वचेवरच नाही, तर इतर अवयवांवरही गंभीर परिणाम होत असतो. अलीकडील अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, यापैकी काही उत्पादनांमध्ये शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा रासायनिक घटक आणि पाऱ्याचे प्रमाण अधिक असते; ज्यामुळे मूत्रपिंडांवर परिणाम होऊ शकतो.

गेल्या काही वर्षांत मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी (एमएन)ची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हा एक असा आजार आहे, ज्यात मूत्रपिंडाच्या शुद्धीकरण यंत्रणेचे नुकसान होते, ज्यामुळे प्रथिनाची मात्रा कमी होत जाते.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना चंदिगड येथील नेफ्रॉलॉजी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. राजा रामचंद्रन सांगतात की, फेअरनेस क्रीम्स मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात आणि त्या पूर्णपणे चाचणी व नियामक मंजुरीनंतरच बाजारात उपलब्ध होतात. पण, तपासणीशिवाय बाजारात विकल्या जाणाऱ्या क्रीम्स तुमच्या त्वचेसाठी सुरक्षित नसतात. त्यात पाऱ्यासारखे हानिकारक पदार्थांचे प्रमाण जास्त असते, जे मूत्रपिंडावर गंभीर परिणाम करतात. तसेच त्यातील ग्लुटाथिओनचे अधिक प्रमाणदेखील किडनी आणि मूत्रपिंडासाठी हानिकारक आहे.

फेअरनेस क्रीम्सच्या वापरानंतर मूत्रातून प्रथिनगळती होण्याचे लक्षण असलेल्या नेफ्रॉटिक सिंड्रोमची प्रकरणे आढळून आली. परंतु, रुग्णांनी वापरलेल्या सर्व क्रीम्समध्ये लेबल, ब्रँडचे नाव किंवा त्यांच्यात वापरलेल्या घटकांबद्दलची माहिती नव्हती. विशेष म्हणजे या रुग्णांच्या रक्तातील पाऱ्याची पातळी वाढल्याचे दिसून आले. त्यावरून असे दिसून येते की, या फेअरनेस क्रीम्सची कुठलीही तपासणी केली गेलेली नव्हती आणि नियामक एजन्सीने त्या प्रमाणित केलेल्याही नव्हत्या. त्यामुळे या क्रीम्समध्ये पाऱ्याचे प्रमाण मर्यादेपलीकडे होते. त्यामुळे या क्रीम्स वापरणाऱ्या लोकांच्या त्वचेद्वारे पारा शरीरात शोषला गेला आणि त्यांना किडनीसंबंधित समस्या जाणवू लागल्या. पण, अशा घटना केवळ एका राज्यापुरत्या मर्यादित नाहीत. देशाच्या विविध भागांमध्ये आणि जगभरात अशाच घटना घडत आहेत.

केरळमध्ये फेअरनेस क्रीमच्या वापराच्या वापराने मूत्रपिंडासंबंधित आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. विशेषतः मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथीशी प्रकरणांसंबंधीत एक संशोधन करण्यात आले आहे.

फेअरनेस क्रीम्सचा किडनीवर कसा परिणाम होऊ शकतो?

काही लोकांना फेअरनेस क्रीमच्या वापरामुळे मूत्रपिंडासंबंधित समस्या जाणवू लागतात. कारण- या क्रीम्समध्ये रासायनिक पदार्थच इतके वापरले जातात की, ज्यामुळे त्वचेसह शरीरातील इतर अवयवांवरही त्याचा परिणाम होत असतो. गेल्या वर्षी केरळमध्ये एक अभ्यास करण्यात आला, यावेळी फेअरनेस क्रीम्समध्ये पाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले, जेव्हा पारा त्वचेद्वारे शोषला जातो तेव्हा तो मूत्रपिंडांपर्यंत पोहोचतो आणि मूत्रपिंडाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत गडबड निर्माण करतो. त्यामुळे शरीराच्या स्वतःच्या उतींना आणि मूत्रपिंडात असलेल्या प्रथिनांना लक्ष्य करणाऱ्या अँटीबॉडीजचे उत्पादन सुरू होते. परिणामी रोगप्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होतो. हे असेच सुरू राहिल्यास भविष्यात मूत्राशयासंबंधित आजारांचा धोका अधिक वाढतो.

मूत्रपिंडातून प्रथिनगळती कशामुळे होते?

विशेषतः शरीरात सीरम अल्ब्युमिन या प्रथिनाची पातळी घसरते ,ज्यामुळे पाय आणि शरीराला सूज येते. मूत्रातील संरक्षणात्मक प्रथिनाचीची मात्रा घटल्याने रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. त्याशिवाय एक-तृतियांश रुग्णांचा रक्तदाब वाढू शकतो.

उपचार प्रोटोकॉल काय आहे?

केरळमधील प्रकरणांतून असे लक्षात आले की, बहुतेक रुग्णांनी फेअरनेस क्रीम वापरणे बंद केल्याने मूत्रमार्गातील प्रथिनाच्या गळतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते. रुग्णांच्या एका लहान गटाला ऑटो-अँटीबॉडी उत्पादन रोखण्यासाठी आणि मूत्रपिंडाचे पुढील नुकसान कमी करण्यासाठी रोगप्रतिकार-दमन थेरपीची आवश्यकता असू शकते. या प्रक्रियेदरम्यान, मूत्रमार्गातील प्रथिनांची पातळी नियंत्रित करण्यासाठी अँटीहायपरटेन्सिव्ह औषधे आणि नॉन-इम्युनोसप्रेसिव्ह औषधे दिली जातात.