अलीकडेच हिमाचल प्रदेशात कृत्रिम रसायनांनी रंगवलेली काळी डाळ (उडीद डाळ) आढळून आल्याची बातमी समोर आली, ज्यामुळे आरोग्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. पत्रकार नेहा शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांना राज्यातून मिळालेल्या काही बनावट काळ्या डाळीबाबत माहिती देण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये बिया रात्रभर भिजवल्यानंतर त्यांचा काळा रंग गमावून हिरव्या रंगाच्या झाल्याचे दिसतात हे दाखवण्यात आले आहे. अशा भेसळयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे शरीरावर काय दुष्परिणाम होतो हे समजून घेऊ…

सुरक्षित, चांगली डाळ कशी निवडावी हे समजून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसच्या होलिस्टिक हेल्थ अँड वेलनेस कोच ईशा लाल यांच्याशी संवाद साधला.

बनावट किंव भेसळयुक्त डाळ खाल्ल्याने आरोग्याला कोणते धोके होतात? (What are the health risks of consuming counterfeit dal?)

भेसळयुक्त अन्न, विशेषतः कृत्रिम रंगयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम खालीलप्रमाणे :

१. यकृत आणि मूत्रपिंडांवर विषारी भार (Toxic Load on the Liver and Kidneys) : कृत्रिम रंगांमध्ये बहुतेकदा शिसे किंवा आर्सेनिक यांसारखे जड धातू असतात. यकृत,हा मानवी शरीरातील प्राथमिक डिटॉक्स (विषारी पदार्थ बाहेर टाकणार) अवयव आहे. अशा विषारी पदार्थांना शरीराबाहेर काढण्यासाठी यकृताला जास्त वेळ काम करावे लागते, ज्यामुळे त्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अशा कृत्रिम रंगांचा वापर करून बनविलेल्या पदार्थांचे दीर्घकाळ सेवन केले, तर त्यातील विषारीपणामुळे यकृत आणि मूत्रपिंड बिघडण्याचा धोका ३०% पर्यंत वाढू शकतो

. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल त्रास(Gastrointestinal Distress):हे कृत्रिम रंग पोटाच्या अस्तरांना त्रास देऊ शकतात, ज्यामुळे मळमळ, पोटफुगी व अपचन होऊ शकते. आयुर्वेदिक तत्त्वांमध्ये यावर भर दिल्यानुसार, “इष्टतम आरोग्यासाठी अग्नी (पाचनाची आग) संतुलित राहिला पाहिजे; परंतु बनावट रंग थेट हे संतुलन बिघडवतात.”ग्यासाठी अग्नि (पाचनाची आग) संतुलित राहिली पाहिजे. बनावट रंग थेट हे संतुलन बिघडवतात.”

. कर्करोगाचा धोका(Cancer Risk): काही कृत्रिम अन्नरंगांना कार्सिनोजेन्स म्हणून वर्गीकृत केले जाते. टार्ट्राझिनसारख्या अन्नात वापरल्या जाणाऱ्या रंगांच्या नियमित सेवनाविरुद्ध WHO कडून इशारा देण्यात आला आहे. कारण- त्यामुळे काही विशिष्ट कर्करोगांचा धोका वाढतो.

बनावट आणि खरी काळी डाळ कशी ओळखायची?(How can you differentiate between fake and authentic kaali dal?)

खरी आणि खरी काळी डाळ कशी ओळखायची? :

पाण्यात भिजूवून करा चाचणी(Water Test) : एक ग्लास पाण्यात मूठभर डाळ २० मिनिटे भिजवा. जर पाणी गडद झाले किंवा तळाशी काही अवशेष राहिले, तर ते धोक्याचे आहे. प्रत्यक्षात खरी डाळ त्याचा रंग टिकवून ठेवते.

डाळ घासून करा चाचणी(Rubbing Test): डाळीचे काही दाणे घ्या आणि ते तुमच्या तळहातांवर घासून घ्या. जर रंग तुमच्या हाताला रंग लागला, तर ती डाळ कृत्रिम रंगांनी रंगवलेली असण्याची शक्यता आहे.

वास घेऊन करा चाचणी(Smell Test) : खऱ्या काळ्या डाळीला हलकासा मातीसारखा वास असतो. कृत्रिम रंग दिलेल्या डाळींना रसायनांचा वास येतो. विशेषत: डाळ धुतल्यानंतर हा वास तीव्रतेने जाणवतो.

स्वरूप(Appearance) : नैसर्गिक डाळीचा पृष्ठभाग आणि रंग असमान असेल, तर रंगवलेली डाळ एकसारखी गडद आणि चमकदार दिसू शकते. हे डाळीमध्ये भेसळ केल्याचे लक्षण आहे.

काळी डाळ तुमच्या नियमित आहाराचा भाग का असावी?(Why kaali dal should be a part of your regular diet?)

काळी डाळ ही एक पौष्टिकतेने समृद्ध आहे, जी आयुर्वेद आणि आधुनिक पोषण दोन्हीमध्ये खूप योग्य पर्याय आहे.

एक कप शिजवलेल्या काळ्या डाळीतून १४ ग्रॅम प्रथिने आणि १५ ग्रॅम फायबर मिळते, ज्यामुळे ती शाकाहारी आणि वनस्पतींशी आधारित आहार घेणाऱ्या लोकांसाठी एक प्रमुख पदार्थ बनते. ईशा लाल सांगतात, “आयुर्वेदानुसार, काळी डाळ पोषण देते आणि पित्त थंड करून वात कमी करते. थंडीच्या महिन्यांत जेव्हा शरीराला उष्णता आणि पोषण हवे असते, तेव्हा ही डाळ खाणे विशेषतः फायदेशीर असते.